X
X

Fact Check: पंजाब च्या भाजप च्या नेत्याचा व्हिडिओ युपी च्या नावाने व्हायरल

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे भाजप नेत्याला मारहाण करणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावाने व्हायरल झालेली पोस्ट बनावट असल्याचे सिद्ध झाले. विश्वास न्यूजने केलेल्या तपासणीत असे आढळून आले की व्हायरल व्हिडिओ जुलै 2021 चा आहे. त्यावेळी पटियाला येथे आंदोलक शेतकऱ्यांनी भाजपच्या काही नेत्यांना ओलीस ठेवले होते.

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल मीडियावर 20 सेकंदाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये पांढरे कपडे घातलेला एक व्यक्ती गर्दीपासून पोलिसांचे संरक्षण करताना दिसत आहे. हा व्हिडिओ उत्तर प्रदेशचा असल्याचा दावा करत लखीमपूर खेरीमध्ये भाजप नेत्याला शेतकऱ्यांनी मारहाण केल्याचा दावा सोशल मीडिया यूजर्स करत आहेत. विश्वास न्यूजने व्हायरल पोस्टची तपासणी केली आणि दावा खोटा असल्याचे आढळले. प्रत्यक्षात व्हायरल झालेल्या व्हिडिओचा यूपीशी काहीही संबंध नाही. हा व्हिडिओ पंजाबमधील पटियाला येथील जुन्या घटनेतील आहे. त्यावेळी आंदोलक शेतकऱ्यांनी भाजपच्या काही नेत्यांना ओलीस ठेवले होते. पोलिसांनी मोठ्या कष्टाने त्यांची सुटका केली. व्हिडिओ त्यावेळचा आहे.

काय होत आहे व्हायरल?

फेसबुक यूजर जसीम अहमद ने 7 ऑक्टोबर रोजी एक व्हिडिओ शेअर करून दावा केला: ‘लखीमपुर खीरी उत्तर प्रदेश में किसानो ने बीजेपी नेता को पीटा।
दुसरे यूजर्स देखील हा व्हिडिओ खरा समजून शेअर करत आहेत. ह्या व्हिडिओ चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:

व्हायरल पोस्टचे सत्य जाणून घेण्यासाठी विश्वास न्यूजने प्रथम इनव्हिड टूलचा वापर केला. या टूलमध्ये व्हायरल व्हिडिओ अपलोड करून अनेक कीफ्रेम काढण्यात आल्या. त्यानंतर ते गुगल रिव्हर्स इमेज टूलवर अपलोड करून शोधले गेले. आम्हाला व्हिडिओमधून घेतलेली बातमी मिळाली. Jagran.com वर 12 जुलै 2021 रोजी प्रकाशित झालेल्या एका बातमीत, पंजाबमधील शेतकऱ्यांनी भाजप नेत्यांच्या निषेधाला हिंसक रूप धारण केल्याचे वृत्त आहे. राजपुरा, पटियाला येथे शेतकऱ्यांनी भाजप नेत्यांना ओलीस ठेवल्याने रात्रभर प्रचंड तणाव निर्माण झाला होता. परिस्थिती नियंत्रणात आणणे पोलिसांसाठी अत्यंत आव्हानात्मक होते. त्यामुळे राजपुरा जणू युद्धभूमी बनला. शेतकऱ्यांना हटवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला तेव्हा आंदोलक संतप्त झाले आणि त्यांनी दगडफेक सुरू केली. भाजप नेते भूपेश अग्रवाल यांना पोलिसांनी बाहेर काढत असताना काही आंदोलकांनी त्यांच्यावर दगडफेकही केली. येथे पूर्ण बातमी वाचा.

12 जुलै 2021 रोजी इंडियन एक्स्प्रेस वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्यांमध्ये असेही वृत्त आहे की शेतकऱ्यांनी राजपुरा, पटियाला येथील एका घरात भाजप नेत्यांना ओलीस ठेवले होते. येथे पूर्ण बातमी वाचा.

तपासादरम्यान, आम्हाला YouTube वर संबंधित व्हिडिओ देखील सापडला. 13 जुलै 2021 रोजी अपलोड केलेल्या व्हिडिओमध्ये असे सांगण्यात आले होते की, शेतकऱ्यांनी राजपुरामध्ये भाजप नेत्यांना ओलीस ठेवले होते. पोलिसांनी मोठ्या कष्टाने नेत्यांची सुटका केली.

तपासादरम्यान आम्हाला एएनआयच्या ट्विटर हँडलवर एक जुने ट्विट आढळले. 11 जुलै 2021 रोजी केलेल्या या ट्विटमध्ये चार चित्रेही होती. या फोटोंमध्ये आपल्याला तेच नेते आणि पोलीस दिसले, जे व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहेत. या ट्विटमध्ये भाजप नेते भूपेश अग्रवाल आणि इतर नेत्यांवर राजपुरा, पटियाला येथे शेतकऱ्यांनी हल्ला केल्याचे सांगण्यात आले.

तपास पुढे नेण्यासाठी विश्वास न्यूजने दैनिक जागरण डिजिटल, चंदीगडचे उप वृत्त संपादक कमलेश भट्ट यांच्याशी संपर्क साधला. व्हायरल झालेला व्हिडिओ त्याच्यासोबत शेअर केला. त्याने सांगितले की, हा व्हिडिओ पटियालामधील एका जुन्या घटनेचा आहे. हा व्हिडिओ जुना आहे.

तपासाअंती बनावट पोस्ट करणाऱ्या युजरची चौकशी करण्यात आली. फेसबुक यूजर जसिम अहमद हा बिहारचा रहिवासी असल्याची माहिती मिळाली. हजाराहून अधिक लोक त्याचे अकाउंट फॉलो करतात.

निष्कर्ष: उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे भाजप नेत्याला मारहाण करणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावाने व्हायरल झालेली पोस्ट बनावट असल्याचे सिद्ध झाले. विश्वास न्यूजने केलेल्या तपासणीत असे आढळून आले की व्हायरल व्हिडिओ जुलै 2021 चा आहे. त्यावेळी पटियाला येथे आंदोलक शेतकऱ्यांनी भाजपच्या काही नेत्यांना ओलीस ठेवले होते.

  • Claim Review : लखीमपुर खीरी उत्तर प्रदेश में किसानो ने बीजेपी नेता को पीटा।
  • Claimed By : फेसबुक यूजर जसीम अहमद
  • Fact Check : Misleading
Misleading
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later