X
X

Fact Check: कार्टून नेटवर्क बंद होत नाही आहे, व्हायरल दावा खोटा आहे

विश्वास न्यूजने आपल्या तपासणीत हा व्हायरल दावा खोटा असल्याचे आढळले. कार्टून नेटवर्क थांबणार नाही. कार्टून नेटवर्क चॅनलने याबाबत स्पष्टीकरण जारी केले असून, हे चॅनल बंद केले जाणार नाही आणि हा दावा खोटा असल्याचे म्हटले आहे.

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल मीडियावर अनेक पोस्ट व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये कार्टून नेटवर्क चॅनल कायमचे बंद होणार असल्याचा दावा केला जात आहे. विश्वास न्यूजने केलेल्या तपासात हा व्हायरल दावा खोटा असल्याचे आढळून आले. कार्टून नेटवर्क चॅनलने याबाबत स्पष्टीकरण जारी केले असून, हे चॅनल बंद केले जाणार नाही आणि हा दावा खोटा असल्याचे म्हटले आहे.

काय होत आहे व्हायरल?

फेसबुक यूजर ‘Dank Posts‘ (आर्काइव लिंक) ने 15 ऑक्टोबर रोजी स्क्रीनशॉट शेअर करून लिहले, “Cartoon Network is Shutting Down”

तपास:
व्हायरल दावा तपासण्यासाठी, आम्ही प्रथम कीवर्ड शोध केला. आम्हाला कार्टून नेटवर्कच्या वेरिफाइड ट्विटर हँडलवर या संदर्भात एक ट्विट आढळले. व्हायरल पोस्टला नकार देत, ट्विटमध्ये असे लिहिले आहे की, “Y’all we’re not dead, we’re just turning 30 😂 To our fans: We’re not going anywhere. We have been and will always be your home for beloved, innovative cartoons More to come soon!” मराठी भाषांतर: “आम्ही मेलेले नाही, आम्ही फक्त 30 वर्षांचे झाले आहोत. आमच्या चाहत्यांसाठी: आम्ही कुठेही जात नाही. गोंडस, नाविन्यपूर्ण कार्टूनसाठी आम्ही नेहमीच तुमच्यासाठी घेऊन येऊ आणि अजून बरेच काही करायचे आहे!”

https://twitter.com/cartoonnetwork/status/1581019585478037504?s=20&t=j84RslaNRfNHfuv76bi4ng

कार्टून नेटवर्कच्या या ट्विटबाबत आम्हाला अनेक अहवालही प्राप्त झाले आहेत ज्यात म्हटले आहे की कार्टून नेटवर्क बंद झाल्याच्या अफवेनंतर, कार्टून नेटवर्क चॅनेलने स्पष्टीकरण दिले आहे की चॅनल बंद होत नाही आणि ही निव्वळ अफवा आहे.

याबाबत आम्ही मनोरंजन पत्रकार स्मिता श्रीवास्तव ह्यांना संपर्क केला. कार्टून नेटवर्क बंद होत नसल्याची पुष्टीही त्यांनी दिली आणि चॅनलनेच याला दुजोरा दिला आहे.

आम्ही फेक पोस्ट शेअर करणाऱ्या ‘डँक पोस्ट्स’ फेसबुक युजरचे प्रोफाईल स्कॅन केले. त्यानुसार युजरचे 56000 फॉलोअर्स आहेत.

निष्कर्ष: विश्वास न्यूजने आपल्या तपासणीत हा व्हायरल दावा खोटा असल्याचे आढळले. कार्टून नेटवर्क थांबणार नाही. कार्टून नेटवर्क चॅनलने याबाबत स्पष्टीकरण जारी केले असून, हे चॅनल बंद केले जाणार नाही आणि हा दावा खोटा असल्याचे म्हटले आहे.

  • Claim Review : फेसबुक यूजर ‘Dank Posts‘ (आर्काइव लिंक) ने 15 ऑक्टोबर रोजी स्क्रीनशॉट शेअर करून लिहले, “Cartoon Network is Shutting Down”
  • Claimed By : Dank Posts
  • Fact Check : False
False
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later