Fact Check: देशात एक डिसेंबर पासून लोकडाऊन लागण्याचा दावा एक अफवा, ABP न्यूज च्या नावावर व्हायरल होत असलेली ट्विट खोटी आहे
देशात परत एकदा लोकडाऊन लागणार या दाव्याने व्हायरल होत असलेले ट्विट खोटे आहे. या सोबतच ABP च्या नावाने व्हायरल होत असलेले ट्विट एडिटिंग करून बनवण्यात आले आहे, ज्यात काहीच तथ्य नाही.
- By: Abhishek Parashar
- Published: Nov 19, 2020 at 12:33 PM
नवी दिल्ली (विश्वास न्यूज): दिल्ली मध्ये काही भागांमध्ये, काही अंशात प्रतिबंध लागणार आहेत, या न्यूज रिपोर्ट्स येत असतानाच सोशल मीडिया वर एक न्यूज चॅनेल ABP च्या नावाने एक ट्विट व्हायरल होत आहे, ज्यात दावा करण्यात येत आहे कि, देशात परत एकदा लोकडाऊन लागणार आहे.
विश्वास न्यूज च्या तपासात हा दावा खोटा असल्याचे समोर आले. न्यूज चॅनेल ABP न्युज च्या नावाने व्हायरल होत असलेले ट्विट खोटे आहे. न्यूज चॅनेल ने अशे कुठलेच ट्विट केले नाही, तसेच देशात परत लोकडाऊन लागणार आहे अशी कुठलीच घोषणा अजून करण्यात आलेली नाही.
काय होत आहे व्हायरल?
काही यूजर्स ने विश्वास न्यूज च्या फॅक्ट चेकिंग व्हाट्सअँप चॅटबोट (+91 95992 99372) वर या व्हायरल ट्विट ला पाठवले आणि त्याच्या मागचं सत्य जाणून घ्यायचा अनुरोध केला.
तपास:
व्हायरल होत असलेल्या ट्विट मध्ये दावा करण्यात येत आहे कि एक डिसेंबर पासून परत लोकडाऊन लागणार आहे आणि याचे कारण कोरोनाव्हायरस चे वाढते संक्रमण आहे. निरखून पाहिल्यानंतर असे लक्षात आले कि व्हायरल ट्विट मध्ये बऱ्याच चुका आहेत, ज्यामुळे ह्या ट्विट वर लगेच विश्वास बसणे कठीण आहे.
ABP न्यूज च्या अधिकृत ट्विटर हॅन्डल वर देशभरात परत लोकडाऊन लागणार आहे असे कुठलेच ट्विट आम्हाला मिळाले नाही. पण ABP न्यूज च्या ट्विटर हॅन्डल वर आम्हाला अशी बातमी नक्की मिळाली ज्या प्रमाणे, दिल्ली मध्ये लग्न समारंभात आता २०० च्या जागी ५० लोकांचीच अनुमती देण्यात येईल, या केजरीवाल यांच्या प्रस्तावाला उप-राज्यपाल यांची मंजुरी मिळाली आहे.
व्हायरल होत असलेल्या ट्विट ला घेऊन आम्ही ABP न्यूज सोबत संपर्क केला. ABP न्यूज चे प्रवक्ता यांनी आम्हाला ई-मेल द्वारे सांगितले कि, “देशात परत एकदा लोकडाऊन लागणार हा ट्विट द्वारे केलेल्या दाव्याचा स्क्रीनशॉट खोटा आणि बनावटी आहे. आमच्या नावाचा वापर सोशल मीडिया वर हा खोटा दावा पसरवण्यासाठी केला जात आहे. आमच्या ट्विटर हॅन्डल द्वारे अश्या कोणत्याच सूचना देण्यात आल्या नाहीत.
देशात जर परत संपूर्ण लोकडाऊन लागले असते तर ती एक खूप मोठी बातमी असती, पण आमच्या तपासात आम्हाला कुठेच अशी बातमी मिळाली नाही. पण आम्हाला अश्या बातम्या नक्की मिळाल्या, ज्यात असे दिले गेले होते कि दिल्ली मध्ये लोकडाऊन च्या जागी स्थानीय स्तरावर पाबंदी लावण्यात येणार आहे. दिल्ली चे स्वास्थ्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी स्पष्ट केले कि दिल्ली मध्ये परत लोकडाऊन लागणार नाही, त्याची सध्या काहीच आवश्यकता नाही.
सर्च मध्ये आम्हाला दिल्ली चे उप-मुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचे एक विधान सापडले, ज्यात त्यांनी म्हंटले, “दिल्ली सरकार चा परत लोकडाऊन लावण्याचा कुठलाच हेतू नाही आहे. लोकडाऊन हा कोरोनाव्हायरस पासून लढण्याचा उपाय नाही. याला लढा द्यायचा असेल तर त्याचा एकमात्र उपाय हे मेडिकल मानजमेंट आहे. सध्या दिल्ली मध्ये २६००० लोकं आयसोलेशन मध्ये आहे आणि आमच्या कडे १६००० बेड आहे ज्यातले ५० % बेड रिकामे आहे.”
न्यूज रिपोर्ट प्रमाणे, “दिल्ली मध्ये कोरोनाव्हायरस चे वाढते संक्रमण लक्षात घेता, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी केंद्र सरकार कडून त्या बाजार क्षेत्रात लोकडाऊन लावायचा अधिकार मागितला, जे कोरोनाव्हायरस चे ‘हॉटस्पॉट’ बनले आहे. त्यांनी म्हंटले कि दिवाळी च्या काळात असे बरेच लोकं होते ज्यांनी मास्क नाही वापरला तसेच सोशल डिस्टंसिंग चे पालन देखील केले नाही, ज्यामुळे कोरोनाव्हायरस चे संक्रमण वाढले आहे. याच्या एक दिवस आधी, दिल्ली सरकार ने आपल्या प्रेस नोट मध्ये लोकल लोकडाऊन या शब्दाचा उपयोग केला होता, पण यानंतर अधिक संशोधनानंतर ‘बंद’ असे करण्यात आले होते.”
अनलॉक-६ च्या अंतर्गत केंद्र सरकार ने राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये त्यांच्या मंजुरी शिवाय कंटेनमेंट झोन च्या बाहेर लोकडाऊन लावले जाणार नाही असे सांगितले होते. अश्यात देशव्यापी लोकडाऊन लावण्यात आल्यास ती एक मोठी बातमी आहे. आम्हाला आमच्या न्यूज सर्च मध्ये अशी कुठलीच बातमी आढळली नाही ज्यात देशव्यापी लोकडाऊन चा उल्लेख केला गेला असेल.
निष्कर्ष: देशात परत एकदा लोकडाऊन लागणार या दाव्याने व्हायरल होत असलेले ट्विट खोटे आहे. या सोबतच ABP च्या नावाने व्हायरल होत असलेले ट्विट एडिटिंग करून बनवण्यात आले आहे, ज्यात काहीच तथ्य नाही.
- Claim Review : देशात परत एकदा लोकडाऊन लागणार
- Claimed By : Social Media user
- Fact Check : False
Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.