Fact Check: दिल्लीच्या अक्षरधाम मंदिर चे छायाचित्र अयोध्या मध्ये बनणारे राम मंदिर सांगून होत आहे व्हायरल
अयोध्येत बनणाऱ्या राम मंदिर चे सांगून जे छायाचित्र व्हायरल होत आहे, ते दिल्लीच्या स्वामीनारायण अक्षरधाम मंदिर चे आहे.
- By: Abhishek Parashar
- Published: Aug 4, 2020 at 02:25 PM
- Updated: Aug 30, 2020 at 08:17 PM
नवी दिल्ली (विश्वास न्युज): अयोध्या मध्ये निर्माण होणार असलेल्या राम मंदिर चे भूमी पूजन ऑगस्ट ५ रोजी आहे. असे असता सोशल मीडिया वर एक मंदिराचे छायाचित्र व्हायरल होत असल्याचे दिसून येत आहे , ज्यावर दावा करण्यात येत आहे कि हे मंदिर अयोध्येत बनवण्यात येणाऱ्या मंदिराचे वास्तूशिप आहे. म्हणजेच मंदिर निर्माण झाल्यावर मंदिर असे दिसेल.
विश्वास न्यूजच्या तपासात हा दावा खोटा आढळला. अयोध्येत बनवण्यात येणाऱ्या मंदिराच्या नावावर व्हायरल होत असलेले छायाचित्र हे दिल्लीच्या स्वामीनारायण अक्षरधाम मंदिर चे आहे.
काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर ‘एक आवाज़ NAMO’ ने व्हायरल केलेले छायाचित्र (आर्काइव लिंक) ला शेअर करून त्याने लिहले, “ऐसा बनेगा अयोध्या में प्रभु श्री राम जी का भव्य मंदिर देखते हैं कितने हिंदु खुश हैं दहाड दो जय जय श्री राम ।।जय श्री राम।।”
अर्थात: असे बनेल अयोध्ये मध्ये प्रभू श्री राम यांचे भव्य मंदिर बघू किती हिंदू खुश आहेत, म्हणा जय जय श्री राम ।।जय श्री राम।।
तपास करे पर्यंत, या छायाचित्राला जवळपास साडे तीन पेक्षा जास्ती लोकांनी शेअर केले होते. सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म वर अनेक यूजर ने याला राम मंदिर चे छायाचित्र समजून शेअर केले आहे.
तपास:
राम मंदिर चे समजून अनेक व्हिडिओ आणि छायाचित्र या आधी पण व्हायरल झाले आहे. अश्या बऱ्याच छायाचित्रांचा तपास देखील विश्वास न्यूज ने केला आहे. ज्यात आम्ही आमच्या पाठकांना अयोध्येत प्रस्तावित राम मंदिर याचे वास्तविक वास्तूशिप कसे असेल याची कल्पना दिली आहे.
अयोध्ये बाबतीत सुप्रीम कोर्ट चा निर्णय आल्यावर राम मंदिर च्या निर्माणासाठी केंद्र सरकार ने ‘श्री राम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र’ ट्रस्ट बनवले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत, ५ फेब्रुवारी २०२० रोजी लोकसभेत याची घोषणा केली होती.
इंटरनेट वर सर्च केले असता आम्हाला ‘रॉयटर्स’ एजेन्सी च्या फोटो गॅलरी मध्ये २२ ऑक्टोबर २०१९ रोजी पोस्ट केलेले एक छायाचित्र सापडले, हे अयोध्येत प्रस्तावित राम मंदिर चे मॉडेल चे छायाचित्र होते. फेसबुक वर शेअर करण्यात आलेल्या छायाचित्रासोबत हे मुळीच मिळते जुळते नव्हते.
आमच्या सहयोगी दैनिक जागरण च्या अयोध्येतल्या प्रभारी रमा शरण अवस्थी यांनी व्हायरल होत असलेल्या छायाचित्रासोबतच्या दाव्यांचे खंडन केले. त्यांनी म्हंटले, ‘अयोध्येत बनणाऱ्या राम मंदिर चे वास्तुशिल्प यापेक्षा खूपच वेगळे आहे’.
‘दैनिक जागरण’ मध्ये २४ जुलै रोजी प्रकाशित एका रिपोर्ट प्रमाणे, “अयोध्येत प्रस्तावित राम मंदिर च्या मॉडेल च्या डिजाइन ला एक नवीन स्वरूप दिले गेले आहे. ज्यावर श्रीरामजन्मभूमि तीर्थ क्षेत्र ट्रस्टने देखील मान्यता दिली आहे. नवीन लेआऊट प्रमाणे, मंदिर पहिले पेक्षा पण भव्य बनेल. यात पाच नाही पण सहा शिखर राहतील.”
या बातमीत प्रस्तावित राम मंदिर सारखे छायाचित्र देखील वापरले गेले आहे.
हिंदी न्यूज चैनल ‘आज तक’ च्या व्हिडिओ बुलेटिन मध्ये केलेल्या दाव्यांवर स्पष्टीकरण प्राप्त होते. राम मंदिर च्या नकाश्यात केलेले बदल यांची माहिती या बातमीत देण्यात आली आहे. रिपोर्ट प्रमाणे, मंदिराच्या मूळ स्वरूपात कुठलेही बदल केले नसून, मंदिर दोन च्या जागी तीन माजली राहील.
राम मंदिरच्या वास्तविक वास्तूशिपची माहिती मिळाल्यावर राम मंदिरच्या नावावर व्हायरल होत असलेल्या छायाचित्राचा आम्ही तपास घेण्यास सुरुवात केली. त्याचा ओरिजिनल सोर्स यावर आम्ही तपास सुरु केला. गूगल रिवर्स इमेज मध्ये हे छायाचित्र आम्हाला बऱ्याच ठिकाणी मिळाले. बऱ्याच लोकांनी त्याला दिल्ली चे स्वामीनारायण अक्षरधाम मंदिर चे छायाचित्र सांगून शेअर केले आहे.
अक्षरधाम मंदिर च्या अधिकृत वेबसाईट वर देखील आम्हाला हे छायाचित्र मिळाले, पण ते एका दुसऱ्या अँगल ने अपलोड केले होते. या संकेतस्थळावर मंदिर चे अजून काही छायाचित्र पण बघता येतील.
या आधी पण बरेच छायाचित्र राम मंदिर च्या नावावर व्हायरल झाले होते, ज्याचे सत्य तपासण्यासाठी आम्ही आशिष सोमपुरा यांना संपर्क केला होता. वास्तुशिल्पी चंद्रकांत सोमपुरा यांनी प्रस्तावित राम मंदिर चे संपूर्ण मूळ मॉडेल चे निर्माण केले आहे आणि आता त्यांचे दोन्ही मुलं निखिल आणि आशिष सोमपुरा यांच्यावर मंदिरचे नवीन मॉडेल बनवण्याची जबाबदारी आहे. विश्वास न्यूज ने आधी पण अश्या बऱ्याच छायाचित्र आणि व्हिडिओ चा तपास केले आहे जे राम मंदिर च्या नावाने व्हायरल होत होते.
व्हायरल पोस्ट शेअर केलेल्या फेसबुक पेज ला जवळपास १६ लाख लोकं फोल्लो करतात.
निष्कर्ष: अयोध्येत बनणाऱ्या राम मंदिर चे सांगून जे छायाचित्र व्हायरल होत आहे, ते दिल्लीच्या स्वामीनारायण अक्षरधाम मंदिर चे आहे.
- Claim Review : ऐसा बनेगा अयोध्या में प्रभु श्री राम जी का भव्य मंदिर देखते हैं कितने हिंदु खुश हैं दहाड दो जय जय श्री राम ।।जय श्री राम।
- Claimed By : एक आवाज़ NAMO
- Fact Check : False
Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.