X
X

Fact check: उत्तर प्रदेश मधील चित्र, ज्यात लोकं खांबावर भाजप चा ध्वज फडकताना दिसतात, तो मॉर्फ करून तामिळ नाडू च्या नावाने व्हायरल

व्हायरल इमेज ज्यात दावा करण्यात येत आहे कि त्यात भाजप चा ध्वज आहे आणि ते तेलंगणा चे आहे, ते खरे तर, बसपा चा ध्वज असलेले शहापूर, उत्तर प्रदेश चे छायाचित्र आहे.

विश्वास न्यूज (नवी दिल्ली): विश्वास न्यूज ला एक चित्र सोशल मीडिया वर अत्यंत वेगाने व्हायरल होत असल्याचे लक्षात आले. ह्या चित्र चार लोकं एकावर एक उभे राहून एका खांबावर भाजप चा ध्वज फडकवताना दिसतात. असा दावा करण्यात येत आहे कि हे चित्र तामिळ नाडू येथील आहे. विश्वास न्यूज च्या तपासात असे लक्षात आले कि हे चित्र मॉर्फ केले आहे. त्यात भाजप चा नसून बसपा चा ध्वज आहे. तसेच हे चित्र तामिळ नाडू किंवा तेलंगणा चे नसून उत्तर प्रदेश चे आहे.

काय होत आहे व्हायरल?
ट्विटर हॅन्डल Prajwal Busta, ज्या एक लॉयर तसेच भाजप प्रवक्ता आहेत, त्यांनी हे चित्र शेअर केले आणि लिहले: Lotus is blooming in Tamil Nadu 🙏
तमिलनाडु भगवामय होने की तरफ अग्रसर
संगठन गढ़े चलो, सुपंथ पर बढ़े चलो।

हि पोस्ट आणि त्याचे आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

बाकी यूजर्स (आर्काइव्ह) ने देखील अश्याच मिळत्या जुळत्या दाव्यासह हे चित्र शेअर केले.

तपास:

विश्वास न्यूज ने तपासाची सुरुवात साध्या गूगल रिव्हर्स इमेज सोबत केली.

आम्हाला हे चित्र Shirisha Swaero Akinapally ह्यांच्या ट्विटर हॅन्डल वर 31 मे 2022 रोजी पोस्ट केलेले सापडले.

हा ट्विट इथे बघा.

https://twitter.com/ShirishaSwaero/status/1531648364726456321?s=20&t=lKW07twokL_JDpr4RFgwtA

शिरीषा अकिनापल्ली ह्या बसपा च्या स्टेट स्पोक्सपर्सन आहेत.

Dr RS Praveen Kumar, बहुजन समाज पार्टी चे तेलंगणा चे चीफ कोऑर्डिनटोर ह्यांनी देखील हि पोस्ट रिट्विट केली होती.

हा ट्विट इथे बघा:

आता हे स्पष्ट झाले होते कि चित्रात भाजप नाही तर बसपा चा ध्वज आहे. बसपा च्या ध्वजाला मॉर्फ करून भाजप चा ध्वज लावण्यात आला होता.

विश्वास न्यूज ने तपासाच्या पुढच्या टप्प्यात बसपा तेलंगणा अध्यक्ष, एम बालय्याह ह्यांनी देखील सांगितले कि त्या खांबावर बसपाचाच ध्वज आहे. भाजप चा नाही.

पण असे कुठेच दिले नव्हते कि हे चित्र नक्की कुठले आहे. विश्वास न्यूज ने तेलंगणा मधील काही पत्रकारांसोबत संवाद साधला. त्या पत्रकारांनी काही बसपा च्या कार्यकर्त्यांसोबत संपर्क केला.

तेलंगणा मधील एक बसपा कार्यकता अजय ह्यांना आम्ही संपर्क केला. त्यांनी सांगितले कि हे चित्र बसपा ध्वजाचेच आहे पण तेलंगणा चे नाही. त्यांनी सांगितले कि हे चित्र उत्तर प्रदेश निवडणूक २०१७ मध्ये काढले गेले होते. आणि हे चित्र रोहिताश कुमार ह्यांनी घेतले आहे जे उत्तर प्रदेश चे आहे.

विश्वास न्यूज ने तपासाच्या पुढच्या टप्प्यात रोहिताश कुमार ह्यांना संपर्क केला. त्यांनी सांगितले कि हे चित्र त्यांनीच २०१७ मध्ये शहापूर, उत्तर प्रदेश इथे घेतले आहे. त्यांनी हे देखील सांगितले कि चित्रात बसपा चा ध्वज लावणारे त्यांचे भाऊ आहेत, टिटू, रिंकू, बबलू आणि अरविंद. रोहिताश कुमार ह्यांनी सांगितले कि आज देखील तो बसपा चा ध्वज त्याच जागेवर आहे, शहापूर कुतुब, अलिगड इथे, जिथे त्यांनी २०१७ मध्ये चित्र काढले. त्यांनी आमच्यासोबत रिसेन्ट चित्र देखील शेअर केले. ते खाली बघा.

ट्विटर यूजर R Rajagopalan ज्यांनी दावा केला कि हे चित्र तामिळ नाडू चे आहे त्यांनी आपल्या प्रोफाइल वर लिहले कि ते एक मीडिया कर्मचारी आहेत. त्यांचे ट्विटर वर 38.4K फॉलोवर्स आहेत.

निष्कर्ष: व्हायरल इमेज ज्यात दावा करण्यात येत आहे कि त्यात भाजप चा ध्वज आहे आणि ते तेलंगणा चे आहे, ते खरे तर, बसपा चा ध्वज असलेले शहापूर, उत्तर प्रदेश चे छायाचित्र आहे.

  • Claim Review : In a remote village Osur in Tamil Nadu. Best picture of this week. Not only cadre based BJP. It is Ladder based Party. No Dynast
  • Claimed By : R Rajagopalan
  • Fact Check : False
False
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later