Fact Check: आधार कार्ड बद्दल मुंबई पोलिसांच्या नावावर खोटी ऑडिओ क्लिप होत आहे व्हायरल
निष्कर्ष: आधार कार्ड वरून होत असलेल्या फसवेगिरी बद्दल शेअर करण्यात येणारी ऑडिओ क्लिप खोटी आहे. मुंबई पोलिसांनी अशी कुठलीही ऑडिओ क्लिप प्रसारित केली नाही.
- By: Abhishek Parashar
- Published: Jun 30, 2020 at 01:50 PM
- Updated: Aug 31, 2020 at 05:04 PM
नवी दिल्ली (विश्वास टीम)
विविध सोशल मीडिया वेबसाईट्स वर सध्या एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. असा दावा केला जात आहे कि हि ऑडिओ क्लिप मुंबई पोलिसांद्वारे प्रसारित करण्यात आली आहे. या क्लिप मध्ये आधार कार्ड च्या वापराबाबत सूचना देण्यात आल्या आहे.
विश्वास न्यूज च्या तपासात ऑडिओ क्लिप बाबत केलेला दावा खोटा ठरला. मुंबई पोलिसांनी अशी कुठलीही ऑडिओ क्लिप प्रसारित केली नाही.
काय होत आहे व्हायरल?
फेसबुक पेज, ‘Sky News India‘ ने ऑडिओ क्लिप (आर्काइव लिंक) शेअर केले आणि लिहले, “आधार कार्ड बने हुए उनके लिए जरूरी सुचना | GOV. OF INDIA | Mumbai Police
जिनके आधार कार्ड बने हुए उनके लिए जरूरी सुचना – सभी सावधान रहे और ये रिकॉर्डिंग जरूर सुने और जल्दी से जल्दी आगे पहुँचाया जाये प्लीज़ – धन्यवाद।”
अर्थात: “ज्यांचे आधार कार्ड आहे त्यांच्यासाठी महत्वाची सूचना. GOV. OF INDIA | Mumbai Police
ज्यांचे आधार कार्ड आहेत त्यांच्यासाठी महत्वाची सूचना, सगळॆ सावध रहा आणि हि रेकॉर्डिंग नक्की ऐका आणि बाकी लोकांपर्यंत देखील पोहोचावा – धन्यवाद.”
तपास:
व्हायरल होत असलेली ऑडिओ क्लिप मराठी मध्ये आहे, ज्यात नमूद केलेला मजकूर खालील प्रमाणे आहे:
‘एक महत्वपूर्ण सूचना: तुमच्या मोबाइल वर आधार कार्ड वेरिफिकेशनशी निगडित एक कॉल कुठल्याही क्षणी येऊ शकतो. त्याच क्षणी आपण सावध हुन जा, तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर विचारला जाईल आणि सांगण्यात येईल कि ते आईडिया, एयरटेल किंवा वोडाफोन च्या मुख्य ऑफिस मधून संपर्क करीत आहे. समोरचा व्यक्ती हिंदी भाषेत बोलू शकतो. बोलताना ते तुम्हाला एक बटन दाबायला सांगतील आणि त्यानंतर तुम्हाला फोन वर आलेला एक OTP नंबर विचारण्यात येईल आणि दुसऱ्याच क्षणाला तुमच्या बँकेच्या खात्यातील सगळे पैसे काढून घेण्यात येतील. यानंतर कॉल कट करण्यात येईल. तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी त्या नंबर वर परत संपर्क होणार नाही. मित्रांनो हि वस्तुस्तिथी आहे. अश्या खोट्या आणि बोगस कॉल्स पासून स्वतःचे रक्षण करा. आपल्या कुटुंबाचे रक्षण करा. आपला आधार नंबर कोणालाही सांगू नका. खूप मेहनतीने कमावलेले पैसे तुमच्या एका चुकीने तुम्ही गमावू शकता. जर कुठल्या मोबाइल कंपनी ला किंवा बँकेला आधार कार्ड नंबर ची आवश्यकता असेल ता ते त्याची एक प्रत आपल्या ऑफिस मध्ये जमा करण्यास सांगतात. तुम्हाला स्वतः त्या ऑफिस ला जावं लागत. पण अश्या फसवणाऱ्या कॉल्स पासून तुम्हाला सावध राहण्याची आवश्यकता आहे. या ऑडिओ ला अजून लोकांपर्यंत पोहोचवा. तुमचा विनम्र,
लाइव महाराष्ट्र मधून किशोर गावडे, भांडुप मधून.”
मुंबई पोलीस आपल्या वेरिफाइड ट्विटर अकाउंट वरून महत्वाच्या सूचना लोकांपर्यंत पोहोचवत असतात. त्यांनी २५ जुन रोजी ट्विट करून लोकांना ई-मेल वरून होणाऱ्या फसवेगिरीपासून सावध राहण्यास सांगितले.
व्हायरल होत असलेल्या ऑडिओ क्लिप बद्दल आम्हाला कुठलाही ट्विट त्यांच्या प्रोफाइल वर दिसला नाही.
यानंतर आम्ही मुंबई पोलीस चे प्रवक्ता आणि डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस प्रणय अशोक यांच्या सोबत संपर्क साधला, त्यांनी मुंबई पोलिसांनी अशी कुठलीच ऑडिओ क्लिप प्रसारित केले नसल्याचे सांगितले.
आधार कार्ड बनवणारी संस्था यूनिक आइडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI), वेळोवेळी लोकांना आधार कार्ड आणि त्यासोबत निगडित फ्रॉड बाबत लोकांना सावध करत असते. आम्ही त्यांचे वेरिफाइड ट्विटर प्रोफाइल देखील तपासले त्यावर आम्हाला १७ मार्च २०१८ रोजी केलेला एक ट्विट सापडला. त्यात त्यांनी नमूद केले कि, जर तुम्ही इंटरेट वर आधार कार्ड ला घेऊन कुठल्या सर्व्हिस चा वापर करत असाल तर सावधगिरी बाळगा. डिजिटल ट्रांजैक्शंस करताना सावध रहा.
UIDAI प्रमाणे, ‘आधार हे इतर ओळखपत्रांप्रमाणेच ओळखपत्र आहे आणि कोणत्याही गोपनीय कागदासारखे याला पहिल्या जाऊ शकत नाही. केवळ आधार क्रमांक जाणून घेऊन कुणालाही फसवल्या जाऊ शकत नाही. यासाठी बायोमेट्रिक माहितीची पडताळणी आवश्यक आहे. ‘
व्हायरल ऑडिओ शेअर करणाऱ्या पेज ला दोन हजार लोकं फॉलो करतात.
निष्कर्ष: निष्कर्ष: आधार कार्ड वरून होत असलेल्या फसवेगिरी बद्दल शेअर करण्यात येणारी ऑडिओ क्लिप खोटी आहे. मुंबई पोलिसांनी अशी कुठलीही ऑडिओ क्लिप प्रसारित केली नाही.
- Claim Review : आधार कार्ड बने हुए उनके लिए जरूरी सुचना | GOV. OF INDIA | Mumbai Police जिनके आधार कार्ड बने हुए उनके लिए जरूरी सुचना – सभी सावधान रहे और ये रिकॉर्डिंग जरूर सुने और जल्दी से जल्दी आगे पहुँचाया जाये प्लीज़ – धन्यवाद।
- Claimed By : Sky News India
- Fact Check : False
Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.