Fact Check: काँग्रेस चे पूर्व नेते गुलाम नबी आझाद आणि अमित शाह ह्यांचे चित्र खरे नाही
विश्वास न्यूजच्या तपासात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, गुलाम नबी आझाद आणि सामंत कुमार यांचे व्हायरल झालेले छायाचित्र बनावट असल्याचे सिद्ध झाले. व्हायरल चित्र संपादित केले आहे. वेगवेगळे फोटो एकत्र एडिट करून एक व्हायरल पिक्चर तयार करण्यात आला आहे.
- By: Jyoti Kumari
- Published: Sep 17, 2022 at 02:12 PM
विश्वास न्यूज (नवी दिल्ली): जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिल्यापासून ते सतत चर्चेत आहेत. आता सोशल मीडियावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि गुलाम नबी आझाद यांचा फोटो असलेला व्हिडिओ शेअर केला जात आहे. व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या फोटोमध्ये अमित शाह, गुलाम नबी आझाद यांच्यासह रिसर्च अँड अॅनालिसिस विंग (RAW) प्रमुख सामंत कुमार गोयल देखील उपस्थित आहेत. फोटो शेअर करत सोशल मीडिया यूजर्स दावा करत आहेत की, गुलाम नबी आझाद यांनी पक्ष सोडण्यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. विश्वास न्यूजने व्हायरल चित्र तपासले आणि दावा खोटा असल्याचे सिद्ध झाले. व्हायरल चित्र संपादित केले आहे. वेगवेगळे फोटो एडिट करून व्हायरल करण्यात आले आहे.
काय होत आहे व्हायरल?
फेसबुक पेज “अवनीश जैन फैन्स” ने 12 सप्टेंबर रोजी हि पोस्ट शेअर करून लिहले: ‘गुलाम नबी आजाद ही #अब्बास हैं ये फोटो गुलाम नबी आजाद का कांग्रेस से #आजादी लेने से दो दिन पहले का है, जब वो बचपन के #मगरमच्छ पकड़ने वाले दोस्त से मुलाकात का समय लेने के लिए अमित शाह के पास गये थे (बसपन का प्यार मेरा भूल नहीं जाना रे)
त्यावर लिहले होते: ‘श्री गुलाम नबी आजाद ने कांग्रेस पार्टी छोड़ने से पहले अमित शाह आवास पर श्री अमित शाह और सामंत कुमार से मुलाकात की।’
फेसबुक वर लोकं हि पोस्ट खरी समजून शेअर करत आहेत. ह्या पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.
तपास:
व्हायरल चित्राचे सत्य जाणून घेण्यासाठी विश्वास न्यूजने फोटो क्रॉप केला आणि गुगल रिव्हर्स इमेजद्वारे शोधला. यादरम्यान आम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, गुलाम नबी आझाद आणि सामंत कुमार यांचे छायाचित्र मिळाले. त्यानंतर तिघांचेही चित्र संपादित करून एकत्र जोडण्यात आल्याचे स्पष्ट झाले.
आम्ही प्रथम गृहमंत्री अमित शहा यांचा फोटो Google Images वर शोधला. NDTV च्या वेबसाईटवर ३० सप्टेंबर २०२१ रोजी प्रकाशित झालेल्या बातमीत आम्हाला हे चित्र आढळले. चित्रात अमित शहांसमोर तीच पिवळी फाईल पडून आहे आणि व्हायरल चित्रात दिसत असल्यासारखी तीच गोष्ट आजूबाजूला दिसत आहे पण त्यात गुलाम नबी आझाद आणि सामंत कुमार नाहीत. वृत्तात दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गोवा सरकारचे मंत्री मायकल लोबो यांनी अमित शहा यांची त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली.
इतर अनेक बातम्यांमध्ये आम्हाला अमित शहा, देवेंद्र फडणवीस आणि गोवा सरकारमधील मंत्री मायकल लोबो यांचे छायाचित्र आढळले. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही हे चित्र ३० सप्टेंबर २०२१ रोजी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट केले होते.
आता आम्ही गुलाम नबी आझाद यांचे चित्र गुगल इमेजेसवर शोधले. गुलाम नबी आझाद यांचे चित्र आम्हाला प्रोकेरलाच्या वेबसाइटवर 9 जानेवारी 2014 च्या बातमीत आढळले. मिळालेल्या माहितीनुसार, गुलाम नबी आझाद यांनी द्रमुक नेते एम करुणानिधी यांची भेट घेतली होती. बातमीत उपस्थित असलेला गुलाम नबी आझाद यांचा फोटो क्रॉप करून व्हायरल चित्रात जोडला गेला आहे.
आता आम्ही रॉ चीफ सामंत कुमार यांचे चित्र काळजीपूर्वक पाहिले आहे. पाहिल्यावर हे स्पष्ट होते की एडिटिंग सॉफ्टवेअरच्या सहाय्याने मूळ चित्र पलटवले गेले आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या जागी सामंत कुमार यांचे चित्र जोडले गेले. याशिवाय मायकल लोबो यांच्या चित्राच्या जागी गुलाम नबी आझाद यांचे चित्र लावण्यात आले आहे.
तपास पुढे नेत आम्ही तिघे नुकतेच भेटले का याचा शोध सुरू केला. आम्ही अनेक कीवर्डद्वारे Google वर शोधले, परंतु आम्हाला तिघांच्या भेटीचे कोणतेही विश्वसनीय मीडिया अहवाल सापडले नाहीत. तीनही चित्रांची तुलना खालील कोलाजमध्ये स्पष्टपणे पाहिली जाऊ शकते.
अधिक माहितीसाठी आम्ही दैनिक जागरणच्या राष्ट्रीय ब्युरोच्या पत्रकार नीलू रंजन यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी आम्हाला सांगितले, “व्हायरल दावा खोटा आहे. हा फोटो एडिट केला आहे. गुलाम नबी आझाद आणि अमित शहा यांच्यात गेल्या काही काळात भेट झालेली नाही.
आमच्या तपासाअंती, आम्ही ही इमेज शेअर करत असलेले पेज तपासले. या पेजला ६ हजारांहून अधिक लोक फॉलो करतात, असे तपासात आढळून आले. फेसबुकवरील हे पेज ३१ डिसेंबर २०१९ रोजी तयार करण्यात आले.
निष्कर्ष: विश्वास न्यूजच्या तपासात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, गुलाम नबी आझाद आणि सामंत कुमार यांचे व्हायरल झालेले छायाचित्र बनावट असल्याचे सिद्ध झाले. व्हायरल चित्र संपादित केले आहे. वेगवेगळे फोटो एकत्र एडिट करून एक व्हायरल पिक्चर तयार करण्यात आला आहे.
- Claim Review : श्री गुलाम नबी आजाद ने कांग्रेस पार्टी छोड़ने से पहले अमित शाह आवास पर श्री अमित शाह और सामंत कुमार से मुलाकात की।
- Claimed By : अवनीश जैन फैन्स
- Fact Check : False
Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.