X
X

Fact Check: हंगेरीमध्ये पहिला सामना गमावल्यानंतर, सामन्यात पुनरागमन करून संगीता फोगाटने जिंकले कांस्यपदक

नवी दिल्ली (विश्‍वास न्यूज). भाजप खासदार आणि निवृत्त भारतीय कुस्ती संघटनेचे प्रमुख बृजभूषण शरण सिंग यांच्याविरोधात कुस्तीपटूंच्या आंदोलनामुळे चर्चेत आलेल्या संगीता फोगट हिच्याबद्दल सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. भारतीय महिला कुस्तीपटू संगीता फोगाट हंगेरीमध्ये 0-10ने हरल्याचा दावा केला जात आहे. यास शेअर करून वापरकर्ते संगीता फोगटला लक्ष्य करत आहेत.

विश्वास न्यूजला आपल्या तपासणीत असे आढळून आले की, हंगेरी रँकिंग मालिका स्पर्धेतील पहिल्या सामन्यात 0-10ने पराभूत झाल्यानंतर, संगीता फोगटने पुढील सामन्यात पुनरागमन केले आणि स्पर्धेत कांस्यपदक जिंकले. सोशल मीडियावर व्हायरल झालेला दावा दिशाभूल करणारा आहे.

काय आहे व्हायरल पोस्ट?

फेसबुक वापरकर्ता ‘रामकुमार जी‘ (संग्रहित लिंक)ने 19 जुलै रोजी संगीता फोगाटच्या सामन्याचा फोटो पोस्ट केला आणि लिहिले,

“मेव्हणा मेव्हणी गँगची खेळाडू संगीता फोगाटने काल 0-10च्या मोठ्या फरकाने हारून देशाचे नाव खराब केले.

आणि त्यांना थेट ऑलिम्पिकमध्ये खेळायचे आहे

सरकारला विनंती आहे की अशा खेळाडूंना कायमस्वरूपी घरी बसवावे, अन्यथा हे लोक भारतीय कुस्तीची लंका बनवून टाकतील.
ते फक्त 10 -0 गमावण्याच्या भीतीने सांगत होते की, आम्ही थेट ऑलिम्पिक खेळू आणि नॅशनल किंवा इंटरनॅशनल खेळणार नाही.

फेसबुक वापरकर्ता ‘बीर चौधरी’ (संग्रहित लिंक)ने 18 जुलै रोजी हा फोटो शेअर केला आणि लिहिलेः

“या जाट बहिणीने किती महिला खेळाडूंचा हक्क खाऊन टाकला आहे याचा विचार करा. आणि स्वतः हरून बसली आहे.”

तपास

व्हायरल दाव्याची चौकशी करण्यासाठी, आम्ही प्रथम कीवर्डसह गुगलवर त्याबद्दल शोधले. 16 जुलै रोजी ही बातमी दैनिक जागरणच्या संकेतस्थळावर पीटीआई (PTI)च्या हवाल्याने प्रसिद्ध करण्यात आली होती. 15 जुलै रोजी, संगीता फोगाटने हंगेरी रँकिंग मालिका स्पर्धेत गैर-ऑलिम्पिक 59 कि.ग्रॅ. वर्गात कांस्यपदक जिंकले. बृजभूषण शरण सिंग यांच्याविरोधात जंतर-मंतर येथे झालेल्या आंदोलनात ती सहभागी झाली होती. पहिल्या मॅचमध्ये अमेरिकन जेनिफर पेज रॉजर्सने संगीताचा पराभव केला, पण दुसऱ्या मॅचमध्ये ती जिंकली. सेमीफायनल मॅच गमावल्यानंतर तिने हंगेरीमध्ये अंडर-20 विश्वचषक स्पर्धेत रौप्यपदक जिंकले.

डेक्कन हेराल्ड ने 16 जुलै रोजी आयएएनएस (IANS)च्या हवाल्याने याबाबत एक वृत्त प्रकाशित केले आहे. हंगेरीत झालेल्या कुस्ती स्पर्धेत अमेरिकन जेनिफर पेजकडून झालेल्या पराभवामुळे संगीता फोगाटने रेपचेज राऊंडच्या माध्यमातून सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. पहिला सामना गमावल्यानंतर तिने पुनरागमन केले आणि अमेरिकन कुस्तीपटूचा पराभव केला. तथापि, तिला सेमीफायनलमध्ये पोलंडच्या कुस्तीपटूकडून 4 -6ने प्रभाव पत्करावा लागला आणि अंतिम फेरीत पोहोचू शकली नाही, परंतु तिसऱ्या-चौथ्या स्थानासाठीच्या सामन्यात तिने हंगेरीच्या कुस्तीपटूला पराभूत करून कांस्यपदक जिंकले.

यानंतर आम्ही गुगल लेन्सच्या मदतीने व्हायरल फोटोचा शोध घेतला. दैनिक जागरण (संग्रहित लिंक)चे क्रीडा संपादक, अभिषेक त्रिपाठी यांनी 15 जुलै रोजी हे चित्र ट्विट केले आणि लिहिले की, भारतीय कुस्तीपटू संगीता बुडापेस्ट, हंगेरी येथे जागतिक क्रमवारी स्पर्धेच्या 59 कि.ग्रॅ. श्रेणीच्या पहिल्या सामन्यात अमेरिकेच्या जेनिफर पेज रॉजर्सकडून 0-10ने हरली.

युनायटेड वर्ल्ड रेसलिंग वेबसाइटवर, हंगेरीमध्ये झालेल्या कुस्ती स्पर्धेच्या 59 कि.ग्रॅ. श्रेणीचा परिणाम पाहिला जाऊ शकतो. जेनिफर पेजकडून सलामीचा सामना हरल्यानंतर संगीताने पुनरागमन केल्याचे दिसून येत आहे.

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी 16 जुलै रोजी संगीताचा एक फोटो ट्विट केला आणि कांस्य पदक जिंकल्याबद्दल तिचे अभिनंदन केले.

https://twitter.com/ianuragthakur/status/1680474207011094528

याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी आम्ही दैनिक जागरणचे क्रीडा संपादक, अभिषेक त्रिपाठी यांच्याशी बोललो. ते म्हणतात, “पहिला सामना गमावल्यानंतर, संगीताने पुनरागमन केले आणि मॅचमध्ये कांस्यपदक जिंकले आहे.”

तर, “खेल टुडे नियतकालिकाचे संपादक राकेश थापलियाल म्हणाले, “कुस्तीच्या रेपचेज नियमानुसार, जर एखादा कुस्तीपटू पहिल्या फेरीत हरला आणि त्यातील एक अंतिम फेरीत पोहचला, तर दुसऱ्याला कांस्यपदक जिंकण्याची आणखी एक संधी मिळते.”

3 ऑगस्ट 2021 रोजी आजतक मध्ये प्रकाशित झालेल्या बातमीमध्ये असे लिहिले गेले आहे की, रेपचेज नियमानुसार, जे दोन कुस्तीपटू अंतिम फेरीत पोहोचले आहेत आणि त्यांना नॉकआउट किंवा प्रारंभिक फेरीत पराभूत केले आहेत, त्या खेळाडूंना रेपचेज राऊंडद्वारे कांस्यपदक जिंकण्याची संधी मिळते. 2008 बीजिंग ऑलिम्पिकमध्ये सुशील कुमारला कांस्यपदक, 2012 लंडन ऑलिम्पिकमध्ये योगेश्वर दत्तला कांस्यपदक आणि 2016च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये साक्षी मलिकला कांस्यपदक मिळाले होते.

तपासाच्या शेवटी, आम्ही दिशाभूल करणारे दावे करणाऱ्या ‘राज कुमार जी’ या फेसबुक वापरकर्त्याचे प्रोफाइल स्कॅन केले. तो एक विचारसरणीने प्रभावित आहे.

निष्कर्षः हंगेरीमध्ये झालेल्या कुस्ती स्पर्धेत, भारतीय महिला कुस्तीपटू संगीता फोगट, पहिल्या सामन्यात अमेरिकन कुस्तीपटूकडून 0-10ने पराभूत झाली, परंतु त्यानंतरच्या सामन्यात तिने आगमन केले आणि स्पर्धेत कांस्यपदक जिंकले.

  • Claim Review : भारतीय महिला कुस्तीपटू संगीता फोगाट हंगेरीमध्ये 0-10ने हरली.
  • Claimed By : एफबी (FB) वापरकर्ता - राम कुमार जी
  • Fact Check : Misleading
Misleading
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later