Fact Check: गणपती च्या मूर्ती वर साप आणि पांढरे उंदीर फिरत असल्याचा व्हिडिओ जुना आहे, नागपूर चा नाही
गणेश मूर्तीवरील पांढरा उंदीर आणि सापाचा व्हायरल व्हिडिओ नागपूरचा नाही. व्हायरल व्हिडिओ जुना आहे आणि 2020 पासून इंटरनेटवर आहे.
- By: Ankita Deshkar
- Published: Sep 9, 2022 at 01:34 PM
- Updated: Sep 9, 2022 at 01:51 PM
नवी दिल्ली (विश्वास न्यूज): विश्वास न्यूज ला एक व्हिडिओ व्हाट्सअँप आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स वर व्हायरल होत असल्याचा लक्षात आला. ह्या व्हिडिओ मध्ये एका गणपती च्या मूर्ती वर एक साप आणि काही पांढरे उंदीर त्या मूर्ती वर फिरताना दिसतात. सोशल मीडिया वर लोकं दावा करत आहेत कि हा व्हिडिओ आताचा आहे आणि नागपूर मधील पीपल हुडकेश्वर मध्ये राहणारे गृहस्त बांगरे ह्यांच्या घरी घेतला आहे.
विश्वास न्यूज च्या तपासात हा दावा दिशाभूल करणारा असल्याचे समोर आले आहे. हा व्हिडिओ नागपूर चा नाही आणि इंटरनेट वर २०२० साल पासून आहे.
काय होत आहे व्हायरल:
फेसबुक यूजर Smita D Gandhi Dhansukh Gandhi ह्यांनी व्हायरल व्हिडिओ शेअर करून मराठी मध्ये लिहले: नागपुरातील पिपळा हुडकेश्रवर येथील श्री बांगरे ह्यांचे कडील श्री गणेश मुर्ती वरील व्हिडिओ काढलेले दृश्य आहे हे मन विचलित करणारे देवाची कृपा किंवा चमत्कारिक आहे जय श्री गणेश गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया
हि पोस्ट आणि त्याचा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.
तपास:
विश्वास न्यूज ने सर्वप्रथम हा व्हिडिओ इन्व्हिड टूल मध्ये अपलोड केला आणि किफ्रेम्स काढले. त्या किफ्रेम्स वर आम्ही रिव्हर्स द्वारे शोध घेतला.
त्यानंतर काही किवर्डस द्वारे देखील आम्ही ह्या व्हिडिओ चा तपास केला.
आम्हाला हा व्हिडिओ Punjab Kesari च्या वेबसाईट वर सापडला. ह्या बातमीत व्हिडिओ ची जागा दिली नव्हती. आणि आर्टिकल ३१ ऑगस्ट, २०२० मध्ये प्रकाशित करण्यात आले होते.
आम्हाला हे आर्टिकल latestly.com वर देखील सापडले ज्यात व्हायरल व्हिडिओ बद्दल सांगितले होते. हे आर्टिकल सप्टेंबर ९, २०२२ मध्ये प्रकाशित करण्यात आले होते पण ह्यात सांगितले गेले होते कि हा व्हिडिओ २०२० मध्ये व्हायरल झाला होता.
आम्हाला हा व्हिडिओ एका युट्युब चॅनेल वर ऑगस्ट ३०, २०२० रोजी अपलोड करण्यात आला होता.
विश्वास न्यूज ला हा व्हिडिओ VideoPlus ह्या फेसबुक पेज वर देखील सापडला ज्यात दावा करण्यात आला होता कि हा कोल्हापूर चा आहे.
तपासाच्या पुढच्या टप्प्यात आम्ही नागपूर चे ANI चे करस्पॉण्डेण्ट सौरभ जोशी ह्यांना संपर्क केला त्यांनी सांगितले कि नागपुरात अशी कुठली घटना घडल्याचे त्यांना समजले नाही आणि तसेच हा व्हिडिओ जुना असल्याचे देखील त्यांनी सांगितले. व्हायरल व्हिडिओ जुना आहे.
विश्वास न्यूज स्वतंत्र पणे हा तपास करू शकले नाही कि हा व्हिडिओ कुठला आहे. आम्हाला ह्या घटनेचे अचूक स्थान सापडले नाही.
तपासाच्या शेवटच्या टप्प्यात, विश्वास न्यूजने व्हायरल व्हिडिओ शेअर केलेल्या प्रोफाइलचे बॅकग्राउंड चेक केले. Smita Gandhi ह्या ओझोना टेक्सास येथील रहिवासी आहेत आणि त्यांचे २.३ हजार मित्र आहेत.
निष्कर्ष: गणेश मूर्तीवरील पांढरा उंदीर आणि सापाचा व्हायरल व्हिडिओ नागपूरचा नाही. व्हायरल व्हिडिओ जुना आहे आणि 2020 पासून इंटरनेटवर आहे.
- Claim Review : नागपुरातील पिपळा हुडकेश्रवर येथील श्री बांगरे ह्यांचे कडील श्री गणेश मुर्ती वरील व्हिडिओ काढलेले दृश्य आहे हे मन विचलित करणारे देवाची कृपा किंवा चमत्कारिक आहे जय श्री गणेश गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया
- Claimed By : Facebook user Smita D Gandhi
- Fact Check : Misleading
Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.