X
X

Fact-Check: २०१२ चे छायाचित्र एडिट करून भारतीय वायु सेनेच्या नावावर होत आहे व्हायरल, पोस्ट खोटी आहे

विश्वास न्यूज च्या तपासात, व्हायरल पोस्ट खोटी निघाली. २०१२ चे छायाचित्र आता मॉर्फ करून खोट्या दाव्यांसह शेअर केले जात आहे.

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल मीडिया वर एका लढाऊ विमानाचे मोर्फ्ड छायाचित्राच व्हायरल होत आहे. या छायाचित्राला घेऊन दावा करण्यात येत आहे कि बालाकोट स्‍ट्राइक मध्ये पाकिस्तान चे चार झाडे आणि एक कावळा मारल्यागेल्याचे स्वीकार केल्या नंतर भारतीय वायू सेने ने आपल्या विमानावर झाडे आणि कावळ्याचे छायाचित्र लावले.
विश्वास न्यूज ने व्हायरल पोस्ट चे तपास केले. तपासात आम्हाला कळले कि भारतीय वायु सेनेचे एक जुने छायाचित्र एडिट करून खोट्या दाव्यांसोबत शेअर केले जात आहे. ओरिजिनल छायाचित्र २०१२ चे आहे. हे छायाचित्र ग्वालियर च्या एयरफोर्स स्‍टेशन वर क्लिक केले होते.

काय होत आहे व्हायरल?
फेसबुक पासून ट्विटर पर्यंत सगळीकडे सध्या भारतीय वायू सेनेचे एक लढाऊ विमानाचे एक एडिटेड छायाचित्र व्हायरल होत आहे. फेसबुक यूजर गोपाल शर्मा यांनी हे छायाचित्र शेअर करून त्यांनी लिहले: ‘Admire the IAF sense of humour. They are trolling the Pakis for admitting that only 4 trees and one crow were the casualties in the Balakot Strike ….. Jai hind..’

अर्थात:
भारतीय वायू सेनेचे मस्त व्यंग्य आहे, IAF बालाकोट स्ट्राइक मध्ये चार झाडे पाडून आणि एक कावळा मारल्याचे स्वीकारल्या नंतर पाकिस्तान ला ट्रॉल करत आहेत.
व्हायरल पोस्ट आणि त्याचे आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:
विश्वास न्यूज ने सगळ्यात आधी व्हायरल छायाचित्र गूगल रिव्हर्स इमेज मध्ये अपलोड करून शोधले. वेग-वेगळे कीवर्डस वापरून आम्हाला खरे छायाचित्र
zone5aviation.com या संकेतस्थळावर सापडले. साईट वर फोटोगैलरी मध्ये ओरिजिनल छायाचित्रासोबत अजून बाकी पण काही छायाचित्र होते. या छायाचित्रांच्या कॅप्शन मध्ये सांगितले होते कि हे छायाचित्र २०१२ च्या शेवटी ग्वालियर चे महाराजपुर एयरफोर्स स्‍टेशन येथे घेतले आहे. छायाचित्र मिराज २००० चे आहे. हे छायाचित्र दिल्ली च्या अंगद सिंह यांनी काढले आहे. फोटो गॅलरी इथे बघा.

व्हायरल छायाचित्रावरून विश्वास न्यूज ने भारतीय वायू सेनेचे अधिकारी यांना संपर्क केला. त्यांनी आम्हाला सांगितले कि IAF कधीच असे काही करत नाही, जसे व्हायरल पोस्ट मध्ये सांगितले गेले आहे.

तपासाच्या शेवटच्या टप्प्यात आम्ही ज्या यूजर ने हे पोस्ट केले त्यांच्या प्रोफाइल चे सोशल स्कॅनिंग केले. त्यात आम्हाला कळले कि फेसबुक यूजर गोपाल शर्मा हे दिल्ली चे रहिवासी आहे. तसे ते मुळात हिमाचल प्रदेश च्या हमीरपूर चे रहिवासी आहे. यांच्या अकाउंट ला ३४० लोकं फोल्लो करतात.

निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात, व्हायरल पोस्ट खोटी निघाली. २०१२ चे छायाचित्र आता मॉर्फ करून खोट्या दाव्यांसह शेअर केले जात आहे.

  • Claim Review : भारतीय वायू सेनेचे मस्त व्यंग्य आहे, IAF बालाकोट स्ट्राइक मध्ये चार झाडे पाडून आणि एक कावळा मारल्याचे स्वीकारल्या नंतर पाकिस्तान ला ट्रॉल करत आहेत.
  • Claimed By : Gopal Sharma
  • Fact Check : False
False
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

Post your suggestion

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later