Fact-Check: प्रशांत भूषण च्या नावावर व्हायरल होत आहे खोटा ट्विट
विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल ट्विट फेक आल्याचे समजले. प्रशांत भूषण यांच्या नावावर खोटे ट्विटर अकाउंट बनवण्यात आले आहे आणि त्यावरूनच हे ट्विट केले गेले आहे.
- By: Ashish Maharishi
- Published: Aug 24, 2020 at 02:47 PM
- Updated: Aug 24, 2020 at 03:51 PM
नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सुप्रीम कोर्टाला माफी मागण्यापासून नकार देणारे वरिष्ठ वकील प्रशांत भूषण सध्या संपूर्ण देशात चर्चेचा विषय झाले आहेत. प्रशांत भूषण यांच्या बनावटी ट्विटर अकाउंट वरून एका ट्विट ला खरे मानून लोकं त्याला व्हायरल करीत आहेत.
विश्वास न्यूज ने व्हायरल ट्विट चा तपास केला, त्यात आम्हाला असे कळले कि प्रशांत भूषण यांच्या नावाचा एक खोटा ट्विटर अकाउंट बनवण्यात आला आहे. व्हायरल ट्विट खोटे असल्याचे आमच्या तपासात समजले.
काय होत आहे व्हायरल?
सोशल मीडिया वर एक ट्विट व्हायरल होत आहे, हा ट्विट @P_Bhushan1 या ट्विटर हॅन्डल वरून केला गेला आहे. या ट्विटर हॅन्डल चे नाव प्रशांत भूषण असे ठेवण्यात आले आहे. सोबतच त्यांच्या छायाचित्राचा देखील वापर करण्यात आला आहे.
बनावटी ट्विटर अकाउंट वरून करण्यात आलेल्या ट्विट मध्ये लिहल्या गेले आहे: ‘मेरी लड़ाई कोर्ट से नहीं, कोर्ट में बैठे भाजपा के एजेंट से है??इस लड़ाई में मुझे आपका साथ चाहिए, आप साथ दोगे न???’
अर्थात: माझी लढाई कोर्टसोबत नाही, कोर्टात बसलेल्या भाजप च्या एजेंट सोबत आहे. या लढाई मध्ये मला तुम्हा सगळ्यांची साथ हवी आहे. द्याल ना साथ.
हा ट्विट २१ ऑगस्ट २०२० रोजी करण्यात आला आहे. याला खरे मानून त्याला लोकं व्हायरल करत आहेत.
ट्विट चा अर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.
तपास:
तपासाची सुरुवातच आम्ही त्या ट्विटर हॅन्डल च्या स्कँनिंग पासून केली, जिथून हा ट्विट व्हायरल होत आहे. Prashant Bhushan @P_Bhushan1 नावाचे ट्विटर हॅन्डल मे २०२० मध्ये बनवले गेले आहे. त्याला ७५३२ लोकं फोल्लो करतात.
या नंतर आम्ही प्रशांत भूषण चा अधिकृत ट्विटर अकाउंट आहे का, त्याचा शोध घेतला. त्यांचा अधिकृत ट्विटर हॅन्डल आहे, @pbhushan1, हे वेरिफाइड अकाउंट आहे. यांचे ट्विट सहसा इंग्रजी भाषेत असतात आणि त्यांच्या अकाउंट ला १७ लाखापेक्षा जास्ती लोकं फॉलो करतात. खरे अकाउंट जानेवारी २०१४ मध्ये बनवण्यात आले आहे.
सत्य जाणून घेण्यासाठी आम्ही सरळ प्रशांत भूषण यांच्या सोबत संपर्क साधला. त्यांनी आम्हाला ट्विटर हॅन्डल वरच खरे काय ते सांगितले, ज्या वरून ट्विट व्हायरल गेले ते माझे ट्विटर हॅन्डल नाही. त्याच्या कन्टेन्ट सोबत माझा काहीच संबंध नाही, असे देखील त्यांनी सांगितले.
निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल ट्विट फेक आल्याचे समजले. प्रशांत भूषण यांच्या नावावर खोटे ट्विटर अकाउंट बनवण्यात आले आहे आणि त्यावरूनच हे ट्विट केले गेले आहे.
- Claim Review : मेरी लड़ाई कोर्ट से नहीं, कोर्ट में बैठे भाजपा के एजेंट से है??इस लड़ाई में मुझे आपका साथ चाहिए, आप साथ दोगे न???'
- Claimed By : फेक प्रशांत भूषण अकाउंट
- Fact Check : False
Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.