X
X

Fact Check: हार्दिक पटेल ला झापड मारल्याचा जुना व्हिडिओ आता व्हायरल

विश्वास न्यूज ने हार्दिक पटेलला झापड मारल्याचा व्हिडिओचा तपास केला. हार्दिक पटेलचा व्हिडिओ जुना असल्याचे विश्वास न्यूज च्या तपासात समजले.

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): भाजपचे नवे नेता हार्दिक पटेलचा एक व्हिडिओ सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवर चांगलाच व्हायरल होत आहे. यामध्ये एक व्यक्ती हार्दिक पटेलला थप्पड मारताना दिसत आहे. सोशल मीडिया युजर्स आता हा सात सेकंदाचा व्हिडिओ व्हायरल करत आहेत की, हार्दिक पटेलला भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर थप्पड मारण्यात आली होती. विश्वास न्यूजने व्हायरल झालेल्या पोस्टचा तपास केला. हीं पोस्ट दिशाभूल करणारे असल्याचे समोर आले. तपासात हा व्हायरल व्हिडिओ एप्रिल 2019 चा असल्याचे समोर आले आहे. त्यावेळी हार्दिक हे काँग्रेसचे नेते होते. सुरेंद्र नगरमध्ये सभेदरम्यान एका व्यक्तीने त्यांना थप्पड मारली होती.

काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर आतिफ खान ने 4 जून रोजी एक व्हिडिओ अपलोड केला आणि दावा केला: ‘भाजपा में शामिल होते ही हार्दिक पटेल का जोरदार स्वागत एवं अभिनंदन…!!’

फेसबुक वर कन्टेन्ट जसेच्या तसे लिहले गेले आहे. ह्याला खरे समजून यूजर्स देखील व्हायरल होत आहे. पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:

हार्दिक पटेलच्या व्हिडिओशी संबंधित सत्य जाणून घेण्यासाठी विश्वास न्यूजने सर्वप्रथम गुगल ओपन सर्चची मदत घेतली. संबंधित कीवर्ड टाइप करून सर्च केल्यावर आम्हाला अनेक ठिकाणी व्हायरल व्हिडिओंशी संबंधित बातम्या, फोटो आणि व्हिडिओ सापडले.

NDTV ने 19 एप्रिल 2019 रोजी त्यांच्या YouTube चॅनेलवर संबंधित बातम्या देखील अपलोड केल्या. गुजरातमधील सुरेंद्र नगरमध्ये एका जाहीर सभेदरम्यान काँग्रेस नेते हार्दिक पटेल यांना एका व्यक्तीने थप्पड मारल्याचे सांगण्यात आले. व्हिडिओ इथे बघता येईल.

सर्च दरम्यान वनइंडिया हिंदीच्या यूट्यूब चॅनलवर व्हायरल व्हिडिओही सापडला. 19 एप्रिल 2019 रोजी अपलोड केलेल्या या व्हिडीओमध्ये हार्दिक पटेलला थप्पड मारणाऱ्या व्यक्तीने सांगितले होते. ते येथे पाहता येईल.

तपास सुरू करण्यासाठी विश्वास न्यूजने गुजरातमधील ज्येष्ठ पत्रकार प्रशांत नेमा यांच्याशी संपर्क साधला. व्हायरल झालेला व्हिडिओ त्याच्यासोबत शेअर केला. ही घटना जुनी असल्याचे त्यांनी सांगितले. 2019 मध्ये हार्दिक पटेलला एका व्यक्तीने थप्पड मारली होती. गेल्या काही काळात अशी घटना घडलेली नाही.

तपासाअंती हार्दिक पटेलचा जुना व्हिडीओ आता व्हायरल करणारा यूजर कोण आहे हे कळणार होते. फेसबुक युजर आतिफ खानचे सोशल स्कॅनिंग करताना हे युजर मुंबईचे रहिवासी असल्याचे समोर आले. त्याचे सुमारे चार हजार फेसबुक मित्र आहेत.

निष्कर्ष: विश्वास न्यूज ने हार्दिक पटेलला झापड मारल्याचा व्हिडिओचा तपास केला. हार्दिक पटेलचा व्हिडिओ जुना असल्याचे विश्वास न्यूज च्या तपासात समजले.

  • Claim Review : ‘भाजपा में शामिल होते ही हार्दिक पटेल का जोरदार स्वागत एवं अभिनंदन…!!’
  • Claimed By : फेसबुक यूजर आतिफ खान
  • Fact Check : Misleading
Misleading
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later