Fact Check: मुंबई च्या कूपर दवाखान्याचा व्हिडिओ नागपूर चा सांगून चुकीच्या दाव्यांसह होत आहे व्हायरल
विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल पोस्ट खोटी असल्याचे समोर आले. मुंबई च्या कूपर हॉस्पिटल मध्ये झालेली घटना, नागपूर ची सांगून खोट्या दाव्यांसह व्हायरल होत आहे. रुग्णाच्या किडनी काढून घेतल्याचा दावा पूर्णपणे खोटा आहे.
- By: Ashish Maharishi
- Published: Aug 19, 2020 at 02:01 PM
- Updated: Aug 31, 2020 at 07:18 PM
नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल मीडिया वर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओ मध्ये हॉस्पिटल मधले काही लोक वाद घालताना, आरडा-ओरड करताना दिसतात. असा दावा केला जात आहे कि हा व्हिडिओ नागपूरच्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज चा आहे आणि त्यात जिवंत माणसाचा पोस्टमॉर्टेम करून किडनी काढून घेण्यात आली.
विश्वास न्यूज च्या तपासात समोर आले कि हा व्हिडिओ नागपूर चा नाही, याचा मेडिकल कॉलेज शी काहीच संबंध नाही. हा व्हिडिओ १९ जुलै चा, मुंबई च्या कूपर हॉस्पिटल चा आहे, जो आता खोट्या डाव्यांसह व्हायरल होत आहे.
काय होत आहे व्हायरल?
ट्विटर हॅन्डल आत्मनिर्भर भारत (@aatmnirbharin) ने १६ ऑगस्ट रोजी एक व्हिडिओ अपलोड केला. त्या व्हिडिओ सोबत दावा केला गेला होता: ‘नागपुर का #मेडिकल हॉस्पिटल कोरोना से मोत का बहाना रियल मैं कर डाला जींदे का ही पोस्ट मार्टम. ओर किडनी गुरदा सब निकाल लिए गए| #सावधान_इंडिया #COVID19 #COVID19India‘
अर्थात: नागपूर चे मेडिकल हॉस्पिटल मध्ये कॉरोन च्या बहाण्याने जिवंत माणसाचे पोस्टमॉर्टेम करून किडनी, गुरदा सगळे काढून घेतले.
व्हायरल पोस्ट आणि त्याची अर्काइव्ह लिंक इथे बघा.
तपास:
विश्वास न्यूज ने व्हायरल पोस्ट चे सत्य जाणून घेण्यासाठी काही ऑनलाईन टूल्स चा वापर केला. सगळ्यात आधी व्हायरल व्हिडिओ आम्ही InVID टूल वर अपलोड केला, त्यात आम्हाला व्हिडिओ चे स्क्रीन ग्रॅब्स मिळाले. त्या स्क्रीन ग्रॅब्स चा वापर करून आम्ही रिवर्स इमेज टूल ची मदत घेऊन सर्च केले.
तपास करताना आम्हाला व्हायरल व्हिडिओ चा २२ सेकंदाचा एक भाग एएनआई न्यूज एजेंसी च्या ट्विटर हॅन्डल वर मिळाला. याला २१ जुलै २०२० रोजी अपलोड केले गेले होते. या व्हिडिओ मध्ये मजकुरात सांगण्यात आले होते कि तो १९ जुलै रोजी चा मुंबई च्या कूपर हॉस्पिटल चा व्हिडिओ आहे, ज्यात उपचारादरम्यान एका व्यक्तीचा मृत्य झाल्याने त्याच्या नातलगांनी तिथे गोंगाट केला. पूर्ण व्हिडिओ येथे बघा.
सर्च करताना आम्हाला jagran.com वर पण एक बातमी मिळाली. हि बातमी २२ जुलै रोजी प्रकाशित करण्यात आली होती. यात सांगण्यात आले होते कि एका व्यक्तीचे उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने कसे त्याच्या नातलगांनी तिथे हल्ला केला. पूर्ण बातमी इथे वाचा.
तपासादरम्यान आम्हाला एक बातमी इंडिया टीव्ही च्या यूट्यूब चॅनेल वर पण मिळाली. त्यात व्हायरल व्हिडिओ चा वापर केला गेला होता. बातमीत सांगितले गेले होते कि इंजेकशन लावल्यावर लगेच त्या इसमाची मृत्यू झाली.
तपासादरम्यान आम्ही नागपूर चे गवर्नमेंट मेडिकल कॉलेज के मेडिकल सुपरिन्टेंडेंट डॉक्टर अविनाश गावंडे यांच्या सोबत संपर्क केला. त्यांनी हा व्हिडिओ नागपूर चा नसल्याचे सांगितले. त्यांनी असे पण सांगितले कि हा व्हिडिओ नागपूर चा नसून अशी कुठलीच घटना इथे झाली नाही. तसेच त्यांनी व्हिडिओ बघून सांगितले कि असे परदे आणि लाईट मेडिकल च्या कुठल्याच वॉर्ड मध्ये नाही.
आम्ही खोटी पोस्ट शेअर करणाऱ्या यूजर चे प्रोफाइल तपासले. त्यात आम्हाला असे कळले कि हे ट्विटर हॅन्डल जुलै २०२० मध्ये बनवले गेले.
निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल पोस्ट खोटी असल्याचे समोर आले. मुंबई च्या कूपर हॉस्पिटल मध्ये झालेली घटना, नागपूर ची सांगून खोट्या दाव्यांसह व्हायरल होत आहे. रुग्णाच्या किडनी काढून घेतल्याचा दावा पूर्णपणे खोटा आहे.
- Claim Review : नागपुर का #मेडिकल हॉस्पिटल कोरोना से मोत का बहाना रियल मैं कर डाला जींदे का ही पोस्ट मार्टम. ओर किडनी गुरदा सब निकाल लिए गए| #सावधान_इंडिया #COVID19 #COVID19India'
- Claimed By : @aatmnirbharin
- Fact Check : False
Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.