X
X

Fact Check: मंदिरातून सूर्य दिसणारा व्हायरल दावा ओडिशातील कोणार्कचा नाही

विश्वास न्यूजने तपास केला आणि ओडिशातील कोणार्क सूर्य मंदिराचा व्हायरल दावा खोटा असल्याचे आढळले. हे छायाचित्र थायलंडमधील प्रसात हिन फानोम रुंग मंदिराचे आहे. ज्याचा भ्रामक दावा सोशल मीडियावर शेअर केला जात आहे.

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): ओडिशाच्या कोणार्क सूर्य मंदिराच्या नावाने एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मंदिराच्या आतून सूर्य उगवल्याचा दावा करत हे छायाचित्र शेअर केले जात आहे. हे विस्मयकारक दृश्य 200 वर्षांतून एकदाच पाहायला मिळते असे देखील त्यात सांगितले होते. विश्वास न्यूजने तपास केला असता हा व्हायरल दावा खोटा असल्याचे आढळून आले. हे छायाचित्र थायलंडमधील प्रसात हिन फानोम रुंग मंदिराचे आहे. ज्याचा भ्रामक दावा सोशल मीडियावर शेअर केला जात आहे.

काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर Deenadayalan Sankarapandian ने 16 नव्हेंबर 2022 रोजी व्हायरल दावा शेअर केला चित्रावर लिहले होते, ओडिशातील कोणार्क सूर्य मंदिराचे हे चित्र आहे. या मंदिराच्या आतून सूर्य उगवतो. हा अद्भुत क्षण 200 वर्षांतून एकदाच येतो.

हि पोस्ट बाकी यूजर्स देखील शेअर करत आहेत. हि पोस्ट आणि ह्याचा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:

व्हायरल दाव्याच्या मागील सत्य जाणून घेण्यासाठी, आम्ही फोटोचा गूगल रिव्हर्स इमेज सर्च केला. दरम्यान, आम्हाला शटरस्टोक अपलोड केलेले व्हायरल चित्र सापडले. दिलेल्या माहितीनुसार, चित्र 6 ऑक्टोबर 2018 रोजी क्लिक करण्यात आले होते. हे छायाचित्र थायलंडमधील प्रसात हिन फानोम रुंग हिस्टोरिकल पार्कचे आहे.

तपास पुढे नेत, आम्ही संबंधित कीवर्डसह गूगल वर शोधण्यास सुरुवात केली. या दरम्यान आम्हाला थायलंडची न्यूज वेबसाइट बँकॉक पोस्टवर प्रसात हिन फानोम रुंग मंदिराशी संबंधित एक अहवाल देखील सापडला. रिपोर्टमध्ये, व्हायरल फोटोचे वर्णन थायलंडमधील प्रसात हिन फानोम रुंग मंदिर असे करण्यात आले आहे. यासोबतच हा प्रकार वर्षातून चार वेळा पाहिल्याचेही सांगण्यात आले आहे. जेव्हा सूर्य एका रेषेत येतो आणि एकाच वेळी सर्व 15 दरवाजांमधून सूर्य दिसू शकतो.

आम्हाला हे चित्र थायलंडमधील इतर बातम्यांच्या वेबसाइटवर देखील आढळले. सर्वत्र या चित्राचे वर्णन प्रसात हिन फानोम रंग असे केले आहे.

अधिक माहितीसाठी, कोणार्क सूर्य मंदिराचे कव्हरेज करणाऱ्या ओडिशातील पत्रकार फ्लोरा कुमारी यांच्याशी आम्ही संपर्क साधला. त्यांनी आम्हाला सांगितले की व्हायरल दावा खोटा आहे. हा दावा गेल्या अनेक वर्षांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पूर्ण पुष्टीकरणासाठी आम्ही थायलंडच्या पर्यटन मंत्रालयाशी मेलद्वारे संपर्क साधला आहे. त्यांनी आम्हाला सांगितले की व्हायरल दावा खोटा आहे. हे चित्र प्रसात हिन फानोम रुंग मंदिराचे आहे.

तपासाअंती, आम्ही फेसबुक वापरकर्त्या Deenadayalan Sankarapandian ची चौकशी केली ज्याने खोट्या दाव्यासह पोस्ट शेअर केली. फेसबुकवर युजरचे पाच मित्र आणि 226 फॉलोअर्स असल्याचे तपासात समोर आले आहे. एप्रिल 2019 पासून वापरकर्ता फेसबुकवर सक्रिय आहे.

निष्कर्ष: विश्वास न्यूजने तपास केला आणि ओडिशातील कोणार्क सूर्य मंदिराचा व्हायरल दावा खोटा असल्याचे आढळले. हे छायाचित्र थायलंडमधील प्रसात हिन फानोम रुंग मंदिराचे आहे. ज्याचा भ्रामक दावा सोशल मीडियावर शेअर केला जात आहे.

  • Claim Review : व्हायरल चित्र ज्यात मंदिरातून सूर्य दिसतो ते कोणार्क मंदिराचे आहे
  • Claimed By : Deenadayalan Sankarapandian
  • Fact Check : False
False
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later