X
X

Fact Check: महाराष्ट्रात २०१८ साली झालेल्या आंदोलनाचे चित्र आता पानिपत चे सांगून व्हायरल

विश्वास न्यूज च्या तपासात पानिपत च्या नावाने व्हायरल होत असलेले छायाचित्र खोटे ठरले. महाराष्ट्र च्या २०१८ च्या शेतकरी आंदोलनाचे छायाचित्र पानिपत च्या नावाने सोशल मीडिया वर आता व्हायरल होत आहे.

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): कृषी संबंधित कायदे अर्थात फार्म बिल मंजूर झाल्या नंतर सोशल मीडिया वर काही जुने छायाचित्र शेअर करण्यात आले. यातच एक महाराष्ट्रातील २०१८ सालचे एक छायाचित्र काही लोक सोशल मीडिया वर व्हायरल करताना दिसतात, त्यात ते असा दावा करत आहेत कि हे छायाचित्र पानिपत इथले आहे.
विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल होत असलेला दावा खोटा असल्याचे कळले. एप्रिल २०१८ मध्ये महाराष्ट्रात झालेले शेतकरी आंदोलनाचे छायाचित्र आता काही लोक पानिपत चे सांगून व्हायरल करत आहेत.

काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर Muzeeb Shaikh ने २४ सप्टेंबर रोजी एक फोटो शेअर केला आणि त्यासोबत दावा केला, “पानीपत में उमड़ा किसानों का ये सैलाब बता रहा है, भाजपा के अंतिम विसर्जन का समय आ चुका है.. कुछ ही समय मे हम दिल्ली की ओर कूच करेंगे, जितना जोर है सरकार लगा ले, हम रुकेंगे नही.”

या फेसबुक पोस्ट चा अर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:
विश्वास न्यूज ने सगळ्यात आधी व्हायरल होत असलेल्या छायाचित्राचे तपास केले. त्यासाठी आम्ही आधी व्हायरल होत असलेल्या छायाचित्राला गूगल रिवर्स इमेज टूल मध्ये अपलोड केले. सर्च करत असताना आम्हाला हे छायाचित्र yourstory नावाच्या वेबसाईट वर एका बातमीसोबत सापडले. याला १३ मार्च २०१८ रोजी अपलोड केले गेले होते. सगळ्यात जुने छायाचित्र आम्हाला याच वेबसाईट वर मिळाले. बातमीत सांगितले होते कि मुंबई कडे काही शेतकऱ्यांनी मार्च केले होते. त्यात हजारोंच्या संख्येने शेतकऱ्यांनी भाग घेतला होता. संपूर्ण बातमी इथे वाचा.

तपासाच्या वेळी आम्हाला एनडीटीवी आणि इंडियन एक्‍सप्रेस च्या वेबसाईट वर देखील या आंदोलनासंबंधित बातम्या मिळाल्या.
इंडियन एक्‍सप्रेस च्या वेबसाईट वर आम्हाला पानिपत च्या नावाने व्हायरल होत असलेले हे छायाचित्र दुसऱ्या अँगल नि सापडले. यात आम्हाला तेच पिवळ्या रंगाचे डिव्हायडर दिसलेत.

अजून माहिती करता आम्ही आमचे विश्वास न्यूज चे सहयोगी दैनिक जागरण चे पानिपत चे इंचार्ज रवि धवन यांच्या सोबत संपर्क केला. त्यांनी आम्हाला सांगितले कि व्हायरल छायाचित्र पानिपत चे नाही आहे. व्हायरल पोस्ट खोटी आहे, असे त्यांनी सांगितले.

शेवटी आम्ही खोटी पोस्ट करणाऱ्या फेसबुक यूजर Muzeeb Shaikh यांचे अकाउंट तपासले, त्यात आम्हाला कळले कि यूजर दिल्ली चा रहिवासी आहे. त्याने सप्टेंबर २०१५ रोजी हे अकाउंट बनवले होते.

निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात पानिपत च्या नावाने व्हायरल होत असलेले छायाचित्र खोटे ठरले. महाराष्ट्र च्या २०१८ च्या शेतकरी आंदोलनाचे छायाचित्र पानिपत च्या नावाने सोशल मीडिया वर आता व्हायरल होत आहे.

  • Claim Review : पानीपत में उमड़ा किसानों का ये सैलाब बता रहा है, भाजपा के अंतिम विसर्जन का समय आ चुका है.. कुछ ही समय मे हम दिल्ली की ओर कूच करेंगे, जितना जोर है सरकार लगा ले, हम रुकेंगे नही.. #standwithfarmerschallenge
  • Claimed By : Muzeeb Shaikh
  • Fact Check : False
False
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later