Fact Check: राम मंदिर चे उदघाटन 1 जानेवारी 2023 रोजी होणार नाही, व्हायरल दावा खोटा आहे
राम मंदिर चे 1 जानेवारी 2023 रोजी उदघाटन होणार नाही. मंदिराचे उदघाटन 2024 साली होईल. व्हायरल दावा खोटा आहे.
- By: Ankita Deshkar
- Published: Nov 24, 2022 at 06:10 PM
नवी दिल्ली (विश्वास न्यूज): विश्वास न्यूज ला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर प्रसारित होत असलेली पोस्ट समोर आली. 1 जानेवारी 2023 रोजी राम मंदिराचे उद्घाटन होणार असल्याचे पोस्टमध्ये म्हटले आहे. विश्वास न्यूजने या दाव्याचा तपास केला आणि असे आढळले की अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन 2024 मध्ये होणार आहे.
काय होत आहे व्हायरल?
Facebook user Rajesh Sharma ने एक पोस्ट शेअर केली फेसबुक ग्रुप, Narendra Modi fans वर आणि हिंदी मध्ये लिहले, “खुश खबरी 1 जनवरी 2023 को राम मंदिर का उद्घाटन होगा, जानकर जिनको खुशी हुई तो #जयश्रीराम
भाषांतर: “चांगली बातमी, 1 जानेवारी 2023 रोजी राममंदिराचे उद्घाटन होणार आहे. हे वाचून ज्यांना आनंद होत आहे त्यांना #जयश्रीराम”
हि पोस्ट आणि त्याचा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.
तपास:
विश्वास न्यूज ने गूगल सर्च पासून सुरुवात केली.
आम्हाला Financial Express च्या वेबसाईट वर एक बातमी मिळाली, ज्याचे शीर्षक होते: Ram temple construction moving at brisk pace, trust targets early 2024 opening
हि रिपोर्ट इथे वाचा.
आम्हाला हिंदुस्थान टाइम्स च्या वेबसाईट वर देखील एक रिपोर्ट सापडली, ज्याचे शीर्षक होते: Ram temple trust pulls out all stops to meet Jan 2024 deadline
रिपोर्ट मध्ये म्हंटले होते: डिसेंबर 2023 ते 15 जानेवारी 2024 दरम्यान राम मंदिराचे उद्घाटन सुनिश्चित करण्यासाठी ट्रस्टने पाच कार्यशाळांमध्ये काम सुरू केले आहे.
टाइम्स ऑफ इंडिया च्या एका बातमी मध्ये देखील सांगितले होते कि राम मंदिर जानेवारी 2024 मध्ये लोकांकरता उघडेल.
तपासाच्या पुढच्या टप्प्यात आम्ही ‘श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र’ वेबसाइटवर दिलेल्या हेल्पलाइन क्रमांकाशी संपर्क साधला. जानेवारी २०२४ मध्ये मकर संक्रांतीच्या शुभ दिवशी मंदिराचे उद्घाटन होणार असल्याची माहिती समोरच्या व्यक्तीने दिली.
विश्वास न्यूजने दैनिक जागरणचे अयोध्या प्रतिनिधी राम शरण ह्यांना देखील संपर्क केला, ज्यांनी आम्हाला कळवले की 1 जानेवारी 2023 रोजी राम मंदिर जनतेसाठी खुले होणार नाही. व्हायरल दावा खोटा आहे.
पुढच्या टप्प्यात, विश्वास न्यूजने श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे ट्रस्टी डॉ अनिल मिश्रा यांच्याशीही संपर्क साधला. विश्वास न्यूजशी संवाद साधताना डॉ मिश्रा म्हणाले, “1 जानेवारी 2023 रोजी राम मंदिराचे उद्घाटन होणार नाही. व्हायरल झालेली पोस्ट खोटी आहे. ट्रस्टने 14 जानेवारी 2024 नंतर एक शुभ दिवस निवडल्यानंतर, श्रीरामाची मूर्ती स्थापित केली जाईल. .”
तपासाच्या शेवटच्या टप्प्यात विश्वास न्यूवज ने पोस्ट शेअर करणाऱ्या यूजर चे, Rajesh Sharma चे सोशल बॅकग्राउंड चेक केले. त्यात कळले कि राजेश शर्मा हे Nylowear India मध्ये पार्टनर आहेत.
निष्कर्ष: राम मंदिर चे 1 जानेवारी 2023 रोजी उदघाटन होणार नाही. मंदिराचे उदघाटन 2024 साली होईल. व्हायरल दावा खोटा आहे.
- Claim Review : 1 जानेवारी 2023 रोजी राम मंदिर उघडणार
- Claimed By : Rajesh Sharma
- Fact Check : False
Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.