Fact Check: अमिताभ बच्चन यांचा AI निर्मित आवाज असलेला हा व्हिडिओ खरा मानत आहेत लोक
विश्वास न्यूजच्या तपासात अमिताभ बच्चन यांचा एआय निर्मित आवाज व्हायरल व्हिडिओमध्ये वापरण्यात आल्याचे समोर आले आहे. वापरकर्ते यास खोटा दावा करून शेअर करत आहेत.
- By: Sharad Prakash Asthana
- Published: Sep 13, 2024 at 06:05 PM
नवी दिल्ली (विश्वास न्यूज). अभिनेते अमिताभ बच्चन यांच्याशी निगडीत एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विविध व्हिडीओ क्लिप एकत्र करून त्यात जातीयवादी आणि भडकाऊ भाषेचा वापर करण्यात आला आहे. काही वापरकर्ते यास शेअर करून दावा करत आहेत की या व्हिडिओमध्ये अमिताभ बच्चन यांनी आपला आवाज देऊन त्यास बनवले आहे.
विश्वास न्यूजच्या तपासात अमिताभ बच्चन यांचा एआय निर्मित आवाज व्हायरल व्हिडिओमध्ये वापरण्यात आल्याचे समोर आले आहे. वापरकर्ते यास खोटा दावा करून शेअर करत आहेत.
काय आहे व्हायरल पोस्ट
वापरकर्त्याने विश्वास न्यूजच्या टिपलाइन क्रमांक +91 9599299372 वर या पोस्टला पाठवून तिची सत्यता सांगण्याची विनंती केली.
फेसबुक वापरकर्ता महेश प्रजापती बायड यांनी 12 सप्टेंबर रोजी हा व्हिडिओ (संग्रहित लिंक) शेअर करताना लिहिले,
“अमिताभ बच्चन यांनी शेवटी आपले मौन तोडले आणि आमचे डोळे उघडण्यासाठी हा व्हिडिओ बनवला कारण अजून उशीर झालेला नाही.”
व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, “या देशात कुठे आहे माणुसकी, जिथे मुलींना दगडांनी ठेचून मारले जाते. जिथे दहशतवाद्यांना उघडपणे समर्थन दिले जाते. शत्रू देशासाठी जिंदाबादच्या घोषणा दिल्या जातात. जिथे संविधानापूर्वी धर्माला मानले जाते. ज्या देशात स्वतः प्रभू राम यांच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, तो देश एक कुटुंब म्हणून जगात कितपत यशस्वी होईल? इथे ज्याने आपल्या धर्माचे पालन केले, तो आज 57 देशांमध्ये आहे, आणि ज्यांनी बंधुता आणि मानवतेचे पालन केले, ते आज आपल्याच देशात आपले अस्तित्व वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत.” व्हिडिओच्या शेवटी त्यास शेअर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
तपास
व्हायरल दाव्याची पडताळणी करण्यासाठी, आम्ही प्रथम अमिताभ यांचे सोशल मीडिया हँडल स्कॅन केले. त्यांचे एक्स आणि फेसबुक खात्यावर आम्हाला असा कोणताही व्हिडिओ आढळला नाही.
गुगलवर शोध घेतल्यानंतरही, व्हायरल दाव्याची पुष्टी करणारा कोणताही मीडिया रिपोर्ट आम्हाला सापडला नाही.
व्हिडिओमध्ये वापरलेल्या आवाजाची पडताळणी करण्यासाठी, आम्ही एआय डिटेक्शन टूल, हाईव्ह मॉडरेशन याने ऑडिओ फाइलचे पहिले 19 सेकंद तपासले. टूलने त्याच्या एआय निर्मित असण्याची शक्यता 95 टक्क्यांहून अधिक दर्शविली आहे.
आमचे भागीदार डीएयू (एमसीएचा एक उपक्रम) ने ट्रू मीडिया डिटेक्शन टूलच्या मदतीने त्यास तपासले. त्यामध्ये या टूलने एआय निर्मित आवाज वापरण्याची शक्यता व्यक्त केली.
याबाबत आम्ही एआय एक्स्पर्ट अंश मेहरा यांच्याशी संपर्क साधला. त्यांचे म्हणणे आहे की, त्यात वापरलेला आवाज हा, एआय टूलच्या मदतीने तयार करण्यात आला आहे.
खोट्या दाव्यासह व्हिडिओ शेअर करणाऱ्या फेसबुक वापरकर्त्याचे प्रोफाइल आम्ही स्कॅन केले. गुजरातमधील बयड येथे राहणाऱ्या या वापरकर्त्याचे पाच हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत.
निष्कर्ष: सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये अमिताभ बच्चन यांचा एआय निर्मित आवाज वापरण्यात आला आहे. वापरकर्ते त्यास खरा असल्याचे समजून शेअर करत आहेत.
- Claim Review : अमिताभ बच्चन यांनी आपला आवाज देत हा व्हिडिओ बनवला आहे.
- Claimed By : FB User- महेश प्रजापती बायड
- Fact Check : False
Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.