Fact Check: कन्हैयालाल नाही श्याम सुंदर सोलंकी चे आहे व्हायरल स्केच
विश्वास न्यूज च्या तपासात कन्हैयालाल ह्यांच्या नावाने व्हायरल होत असलेले चित्र हे जोधपुर मधील श्याम सुंदर सोलंकी ह्यांचे आहे.
- By: Pragya Shukla
- Published: Jul 1, 2022 at 09:35 PM
नवी दिल्ली (विश्वास न्यूज): उदयपूरमध्ये टेलर कन्हैयालालच्या हत्येनंतर एक स्केच सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फोटो शेअर करताना दावा करण्यात येत आहे की, ही प्रतिमा उदयपूरचे दर्जी कन्हैयालालची आहे. विश्वास न्यूजच्या तपासात हा व्हायरल दावा खोटा निघाला. व्हायरल फोटोमध्ये दिसणारा व्यक्ती जोधपूरचा श्याम सुंदर सोलंकी आहे.
काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर Idiotic Minds ने व्हायरल चित्र शेअर केले आणि लिहले: भयभीत… उदास…. निशब्द…. #कन्हैयालाल #उदयपुर।
ह्या पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.
तपास:
व्हायरल चित्राचे सत्य जाणून घेण्यासाठी आम्ही काही कीवर्डद्वारे गूगल वर शोधले. यावेळी आम्हाला हे चित्र शटरस्टॉकवर अपलोड केलेले कळले. वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, हा फोटो जोधपूरमधील एका टेलरचा असून तो 28 मार्च 2015 रोजी जोधपूरमध्ये घेण्यात आला होता. हा फोटो Sorin Rechitan नावाच्या फोटोग्राफरने क्लिक केला आहे.
अधिक माहितीसाठी आम्ही जोधपूर येथील ज्येष्ठ स्थानिक पत्रकार डॉ. रंजन दवे ह्यांना संपर्क केला. आम्ही व्हायरल दावा त्यांष्यासोबत शेअर केला. त्यांनी आम्हाला सांगितले की व्हायरल दावा खोटा आहे. छायाचित्रात दिसत असलेल्या व्यक्तीचे नाव श्याम सुंदर सोलंकी आहे. जुने शहर जोधपूर येथील टेलर, ह्यांचे चौकात दुकान आहे. हे छायाचित्र परदेशातून भेट देण्यासाठी आलेल्या छायाचित्रकाराने काढले आहे. श्याम सुंदर सोलंकी यांचा नुकताच एक फोटोही त्यांनी आमच्यासोबत शेअर केला आहे.
तपासाच्या अंतिम टप्प्यात, आम्ही खोटा दावा शेअर करणाऱ्या वापरकर्त्याची पार्श्वभूमी तपासली. 8 नोव्हेंबर 2013 पासून फेसबुकवर Idiotic Minds पेज सक्रिय आहे. फेसबुकवर युजरचे २ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.
निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात कन्हैयालाल ह्यांच्या नावाने व्हायरल होत असलेले चित्र हे जोधपुर मधील श्याम सुंदर सोलंकी ह्यांचे आहे.
- Claim Review : भयभीत… उदास…. निशब्द…. #कन्हैयालाल #उदयपुर।
- Claimed By : Idiotic Minds
- Fact Check : False
Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.