X
X

Fact Check: ह्या जलाधीन शिवलिंगाच्या व्हिडिओ चा ज्ञानवापी सोबत काही संबंध नाही

विश्वास न्यूजच्या तपासात व्हायरल व्हिडिओवरून करण्यात आलेला दावा खोटा निघाला. शिवलिंगाचा हा व्हिडिओ जवळपास 2 वर्षांपासून इंटरनेटवर आहे. या व्हिडिओचा ज्ञानवापीशी काहीही संबंध नाही.

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर 16 सेकंदाचा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये पाण्यात वसलेले शिवलिंग दिसत आहे. व्हिडिओच्या पार्श्वभूमीवर भक्तिसंगीताचाही वापर करण्यात आला आहे. सोशल मीडिया यूजर्स या व्हिडिओला वाराणसीच्या ज्ञानवापी सर्व्हेचे शिवलिंग असे वर्णन करून व्हायरल करत आहेत. विश्वास न्यूजने व्हायरल पोस्टची चौकशी केली. तो बनावट असल्याचे निष्पन्न झाले. वास्तविक हा व्हिडिओ ऑक्टोबर 2020 पासून इंटरनेटवर आहे. या व्हिडिओचा ज्ञानवापीशी काहीही संबंध नाही.

काय होत आहे व्हायरल?

फेसबुक यूजर काशी गुप्ता ने व्हायरल व्हिडिओ शेअर करून लिहले: “ज्ञानवापी के सर्वे के दौरान कुए मे शिवलिंग मिला!! हर हर महादेव”

इतर अनेक यूजर्स देखील असाच दावा करत हा व्हिडिओ शेअर करत आहे. फेसबुक पोस्टचा आर्काइव्ह वर्जन इथे बघा.

तपास
विश्वास न्यूजने प्रथम व्हायरल व्हिडिओ इनव्हिड टूलवर अपलोड केला आणि व्हायरल पोस्ट तपासण्यासाठी त्यातील अनेक ग्रॅब्स काढले. नंतर, यांडेक्स टूलसह रिव्हर्स इमेज सर्च द्वारे शोधले.

या दरम्यान आम्हाला 16 ऑक्टोबर 2020 रोजी सीलू प्रधान नावाच्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेला व्हायरल व्हिडिओ आढळला. या व्हिडिओतील पार्श्वसंगीत व्हायरल व्हिडिओप्रमाणेच आहे. व्हिडिओ इथे बघा. व्हायरल झालेला व्हिडिओ कुठला आहे हे आम्हाला माहीत नाही. पण व्हायरल झालेला व्हिडिओ अलीकडचा नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

अधिक पुष्टीकरणासाठी, विश्वास न्यूजने दैनिक जागरण, वाराणसीचे पत्रकार शाश्वत मिश्रा ह्यांना संपर्क केला. व्हायरल झालेली पोस्ट आम्ही व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून त्यांच्यासोबत शेअर केली. त्यांनी आम्हाला सांगितले की व्हायरल व्हिडिओचा ज्ञानवापीशी काहीही संबंध नाही.

न्यायालयाच्या कठोर गोपनीयतेच्या निर्देशांमुळे, सर्वेक्षणात काय निष्पन्न झाले याबद्दल कोणतीही अधिकृत किंवा पुष्टी केलेली माहिती सार्वजनिक केली गेली नाही. त्यामुळे, विश्‍वास न्यूज या सर्वेक्षणाबाबत हिंदू आणि मुस्लिम पक्षांनी केलेल्या दाव्यांची पुष्टी किंवा खंडनही करत नाही. तथापि, आम्ही पुष्टी करतो की व्हायरल होत असलेला व्हिडिओ ज्ञानवापीशी संबंधित नाही.

तपासाअंती विश्वास न्यूजने चुकीचा दावा करून व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या युजरच्या फेसबुक प्रोफाइलचे सोशल स्कॅनिंग केले. सोशल स्कॅनिंगवरून असे दिसून आले की काशी गुप्ता या युजरचे ४९०० मित्र आहेत आणि त्यांना १७६८ लोक फॉलो करतात. युजर उत्तर प्रदेशातील प्रतापगड येथील रहिवासी आहे.

निष्कर्ष: विश्वास न्यूजच्या तपासात व्हायरल व्हिडिओवरून करण्यात आलेला दावा खोटा निघाला. शिवलिंगाचा हा व्हिडिओ जवळपास 2 वर्षांपासून इंटरनेटवर आहे. या व्हिडिओचा ज्ञानवापीशी काहीही संबंध नाही.

  • Claim Review : ज्ञानवापी के सर्वे के दौरान कुए मे शिवलिंग मिला
  • Claimed By : फेसबुक यूजर काशी गुप्ता
  • Fact Check : False
False
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later