X
X

Fact Check: सलमान रश्दी यांनी मुस्लिमांबाबत नाही केले हे विधान, दावा खोटा आहे

  • By: Umam Noor
  • Published: Jun 30, 2023 at 02:53 PM

नवी दिल्ली (विश्वास न्यूज). भारतीय वंशाचे लेखक सलमान रश्दी अनेकदा मुस्लिम आणि इस्लामशी संबंधित त्यांच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. याच मालिकेमध्ये रश्दी यांचे वक्तव्य असलेल्या एका वक्तव्याचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात मुस्लिमांविषयी आक्षेपार्ह गोष्ट सांगितली गेली आहे. या पोस्टमध्ये सलमान रश्दीचा फोटो आहे आणि खाली त्यांचे नांव लिहिले आहे आणि असा दावा केला जात आहे की, त्यांनी मुस्लिमांविषयी हे वक्तव्य केले आहे.

विश्वास न्यूजने या व्हायरल पोस्टची चौकशी केली असता त्यांना असे आढळून आले की, हे व्हायरल केले जात असलेले वक्तव्य सलमान रश्दी यांनी मुस्लिमांबाबत केलेले नाही. त्यांनी स्वत: ट्विट करून हे खोटे असल्याचे म्हटले आहे.

काय आहे व्हायरल पोस्टमध्ये?

व्हायरल पोस्ट शेअर करताना एका फेसबुक वापरकर्त्याने लिहिले की, “मुस्लिम मग ते पाकिस्तानात राहोत किंवा भारतात, नायजेरियात किंवा सीरियात, मग ते गरीब असोत वा श्रीमंत, अशिक्षित असोत किंवा सुशिक्षित, त्यांचे एकमेव लक्ष्य इस्लामच्या नावावर दहशतवाद, बॉम्बस्फोट, लोकसंख्येचा स्फोट, दंगली, जिहाद घडवून आणून संपूर्ण देश उद्ध्वस्त करणे असते.”

या पोस्टची संग्रहित आवृत्ती येथे पहा.

तपास

आमचा तपास सुरू करून, आम्ही सर्वात प्रथम बातमीचा शोध घेतला. शोधात आम्हाला सलमान रश्दीचे असे कोणतेही विधान सापडले नाही. असे कोणतेही विधान खरे असते, तर ते कधी ना कधी प्रसारमाध्यमांमध्ये नक्कीच प्रसिद्ध झाले असते.

तपास पुढे नेत आम्ही सलमान रश्दीच्या ट्विटर हँडलवर पोहोचलो, 6 ऑगस्ट 2020 रोजी एका ट्विटर वापरकर्त्याला उत्तर देताना त्यांनी हे विधान खोटे असल्याचे म्हटले आहे.

व्हायरल पोस्टची पुष्टी करण्यासाठी आम्ही दैनिक जागरण येथे आंतरराष्ट्रीय बातम्या कव्हर करणारे पत्रकार जे. पी. रंजन यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांनी आम्हाला सांगितले की, रश्दी अनेकदा अशी विधाने करतात, त्यानंतर त्यांच्यावर टीका केली जाते. मात्र, व्हायरल होत असलेले हे विधान त्यांचे नाही.

रश्दी अनेकदा त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे किंवा त्यांच्या पुस्तकांतील उतारे यामुळे चर्चेत असतात. अशा काही प्रकरणांच्या बातम्या इथे वाचता येतील.

विशेष म्हणजे, ऑगस्ट 2022मध्ये न्यूयॉर्कमध्ये सलमान रश्दी यांच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला करण्यात आला होता, बातम्यांनुसार, एका कार्यक्रमात व्याख्यान देण्यासाठी गेलेल्या रश्दी यांना हल्लेखोराने अनेक ठोसे मारले, त्यानंतर चाकूने अनेक वार केले.

या हल्ल्यानंतर, ऑगस्ट 2022 मध्ये सलमान रश्दी यांच्या मृत्यूशी संबंधित अफवा देखील व्हायरल झाली, ज्याचे फॅक्ट चेक, विश्वास न्यूजच्या वेबसाइटवर वाचता येईल.

फेक पोस्ट शेअर करणाऱ्या फेसबुक वापरकर्त्याच्या सोशल स्कॅनिंगमध्ये आम्हाला आढळले की, वापरकर्ता पश्चिम बंगालचा आहे.

निष्कर्ष: विश्वास न्यूजने व्हायरल पोस्टचा तपास केला आणि त्यांना आढळले की, सलमान रश्दी यांनी मुस्लिमांबद्दल व्हायरल केले जात असलेले विधान केले नाही. त्यांनी स्वत: ट्विट करून हे खोटे असल्याचे म्हटले आहे.

Claim Review: सलमान रश्दी यांनी मुस्लिमांबाबत हे विधान केले आहे.
Claimed By: लालू दास
Fact Check: खोटे

  • Claim Review : सलमान रश्दी यांनी मुस्लिमांबाबत हे विधान केले आहे.
  • Claimed By : लालू दास
  • Fact Check : False
False
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later