Fact Check: नमाज वाचताना प्रधानमंत्री मोदी ह्यांचे छायाचित्र खोटे आहे
पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांचे व्हायरल होत असलेले चित्र फेक आहे, ज्याला दुष्प्रचार करण्याच्या हेतूने एडिट करण्यात आले होते. खरे चित्र त्यांच्या एशिया च्या अधिकारीक यात्रेसोबत संबंधित आहे, ज्याला एडिट करून व्हायरल करण्यात येत आहे.
- By: Abhishek Parashar
- Published: Mar 23, 2022 at 11:50 AM
नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल मीडिया वर एक छायाचित्र व्हायरल होत आहे. ह्या चित्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, विदेश मंत्री एस जयशंकर सोबत दिसत आहे. चित्रात त्यांना नमाज वाचतानाच्या मुद्रेत हाथ जोडून उभे असलेले बघितले जाऊ शकते. दावा करण्यात येत आहे कि प्रधानमंत्री मोदी मुस्लिम मौलवींसोबत नमाज वाचत आहे.
विश्वास न्यूज च्या तपासात हा दावा खोटा असल्याचे समजले, दुष्प्रचार करण्याच्या हेतूने एडिट करून व्हायरल करण्यात येत आहे. व्हायरल होत असलेले पंतप्रधान मोदी ह्यांचे चित्र सेंट्रल एशिया च्या देशांसोबत संबंधित आहे. हे चित्र 11 जुलाई 2015 रोजी तुर्कमेनिस्तान मध्ये जेव्हा पहिल्या राष्ट्रपतींच्या समाधी स्थळ वर श्रद्धांजली दिली तेव्हाचे आहे. त्यांचे जुने चित्र एडिट करून आता खोट्या दाव्यासह व्हायरल करण्यात येत आहे.
काय होत आहे व्हायरल?
विश्वास न्यूज चे टिपलाइन नंबर +91 95992 99372 वर व्हाट्सअँप यूजर ने हि पोस्ट पाठवून सत्य जाणून घेण्यास आम्हाला पाठवले.
हे चित्र ह्या आधी देखिल सोशल मीडिया वर व्हायरल झाले होते. फेसबुक यूजर ‘Sunil Kumar Yadav’ ने हे चित्र (आर्काइव्ह लिंक) शेअर करून लिहले: ”मोदी जी नमाज अदा करते हुए भक्तों का नाक कटा दिया😆😆।”
तपास:
व्हायरल होत असलेले चित्र नीट बघितल्यावर आमच्या लक्षात आले कि ह्यात बरीच एडिटिंग केल्याचे दिसत आहे. ओरिजिनल चित्र शोधण्यासाठी आम्ही गूगल रिव्हर्स इमेज सर्च ची मदत घेतली. सर्च मध्ये आम्हाला बरेच जुने न्यूज रिपोर्ट्स मिळाले, ज्यात ओरिजिनल चित्राचा वापर करण्यात आला होता. इकोनॉमिक टाइम्स च्या वेबसाईट वर 12 जुलाई 2015 रोजी प्रकाशित एक बातमी सापडली ज्यात चित्राचा वापर करण्यात आला होता.
रिपोर्ट प्रमाणे, हे चित्र प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ह्यांचे मध्य एशियायी देशांचे अधिकारीक यात्रेसंबंधीत आहे. हे चित्र 11 जुलाई, 2015 चे तुर्कमेनिस्तान चे आहे जेव्हा तुर्कमेनिस्तान च्या पहिल्या राष्ट्रपतींच्या समाधी वर श्रद्धांजली अर्पण केल्याच्या वेळचा आहे. ह्या चित्रात आजूबाजूला माउली दुआ वाचताना दिसतात. खालील कोलाज मध्ये अंतर स्पष्ट दिसतो.
व्हायरल चित्र संबंधी आम्ही पंतप्रधान मोदी ह्यांच्या विदेश यंत्रांवर लक्ष ठेवत असलेले वरिष्ठ पत्रकार अभिषेक रंजन सिंह ह्यांना संपर्क केला. त्यांनी म्हंटले कि हे छायाचित्र पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांच्या बद्दल दुष्प्रचार करण्याचा प्रयत्न आहे. अशे चित्र नेहमी व्हायरल होते.
सोशल मीडिया वर नरेंद्र मोदी ह्यांच्या बद्दल झालेल्या दुष्प्रकाराचे फॅक्ट चेक रिपोर्ट्स तुम्ही इथे वाचू शकता.
निष्कर्ष: पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांचे व्हायरल होत असलेले चित्र फेक आहे, ज्याला दुष्प्रचार करण्याच्या हेतूने एडिट करण्यात आले होते. खरे चित्र त्यांच्या एशिया च्या अधिकारीक यात्रेसोबत संबंधित आहे, ज्याला एडिट करून व्हायरल करण्यात येत आहे.
- Claim Review : मोदी जी नमाज अदा करते हुए भक्तों का नाक कटा दिया
- Claimed By : Sunil Kumar Yadav
- Fact Check : False
Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.