Fact Check: तुर्कीमध्ये इमारत पाडतानाच्या जुन्या व्हिडिओशी छेडछाड करून तो बिहारचा असल्याचा सांगून केला गेला व्हायरल
या व्हायरल व्हिडिओबाबत करण्यात आलेला दावा खोटा असल्याचे विश्वास न्यूजला त्यांच्या तपासात आढळून आले. खरे तर ही क्लिप एडिट करण्यात आली आहे. इमारत कोसळण्याचा व्हिडिओ तुर्कीचा आहे, ज्याला एडिट करून वाहत्या पाण्याशी जोडला केला गेला आहे.
- By: Pallavi Mishra
- Published: Oct 3, 2024 at 12:30 PM
नवी दिल्ली (विश्वास न्यूज). बिहारचे अनेक भाग सध्या पूरपरिस्थितीचा सामना करत आहेत. अशा परिस्थितीत सोशल मीडियावर एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक इमारत वेगाने वाहणाऱ्या पाण्यात कोसळून वाहताना दिसत आहे. या व्हिडिओला शेअर करत हा बिहारचा व्हिडिओ असल्याचा दावा केला जात आहे.
या व्हायरल व्हिडिओबाबत करण्यात आलेला दावा खोटा असल्याचे विश्वास न्यूजला त्यांच्या तपासात आढळून आले. खरे तर ही क्लिप एडिट करण्यात आली आहे. इमारत कोसळण्याचा व्हिडिओ तुर्कीचा आहे, ज्याला एडिट करून वाहत्या पाण्याशी जोडला केला गेला आहे.
काय होत आहे व्हायरल?
इन्स्टाग्राम वापरकर्ता kundan_yadav_7325 ने 27 सप्टेंबर रोजी हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “Kiya ho gaya hai bihar me (काय झाले बिहारमध्ये)”.
पोस्टची संग्रहित लिंक येथे पहा.
तपास
व्हायरल दाव्याची सत्यता जाणून घेण्यासाठी आम्ही व्हिडिओचे अनेक कीफ्रेम काढले आणि त्यांचा गुगल लेन्ससह शोध घेण्यास सुरुवात केली. आम्हाला 18 मार्च 2023 रोजी तुर्कीच्या वृत्त वेबसाइट aykiri (आयकिरी) वर कोसळणाऱ्या इमारतीचा व्हिडिओ सापडला. मात्र, त्याठिकाणी पाणी नव्हते, तर कोरडी जमीन होती. बातमीनुसार, हा व्हिडिओ तुर्कीच्या कहरमानमारास येथील एबरार साइटचा आहे, जिथे खराब झालेले ब्लॉक्स नियंत्रित पद्धतीने पाडण्यात आले होते.
आम्हाला हा व्हिडिओ 18 मार्च 2023 रोजी aykiri (आयकिरी) न्यूज वेबसाइटच्या अधिकृत X हँडलवर अपलोड देखील आढळला. तुर्कीच्या कहरमानमारा येथील एबरार साइटवरील हा व्हिडिओ आहे, जिथे खराब झालेले ब्लॉक्स नियंत्रित पद्धतीने पाडण्यात आले होते.
कीवर्ड्सचा शोध घेतल्यानंतर आम्हाला अनेक बातम्या सापडल्या, ज्यामध्ये आम्हाला कहरमारामारास येथील एबेरार येथे झालेल्या डिमॉलिशनबद्दल सांगण्यात आले होते.
व्हायरल व्हिडीओला बिहारचा सांगून व्हायरल केला जात असल्याने, आम्ही पुष्टी करण्यासाठी बिहारमधील दैनिक जागरणच्या पाटणा युनिटमधील इनपुट इन्चार्ज अमित आलोक यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी सांगितले, “सध्या बिहारच्या अनेक भागांत पुरामुळे परिस्थिती गंभीर आहे आणि अनेक इमारतीही पाण्यात बुडाल्या आहेत, पण व्हायरल झालेला व्हिडिओ बिहारचा नाही. व्हिडिओमध्ये दिसणारी इमारत ही एक निवासी बहुमजली इमारत आहे. अशी इमारत कोसळली असती तर ती नक्कीच बातम्यांत आली असती.
बिहारमधील पूरपरिस्थिती
बिहारमध्ये पूरस्थिती गंभीर असून नद्यांच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत आहे. दरम्यान, मदत आणि बचावकार्य सुरू आहे. या प्रकरणात अधिक माहिती या बातम्यांत वाचली जाऊ शकते.
शेवटी, खोट्या दाव्यासह व्हिडिओ शेअर करणाऱ्या वापरकर्त्याचे खाते आम्ही स्कॅन केले. आम्हाला आढळले की, कुंदन यादवला इंस्टाग्रामवर 6000 वापरकर्ते फॉलो करतात.
निष्कर्षः विश्वास न्यूजला त्यांच्या तपासणीत असे आढळले की, व्हायरल व्हिडिओबद्दल केलेला दावा खोटा आहे. खरे तर ही क्लिप एडिट करण्यात आली आहे. इमारत कोसळण्याचा व्हिडिओ तुर्कीचा आहे, ज्याला एडिट करून वाहते पाणी जोडले गेले आहे.
- Claim Review : पुराच्या पाण्यात इमारत कोसळल्याचा व्हिडिओ बिहारचा आहे.
- Claimed By : Instagram User
- Fact Check : False
Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.