X
X

Fact Check: पीएम मोदी च्या गुजरात दौऱ्याच्या चित्रासोबत केली गेली खोडतोड

विश्वास न्यूज च्या तपासात कळले कि मोदी चे व्हायरल चित्र एडिटेड आहेत. त्यांच्या गुजरात च्या दौऱ्याचे चित्र एडिट करून व्हायरल करण्यात येत आहे.

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): पंतप्रधान नरेंद्र मोदी चे एक एडिटेड चित्र व्हायरल होत आहे. सोशल मीडिया च्या विभिन्न प्लॅटफॉर्म वर व्हायरल होत असलेल्या ह्या चित्रात मोदी एका कार मध्ये बसलेले दिसतात. व्हायरल चित्रात कार च्या बाहेर एक होर्डिंग दिसते, ज्यात आम आदमी पार्टी असे लिहले आहे. होर्डिंग मध्ये गुजराती मध्ये लिहले होते, ‘गुजरात ला बदलाव हवा आहे’. ह्यात अरविंद केजरीवाल च्या चित्राचा देखील वापर करण्यात आला आहे. व्हायरल चित्र बघून असे वाटते कि पंतप्रधान त्या होर्डिंग कडे बघत आहेत. विश्वास न्यूज ने व्हायरल चित्राचा तपास केला, त्यात हि पोस्ट खोटी असल्याचे समजले. खऱ्या चित्रात होर्डिंग दिसत नाही. ओरिजिनल होर्डिंग दुसरे होते. त्या होर्डिंग वर KING IS COMING असे लिहले होते. ओरिजिनल चित्र पीएम मोदी ह्यांच्या गुजरात दौऱ्याचे आहे.

काय होत आहे व्हायरल?

फेसबुक यूजर Ajay Dudhat ने 31 मार्च रोजी पीएम मोदी ह्यांचे एडिटेड चित्र अपलोड केले आणि गुजराती मध्ये लिहले: ‘#ગુજરાતમાંગેઆપ ગુજરાતમાંગેપરિવર્તન’

ह्या पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:
विश्वास न्यूज ने व्हायरल पोस्ट चा तपास केला, सगळ्यात आधी आम्ही ऑनलाईन टूल्स चा वापर केला. गूगल रिव्हर्स इमेज सर्च मध्ये चित्र अपलोड केले. सर्च केल्यावर आम्हाला ओरिजिनल चित्र बऱ्याच ठिकाणी मिळाली. तपासाच्या वेळी आम्हाला न्‍यूज 18 च्या गुजराती वेबसाइट वर आम्हाला ओरिजिनल चित्र मिळाले. आम्हाला ह्यात कुठेच होर्डिंग दिसत नाही. 12 मार्च रोजी प्रकाशित ह्या बातमी प्रमाणे, पीएम मोदी दोन दिवस गुजरात च्या यात्रेवर होते. ओरिजिनल चित्रात होर्डिंग वर किंग इस कमिंग असे लिहले आहे.

सर्च च्या वेळी ओरिजिनल चित्र आम्हाला फेसबुक वर पण मिळाले. स्‍वागत ग्रुप नावाच्या ह्या पेज वर हे चित्र 11 मार्च रोजी अपलोड केलेले होते. ते इथे क्लिक करून बघा.

तपासाच्या वेळी विश्वास न्यूज ने व्हायरल आणि खऱ्या चित्राचे तुलनात्मक अध्ययन केले. त्यात स्पष्ट दिसते कि हे आम आदमी पार्टी चे होर्डिंग नाही.

विश्वास न्यूज ने तपासाच्या पुढच्या टप्प्यात गुजरात चे वरिष्‍ठ पत्रकार प्रशांत नेमा ह्यांना संपर्क केला. त्यांनी देखील स्पष्ट केले कि व्हायरल चित्र एडिटेड आहे.

आता आम्ही खोटी पोस्ट करणाऱ्या यूजर चा तपास केला. फेसबुक यूजर अजय दुधात च्या सोशल स्कॅनिंग मध्ये कळले कि यूजर एका विशिष्ठ राजनेतिक दलाचे आहे. सुरत च्या राहणारे अजय दुधात चे फेसबुक वर पाच हजार मित्र आहेत.

निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात कळले कि मोदी चे व्हायरल चित्र एडिटेड आहेत. त्यांच्या गुजरात च्या दौऱ्याचे चित्र एडिट करून व्हायरल करण्यात येत आहे.

  • Claim Review : पीएम मोदी च्या कार च्या बाहेर आप चे होर्डिंग.
  • Claimed By : Ajay Dudhat
  • Fact Check : False
False
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later