Fact Check: IAS अधिकाऱ्याने अशिष्ट व्यवहाराचे हे चित्र आताचे नाही, दिशाभूल करणारा दावा होत आहे व्हायरल
विश्वास न्यूज च्या तपासात हा दावा दिशाभूल करणारा असल्याचे आढळून आले आहे. ही घटना 2016 ची आहे. प्रशिक्षणार्थी आयएएसने त्यावेळी या असभ्य वर्तनाबद्दल माफीही मागितली होती.
- By: Pallavi Mishra
- Published: Apr 22, 2022 at 02:16 PM
नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल मीडिया वर व्हायरल होत असलेली एक वृत्तपत्राच्या कटिंग मध्ये एक व्यक्ती दवाखान्याच्या पलंगावर पाय ठेऊन उभा असलेला दिसतो. चित्रात पलंगावर एक महिला आपल्या बाळाला घेऊन बसलेली दिसते. बातमी प्रमाणे हि घटना छत्तीसगढ मधील प्रशीक्षय आयएएस चे आहे. हे चित्र आताचे सांगून, अधिकारी वर कडक कारवाई करण्याची मागणी केले होते. विश्वास न्यूज च्या तपासात आम्हाला कळले कि हा दावा दिशाभूल करणारा आहे. हि घटना 2016 ची आहे. ट्रैनिंग मध्ये असलेल्या त्या आयएएस ने तेव्हा माफी देखील मागितली होती.
काय होत आहे व्हायरल?
ट्विटर यूजर ‘Kamesh Shivhare (Rahul gandhi)’ (आर्काइव) ने व्हायरल चित्र शेअर करून लिहले: ”जैसे जहां के नदी नवारे, तैसे तहाँ के भरका। जैसे जाके बाप माहतारी तैसे ताके लरका।। आईएएस हो जाने से संस्कार भी आ जाएं, यह कोई गारंटी नहीं है। आदरणीय @bhupeshbaghel जी कृपया संज्ञान में ले @INCChhattisgarh”
तपास:
व्हायरल होत असलेल्या चित्रासोबतच्या दाव्याचा तपास करण्याची सुरुवात आम्ही गूगल रिव्हर्स इमेज सर्च पासून केली. सर्च मध्ये हे चित्र आम्हाला बऱ्याच जुन्या रिपोर्ट्स मध्ये मिळाले.
आम्हाला हे चित्र Jagran.com च्या 2016 च्या बातमीत सापडले. बातमीनुसार, “बलरामपूर जिल्हा रुग्णालयातील कुपोषण वॉर्डमध्ये रुग्णांना भेटताना एक आयएएस अधिकारी वादात सापडला. त्याचा हॉस्पिटलमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. छायाचित्रात डॉ.सोनकर हे जिल्हा रुग्णालयात मुलासोबत बसलेल्या महिला रुग्णाच्या बेडवर पाय ठेवताना दिसत आहेत. फोटो व्हायरल झाल्यानंतर वादाला तोंड फुटलेले पाहून सोनकर यांनी सोशल मीडियावर माफी मागितली. सोनकर आयएएस अधिकारी होण्यापूर्वी डॉक्टर होते. त्याच्या फेसबुक वॉलवर त्याने सर्वांची बिनशर्त माफी मागितली आहे. मी हे जाणूनबुजून केलेले नाही आणि कोणाचाही अपमान करण्याचा किंवा दुखावण्याचा त्यांचा हेतू नव्हता, असे त्यांनी म्हंटल्याचे ह्यात लिहले आहे.
आम्हाला हे चित्र news.abplive.com च्या 2016 च्या रिपोर्ट मध्ये देखील त्याच वर्णनासह मिळाले.
या विषयावर अधिक माहितीसाठी, आम्ही रायपूर, नयीदुनियेचे रिपोर्टर सतीश श्रीवास्तव ह्यांना संपर्क केला. त्याने पुष्टी केली की हे चित्र 2016 मधील एका घटनेचे आहे आणि या घटनेबद्दल अधिकाऱ्याला फटकारले गेले होते. त्या अधिकाऱ्याने त्यावेळी माफीही मागितली होती.
cg.nic.in आणि indianbureaucracy.com नुसार जगदीश सोनकरी हे सध्या वन विभागाचे उपसचिव आहेत.
भ्रामक दाव्यासह व्हायरल फोटो शेअर करणार्या Kamesh Shivhare (Rahul gandhi) या वापरकर्त्याचे प्रोफाइल तपासल्यावर, आम्हाला आढळले की वापरकर्त्याचे 14.1K फॉलोअर्स आहेत.
निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात हा दावा दिशाभूल करणारा असल्याचे आढळून आले आहे. ही घटना 2016 ची आहे. प्रशिक्षणार्थी आयएएसने त्यावेळी या असभ्य वर्तनाबद्दल माफीही मागितली होती.
- Claim Review : जैसे जहां के नदी नवारे, तैसे तहाँ के भरका। जैसे जाके बाप माहतारी तैसे ताके लरका।। आईएएस हो जाने से संस्कार भी आ जाएं, यह कोई गारंटी नहीं है। आदरणीय bhupeshbaghel जी कृपया संज्ञान में ले INCChhattisgarh
- Claimed By : Kamesh Shivhare (Rahul Gandhi)
- Fact Check : Misleading
Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.