X
X

Fact Check: राऊतवाडी धबधब्याचा व्हिडिओ केरळ चा सांगून व्हायरल

पोलीस पर्यटकांना मारत असल्याचा व्हिडिओ केरळ चा नसून राऊतवाडी, कोल्हापूर चा आहे. व्हायरल दावा दिशाभूल करणारा आहे.

विश्वास न्यूज (नवी दिल्ली): विश्वास न्यूज ला एक व्हिडिओ सोशल मीडिया वर व्हायरल होत असलेला आढळला. ह्या व्हिडिओ मध्ये काही पोलीस पर्यटकांना मारताना दिसतात. असा दावा करण्यात येत आहे कि हा व्हिडिओ केरळ मधील जागांचा आहे. विश्वास न्यूज च्या तपासात असे समोर आले कि हा व्हिडिओ कोल्हापूर मधील राऊतवाडी धबधब्याचा आहे.

काय होत आहे व्हायरल?

ट्विटर यूजर Subair B ने व्हायरल व्हिडिओ शेअर केला आणि मल्याळम मध्ये लिहले: ഇനി കുളിക്കാൻ ആനക്കാംപൊയിൽ, തുഷാരഗിരി തുടങ്ങിയ ഭാഗങ്ങളിലേക്ക് പോയാലുള്ള അനുഭവം ഇതായിരിക്കും

Translation: जर का तुम्ही अंकाम्पोयल किंवा तुषारगिरी ला गेलात तर तुम्हाला हा अनुभव मिळेल

हि पोस्ट आणि त्याचा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

आम्हाला युट्युब वर देखील हा दावा मिळाला.

https://www.youtube.com/watch?v=vKSzRiCTSbg

तसेच फेसबुक वर देखील हा दावा व्हायरल होत आहे.

तपास:

विश्वास न्यूज ने इन्व्हिड टूल मध्ये हा व्हिडिओ अपलोड करून किफ्रेम्स मिळवण्यापासून तपासाचु सुरुवात केली.

आम्ही सगळ्या फ्रेम्स वर गूगल लेन्स वापरले. त्यात आम्हाला एका फ्रेम वर गूगल लेन्स चा वापर केल्यावर एक लिंक मिळाली. ह्या लिंक प्रमाणे व्हायरल चित्र राऊतवाडी चे असल्याचे समजले.

राऊतवाडी धबधबा, कोल्हापूर राधानगरी मध्ये आहे.

ह्यावरून आम्ही गूगल वर किवर्डस शोधले. आम्हाला सर्च मध्ये बऱ्याच बातम्या ह्या घटनेसोबत संबंधित सापडल्या.

आम्हाला मराठी वृत्तपत्र लोकमत मध्ये बातमी सापडली, ज्यात म्हंटले होते कि राऊतवाडी धबधब्यावर हुल्लडबाजी, मद्यधुंद तरुणांना पोलिसांनी चोपले; लाखोंचा दंड वसूल.

ह्या बातमी व्हायरल व्हिडिओ देखील होता.

आम्हाला हीच बातमी टीव्ही ९ मराठी च्या वेबसाईट वर देखील सापडली.

तपासाच्या पुढच्या टप्प्यात आम्ही कोल्हापूर चे वरिष्ठ पत्रकार असिफ कुरणे ह्यांना संपर्क केला. त्यांनी स्पष्ट केले कि हि घटना राऊतवाडी, कोल्हापूर ची आहे. आणि त्यांनी आमच्या सोबत लोकमत मध्ये प्रकाशित बातमी देखील शेअर केली.

तपासाच्या शेवटच्या टप्प्यात, विश्वास न्यूज ने Subair B चे बॅकग्राऊंड चेक केले. त्यात कळले त्यांनी एप्रिल 2015 मध्ये आपले ट्विटर अकाउंट बनवले. त्यांचे 551 फॉलोवर आहेत.

निष्कर्ष: पोलीस पर्यटकांना मारत असल्याचा व्हिडिओ केरळ चा नसून राऊतवाडी, कोल्हापूर चा आहे. व्हायरल दावा दिशाभूल करणारा आहे.

  • Claim Review : जर का तुम्ही अंकाम्पोयल किंवा तुषारगिरी ला गेलात तर तुम्हाला हा अनुभव मिळेल
  • Claimed By : Subair B
  • Fact Check : Misleading
Misleading
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later