Fact Check: सीरियामध्ये आयएसआयएसच्या हल्ल्याचा व्हिडिओ पॅलेस्टाईन-इस्रायलशी जोडून केला जात आहे शेअर
विश्वास न्यूजला त्यांच्या तपासणीत असे आढळले की, हा व्हिडिओ, जेव्हा दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटने हल्ला केला होता, त्यावेळचा सीरियाच्या रक्का येथील मशिदीचा आहे. हा व्हिडिओ पॅलेस्टाईन आणि इस्रायलशी जोडून भ्रामक दाव्यासह व्हायरल केला जात आहे.
- By: Umam Noor
- Published: Oct 24, 2023 at 03:53 PM
विश्वास न्यूज (नवी दिल्ली). इस्त्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात नुकत्याच झालेल्या हल्ल्यानंतर सोशल मीडियावर या संदर्भात अनेक दावे व्हायरल होत आहेत. या एपिसोडमध्ये एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये मशिदीच्या आतमध्ये स्फोट होताना दिसत आहे. व्हिडिओ शेअर करताना वापरकर्ते दावा करत आहेत की, हा इस्रायलद्वारे पॅलेस्टाईनवरील हल्ल्याचा व्हिडिओ आहे.
जेव्हा 2014 मध्ये इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेने सीरियातील रक्का येथील एका मशिदीवर हल्ला केला होता. हा व्हिडिओ पॅलेस्टाईन आणि इस्रायलशी जोडून भ्रामक दाव्यासह व्हायरल केला जात आहे.
काय आहे व्हायरल पोस्टमध्ये?
फेसबुक वापरकर्त्याने ही पोस्ट शेअर करत लिहिले की, “अहो, निदान कमीत कमी अजान तर पूर्ण होऊ दिली असती. आपल्या प्रार्थना इतक्या लवकर कबुल होतील असे या मुल्लानाही वाटले नसेल…! #WeStandWithIsrael”.
पोस्टची संग्रहित आवृत्ती येथे पहा.
तपास
आमचा तपास सुरू करत आम्ही सर्वप्रथम गुगल लेन्सच्या माध्यमातून व्हायरल व्हिडिओ शोधण्यास सुरुवात केली. 23 जून 2014१४ रोजी, zohreanaforum डॉट कॉम या संकेतस्थळावर प्रकाशित झालेल्या व्हिडिओचा स्क्रीनशॉट आम्हाला सापडला. बातमीत दिलेल्या माहितीनुसार, इस्लामिक स्टेटने सीरियातील रक्का येथे एका समाधीस्थळावर हल्ला केला.
याच आधारावर आम्ही आमचा तपास पुढे नेला आणि आम्हाला हा व्हिडिओ 8 जून 2014 रोजी एका यूट्यूब चॅनेलवर अपलोड झाल्याचे आढळले. येथे दिलेल्या माहितीनुसार, आयसिसने सीरियातील रक्का येथील ओवैस अल – करणी मशिदीवर हल्ला केला आहे.”
शटर स्टॉकच्या वेबसाइटवर व्हायरल व्हिडिओतील मशिदी पाहिली जाऊ शकते. येथे दिलेल्या माहितीनुसार, ही, सीरियातील रक्का येथील ओवैस अल – करनी मशिद आहे.
आम्ही सीरियन पत्रकार इझअलदिन अल कासिम यांच्याशी संपर्क साधला आणि व्हायरल व्हिडिओ त्यांच्याशी शेअर केला. त्यांनी पुष्टी करताना सांगितले की, हा व्हिडिओ, इसिसने सीरियातील एका मशिदीवर झालेल्या बॉम्बहल्ल्याचा आहे.
दिशाभूल करणारी पोस्ट शेअर करणाऱ्या फेसबुक वापरकर्त्याच्या सोशल स्कॅनिंगमध्ये आम्हाला आढळले की ‘दीपक चोयल’ या वापरकर्त्याला एक हजाराहून अधिक लोक फॉलो करतात.
निष्कर्ष: विश्वास न्यूजला त्यांच्या तपासणीत असे आढळले की, हा व्हिडिओ, जेव्हा दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटने हल्ला केला होता, त्यावेळचा सीरियाच्या रक्का येथील मशिदीचा आहे. हा व्हिडिओ पॅलेस्टाईन आणि इस्रायलशी जोडून भ्रामक दाव्यासह व्हायरल केला जात आहे.
- Claim Review : हा व्हिडिओ, इस्रायलने पॅलेस्टाईनवर केलेल्या हल्ल्याचा आहे.
- Claimed By : FB वापरकर्ता: दीपक चोयल
- Fact Check : Misleading
Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.