Fact Check: मलंगगड किल्ल्यावरील एकनाथ शिंदे यांच्याद्वारे चादर चढवतानाचा व्हिडिओ हाजी अली दर्ग्याचा सांगून व्हायरल
- By: Ashish Maharishi
- Published: Mar 27, 2023 at 03:47 PM
नवी दिल्ली (विश्वास न्यूज). महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ते भगव्या रंगाची चादर चढवतानाच दिसत आहे. सोशल मीडियावर काही वापरकर्ते हा व्हिडीओ मुंबईतील हाजी अली दर्ग्याचा सांगून व्हायरल करत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हाजी अली दर्ग्यात चादर चढवल्याचा दावा केला जात आहे.
विश्वास न्यूजने व्हायरल पोस्टची सत्यता तपासली. हा दावा दिशाभूल करणारा निघाला. हा व्हिडिओ ठाण्यातील मलंगगड किल्ल्याचा आहे. 5 फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने तेथे चादर अर्पण करण्यात आली. त्याच वेळेच्या व्हिडिओला मुंबईतील हाजी अली दर्ग्याचा सांगून व्हायरल केले जात आहे.
काय व्हायरल होत आहे
याने 15 फेब्रुवारीला ३० सेकंदांचा व्हिडिओ पोस्ट केला, ज्यात दावा केला गेला आहे की, “मुख्यमंत्री असा धाडसी असायला हवा. एकनाथ शिंदे यांनी हाजी अली दर्गा-मुंबई येथे जाऊन ॐ, स्वस्तिक, त्रिशूल चिन्हे असलेली भगव्या रंगाची चादर चढवली आहे ते पहा. याला म्हणतात, 100 दणके सोनाराचे आणि 1 दणका लोहाराचा.
पोस्ट खरी असल्याचे गृहीत धरून इतर वापरकर्तेही तिला व्हायरल करत आहेत. त्याची संग्रहित आवृत्ती येथे पाहिली जाऊ शकते.
तपास
विश्वास न्यूजने प्रथम गुगल ओपन सर्च टूलचा वापर करून व्हायरल व्हिडीओ आणि त्यासोबत करण्यात येत असलेल्या दाव्याची सत्यता तपासली. संबंधित कीवर्ड टाईप करून शोधल्यावर, आम्हाला अशी एकही बातमी सापडली नाही, ज्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईतील हाजी अली दर्ग्यात चादर चढवायला गेले होते याची पुष्टी होईल. तथापि, तपासादरम्यान अनेक बातम्या आणि व्हिडिओंमधून असे आढळून आले की, मुख्यमंत्री 5 फेब्रुवारी 2023 रोजी ठाणे जिल्ह्यातील मलंगगड येथे गेले होते. आम्हाला लोकमतच्या यूट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ सापडला, ज्यामध्ये मलंगगडमध्ये मुख्यमंत्र्यांच्या वतीने चादर चढवल्याचे सांगण्यात आले. खाली पूर्ण व्हिडिओ पाहिला जाऊ शकतो.
तपासादरम्यान, पीटीआयच्या वेबसाइटवर व्हायरल व्हिडिओशी संबंधित एक चित्र आणि अहवाल देखील सापडला. 5 फेब्रुवारी 2023 रोजी प्रकाशित झालेल्या या अहवालात, एकनाथ शिंदे हे ठाण्यातील कल्याणजवळील मलंगगड किल्ल्यावरील महाआरतीला उपस्थित होते असे नमूद केले आहे. संपूर्ण बातमी येथे वाचली जाऊ शकते.
विश्वास न्यूजने तपास पुढे नेत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सोशल मीडिया अकाउंट स्कॅन करण्यास सुरुवात केली. त्यांच्या ट्विटर हँडलवर एक पोस्ट आढळली. 5 फेब्रुवारी, 2023 रोजी चार छायाचित्रे पोस्ट करताना लिहिले होते की, त्यांनी ठाण्यातील मलंगगड येथील मच्छिंद्रनाथजींचे दर्शन घेतले. येथील छायाचित्रात दिसणारे लोक आणि व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणारे ठिकाण, लोक सारखेच आहेत.
विश्वास न्यूजने तपास पुढे नेत, एकनाथ शिंदे यांचे मिडिया समन्वयक श्री. विराज मुळे यांच्याशी संपर्क साधला. ते म्हणाले की, एकनाथ शिंदे हे गेल्या महिन्यात मलंगगड येथे गेले होते. याशिवाय त्यांनी आजपर्यंत एकाही समाधीला भेट दिली नाही.
अंतिम टप्प्यात विश्वास न्यूजने दिशाभूल करणारी पोस्ट शेअर करणाऱ्या सोशल मीडिया यूजरची चौकशी केली. सोशल स्कॅनिंगमध्ये बालोत्रा येथील रहिवासी असलेला फेसबुक वापरकर्ता सुरेश पालीवाल एका राजकीय पक्षाशी संबंधित असल्याचे आढळून आले. सहा हजारांहून अधिक लोक त्याला फॉलो करतात.
निष्कर्ष: दावा दिशाभूल करणारा असल्याचे सिद्ध झाले. हा व्हिडिओ ठाण्यातील मलंगगड किल्ल्याचा आहे. 5 फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने तेथे चादर अर्पण चढवण्यात आली होती. त्याच वेळेच्या व्हिडिओला मुंबईतील हाजी अली दर्ग्याचा सांगून व्हिडिओ व्हायरल होत आहे.
- Claim Review : एकनाथ शिंदे यांनी हाजी अली दर्ग्यावर चादर चढवली
- Claimed By : फेसबुक वापरकर्ता सुरेश पालीवाल
- Fact Check : Misleading
Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.