X
X

Fact Check: क्लायमेट चेंज वर असलेली ‘CNN’ ची रिपोर्ट खोटी

विश्वास न्यूजच्या तपासात CNN स्क्रीनशॉटचा व्हायरल दावा खोटा असल्याचे समजले. सीएनएनचा स्क्रीनशॉट एडिट करून व्हायरल केला जात आहे. ही बातमी सीएनएनने प्रसिद्ध केलेली नाही.

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): CNN च्या बातमीचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर शेअर केला जात आहे ज्यात दावा केला जात आहे की CNN ने प्रकाशित केलेल्या बातमीनुसार, “पुढील उन्हाळ्यात हवामान बदल परत येईल.” विश्वास न्यूजच्या तपासात हा व्हायरल दावा खोटा निघाला. ही बातमी सीएनएनने प्रसिद्ध केलेली नाही. सोशल मीडियावर व्हायरल झालेली पोस्ट चुकीचा दावा करून शेअर केली जात आहे.

काय होत आहे व्हायरल?

फेसबुक यूजर Karlito Chamberz ने व्हायरल स्क्रीनशॉट शेअर केले ज्यात लिहले होते, “Climate change will be back next summer guys, for all those that didn’t know climate changes every season”

ह्या पोस्ट चा आर्काइव व्हर्जन इथे बघा.

तपास:

व्हायरल स्क्रीनशॉटचे सत्य जाणून घेण्यासाठी, आम्ही अनेक कीवर्डद्वारे Google वर शोधले, परंतु आम्हाला व्हायरल दाव्याशी संबंधित कोणतीही बातमी मिळाला नाही. त्यानंतर आम्ही CNN च्या वेबसाइट आणि सोशल मीडिया अकाउंट देखील तपासले, परंतु व्हायरल स्क्रीनशॉटशी संबंधित कोणतीही बातमी सापडली नाही.

तपास सुरू करण्यासाठी, आम्ही CNN च्या वेबसाइटवर गेलो आणि 4 सप्टेंबर 2022 रोजी प्रकाशित झालेल्या बातम्या शोधण्यास सुरुवात केली. अशी कोणतीही बातमी येथे प्रकाशित झालेली आढळली नाही. ही बातमी अमांडा डेव्हिस आणि बेन मोर्स यांनी 4 सप्टेंबर 2022 रोजी लिहिली आहे, त्यानंतर आम्ही अमांडा डेव्हिस आणि बेन मोर्स यांनी लिहिलेल्या बातम्यांसाठी 4 सप्टेंबर रोजी वेबसाइट शोधली. आम्हाला जर्मन रेसर सेबॅस्टियन वेटेलची बातमी मिळाली. जे येथे पाहता येईल.

सोशल मीडिया शोधात, आम्हाला व्हायरल पोस्टच्या संदर्भात The Ferryman’s Toll नावाच्या ट्विटर यूजरने केलेले ट्विट सापडले. 6 सप्टेंबर 2022 रोजी एका वापरकर्त्याला उत्तर देताना त्याने ही पोस्ट केल्याचे ट्विट केले.

आम्ही या प्रकरणाबद्दल ट्विटद्वारे CNN च्या स्ट्रॅटेजिक कम्युनिकेशन्सचे प्रमुख मॅट डॉर्निक यांच्याशी संपर्क साधला. त्याने उत्तर दिले की, “व्हायरल पोस्ट खोटी आहे. सीएनएनने अशी कोणतीही बातमी प्रसिद्ध केलेली नाही. लेखात ज्यांची बायलाईन लिहिली आहे, ते हवामानाशी संबंधित बातम्या करत नाहीत.”

तपासाअंती, आम्ही ही पोस्ट शेअर करणाऱ्या वापरकर्त्याची तपासणी केली. फेसबुक अकाउंटवर युजरने कोणतीही माहिती शेअर केलेली नाही.

निष्कर्ष: विश्वास न्यूजच्या तपासात CNN स्क्रीनशॉटचा व्हायरल दावा खोटा असल्याचे समजले. सीएनएनचा स्क्रीनशॉट एडिट करून व्हायरल केला जात आहे. ही बातमी सीएनएनने प्रसिद्ध केलेली नाही.

  • Claim Review : क्लायमेट चेंज वर असलेली ‘CNN’ ची रिपोर्ट
  • Claimed By : Karlito Chamberz
  • Fact Check : False
False
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later