Fact Check: एडिटेड छायाचित्राला दक्षिण भारत चे शिवलिंग सांगून व्हायरल केले जात आहे
आमच्या तपासात असे कळले कि हा दावा खोटा आहे. हे छायाचित्र एडिटेड असल्याचे आम्हाला समजले, नॉर्वे मध्ये स्थित दोन पहाडाच्या मध्ये आटलेल्या एका दगडाचे हे छायाचित्र आहे, ज्यात शिवलिंगाच्या छायाचित्राला सोबत जोडले गेले आहे.
- By: Pallavi Mishra
- Published: Oct 29, 2020 at 05:21 PM
नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल मीडिया वर सध्या एक छायाचित्र व्हायरल होत आहे, ज्यात दोन पहाडांमध्ये, एका दगडावर शिवलिंग ठेवलेले दिसते. पोस्ट मध्ये सोबत दावा केला जात आहे कि हे छायाचित्र दक्षिण भारत येथे असलेल्या शिवलिंगाचा आहे. आमच्या तपासात आम्हाला कळले कि हा दावा खोटा आहे. हे छायाचित्र एडिटेड असल्याचे आम्हाला समजले. नॉर्वे मध्ये स्थित दोन पहाडांमध्ये आटलेल्या एका दगडाचे हे छायाचित्र आहे, ज्यावर एडिटिंग टूल्स च्या मदतीने शिवलिंग जोडले गेले आहे.
काय होत आहे व्हायरल?
व्हायरल पोस्ट मध्ये, दोन पहाडाच्या मध्ये एक दगड अडकल्याचे दिसते, त्या दगडांवर एक शिवलिंग असल्याचे दिसते. पोस्ट सोबत दावा केला जात आहे कि, “#ओम्शिवा– #अद्भुत,#अकल्पनीय। ।।आरम्भ भी अंत भी,शांत भी प्रचंड भी ।। #दक्षिणीभारत में दो पहाड़ो के बीच स्थित शिवलिंग,देखो सनातनियों हमारे पूर्वजों ने कितनी मेहनत व कितनी अद्भुत महान वास्तुकला का हमे परिचय करवाया और विरासत में हमारे लिए इतने अद्भुत अजूबे हमारे लिए छोड़कर गए है। हमारा दुर्भाग्य ये रहा कि हमारे इतिहास के खिलाफ राजनीतिक षड्यंत्र रचे गए और इतिहास लेखन का कार्य #वामपंथियों को दिया गया और इन सब चीजों को उन्होंने सिर्फ दफन करने का कार्य किया है, आज इनको हमे हर व्यक्ति तक पहुचाने की आवश्यकता है, और इनको संरक्षण दिलवाना हमारा कर्तव्य है। जागो हिन्दू जागो हिन्दू जगेगा देश जगेगा देश बचेगा।“
अर्थात: दक्षिण भारत मध्ये दोन पहाडांच्या मध्ये स्तिथ हे एक शिवलिंग आहे, आपल्या सनातनी पूर्वजांनी मेहनत करून अद्भुत आणि महान वास्तुकला सोबत आपल्याला परिचय करवला आणि विरासत मध्ये आपल्या साठी इतक्या अद्भुत गोष्टी आपल्यासाठी सोडून गेले. हे आपले दुर्भाग्य आहे कि आपल्या इतिहासाच्या विरोधात राजनीतिक षडयंत्र रचले गेले आणि इतिहास लेखनाचे कार्य वामपंथ्यांनी केले, आणि या सगळ्या गोष्टी लोकांच्या समोर आलेच नाही. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे. त्यांचे संरक्षण करणे हे आपले काम आहे. हिंदू जगातील तेव्हाच देश वाचेल.
या पोस्ट चे आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.
तपास:
पोस्ट मध्ये सांगितले गेले आहे कि, हे शिवलिंग दक्षिण भारत चे आहे, म्हणून आम्ही काही कीवर्डस वापरून दक्षिण भारतातले प्रसिद्ध शिवलिंग त्यांच्या बद्दल माहिती गोळा केली. आम्हाला पूर्ण दक्षिण भारतातले बरेच प्रसिद्ध शिवलिंग मिळाले. तसेच १२ ज्योतिर्लिंगामधील २ ज्योतिर्लिंग हे दक्षिण भारतातील तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश येथे आहेत. पण या शिवलिंगांमधील एक पण शिवलिंग व्हायरल छायाचित्रासोबत मिळता जुळता नाही.
आम्ही या विषयावर तामिळनाडू येथे स्थित रामेश्वरम मंदिर चे मुख्य प्रबंधक राजा राम पंत यांच्या सोबत संपर्क केला. त्यांनी सांगितले कि, “हे छायाचित्र रामेश्वरम मंदिर चे नाही आहे. माझ्या माहिती प्रमाणे असे कुठलेच शिवलिंग तामिळनाडू मध्ये नाही आहे.” त्यांनी आम्हाला मल्लिकार्जुन मंदिर चे संचालक, स्वामी नारायण यांचा देखील नंबर दिला, त्यांनी आमच्या सोबत फोन वर बोलून कन्फर्म केले, “हे शिवलिंग खरे दिसत नाही, असे कुठले शिवलिंग मी भारतात बघितले नाही.”
या नंतर आम्ही व्हायरल छायाचित्राचे स्क्रीनशॉट घेतले आणि त्याला गूगल रिव्हर्स इमेज सर्च मध्ये शोधले. आम्हाला हेच छायाचित्र amongraf.ro या वेबसाईट वर मिळाले. पण या छायाचित्रात आम्हाला शिवलिंग दिसले नाही. या बातमी प्रमाणे, हे छायाचित्र नॉर्वे च्या जेराँग मध्ये असलेल्या मैजिस्टिक हैंगिंग स्टोन चे आहे.
या नंतर आम्ही “MAJESTIC HANGING STONE, KJERAG, NORWAY” हे कीवर्ड टाकून शोधले. आम्हाला या हैंगिंग स्टोन चे बरेच छायाचित्र मिळाले, ज्यात स्पष्ट दिसत आहे कि व्हायरल छायाचित्र एडिटेड आहे. खरे चित्र हे नॉर्वे च्या जेराँग पहाड़ श्रृंखला मध्ये स्थित हैंगिंग स्टोन चे आहे, ज्यावर एडिटिंग टूल्स च्या मदतीने शिवलिंग जोडले गेले, आणि चुकीच्या दाव्याने व्हायरल होत आहे.
या खोट्या पोस्ट ला बऱ्याच लोकांनी शेअर केले आहे, ज्यातला एक पोस्ट फेसबुक पेज ‘हिन्दू साम्राज्य’, ज्यांच्या पोस्ट चा आम्ही तपास केला. या पेज चे १५७७ फॉलोवर्स आहे.
निष्कर्ष: आमच्या तपासात असे कळले कि हा दावा खोटा आहे. हे छायाचित्र एडिटेड असल्याचे आम्हाला समजले, नॉर्वे मध्ये स्थित दोन पहाडाच्या मध्ये आटलेल्या एका दगडाचे हे छायाचित्र आहे, ज्यात शिवलिंगाच्या छायाचित्राला सोबत जोडले गेले आहे.
- Claim Review : दक्षिण भारत मध्ये दोन पहाडांच्या मध्ये स्तिथ हे एक शिवलिंग आहे
- Claimed By : Hindu Samrajya
- Fact Check : False
Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.