Fact Check: द काश्मीर फाईल्स फिल्म बघायला नाही गेले योगी आदित्यनाथ, व्हायरल दावा खोटा
विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल पोस्ट खोटी असल्याचे सिद्ध झाले. योगी आदित्यनाथ 2017 मध्ये दिवाळीच्या मुहूर्तावर गोरखपूर मंदिरात शहीदांच्या सन्मानार्थ ‘एक दिया शहीदों के नाम’ या कार्यक्रमात सहभागी झाले होते. तिथे ते भावुक झाले होते. आता काही यूजर्स हा व्हिडीओ एडिट करून द काश्मीर फाइल्स ह्या चित्रपटाशी जोडून व्हायरल करत आहेत.
- By: Ashish Maharishi
- Published: Mar 16, 2022 at 09:31 PM
नवी दिल्ली (विश्वास न्यूज): योगी आदित्यनाथ यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यामध्ये ते भावूक होताना दिसतात. हा व्हिडिओ व्हायरल करताना दावा केला जात आहे की, द काश्मीर फाइल्स चित्रपट पाहून योगी आदित्यनाथ रडले. विश्वास न्यूजने तपासात हा व्हायरल व्हिडिओ जवळपास ५ वर्षे जुना असल्याचे आढळून आले आहे. ‘एक दिया शहीदों के नाम’ या कार्यक्रमातील ‘संदेसे आते हैं’ गाणे ऐकून योगी आदित्यनाथ भावूक झाले. या व्हिडिओचा ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाशी काहीही संबंध नाही.
काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर कुलदीप कुमार ने 14 मार्च रोजी योगी आदित्यनाथ ह्यांचा एक 17 सेकंड चा व्हिडिओ अपलोड करून दावा केला: The kashmir files Movie को देख रो पड़े योगी आदित्यनाथ।’
फेसबुक यूजर शिवाय ट्विटर यूजर Dr. Rakesh Rai ने 14 मार्च रोजी एक ट्विट करून दावा केला: ‘The Kashmir files Movie को देख कर रो पड़े पूज्य योगी आदित्यनाथ जी महाराज जी…आप सभी से निवेदन है आप भी एक बार जरूर देखें…’
फेसबुक आणि ट्विटर चा कन्टेन्ट इथे जसाच्या तसा दिला आहे. ह्याचा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा. अन्य सोशल मीडिया यूजर्स देखील हा व्हिडिओ शेअर करत आहेत.
तपास:
व्हायरल व्हिडिओच्या तळापर्यंत जाण्यासाठी विश्वास न्यूजने ऑनलाइन साधनांचा वापर केला. InVID टूलवर व्हिडिओ अपलोड करून ग्रॅब्स काढले. त्यानंतर गुगल रिव्हर्स इमेज टूलच्या मदतीने त्यांचा शोध घेतला. त्यादरम्यान, आम्हाला 17 ऑक्टोबर 2017 रोजी एबीपी न्यूजच्या यूट्यूब चॅनेलवर अपलोड केलेली एक बातमी मिळाली. बारकाईने पाहिल्यानंतर हा व्हायरल व्हिडिओ या बातमीशी संबंधित नसल्याचे आढळून आले. बातमीनुसार, योगी आदित्यनाथ यांनी दिवाळीनिमित्त आयोजित ‘एक दिया शहीदों के नाम’ या कार्यक्रमात हजेरी लावली होती, जेथे ‘संदेसे आते है’ गाणे ऐकून योगी आदित्यनाथ रडले होते. संपूर्ण बातमी इथे बघा.
तपास पुढे नेत, आम्ही संबंधित कीवर्डसह Google वर शोधले. यामध्ये आम्हाला 21 ऑक्टोबर 2017 रोजी झी न्यूजमध्ये प्रकाशित झालेल्या बातमीची लिंक मिळाली. त्यामध्ये व्हायरल झालेल्या व्हिडिओचे स्क्रिनशॉटही होते. या अनुषंगाने दिवाळीनिमित्त गोरखपूरच्या गोरखनाथ मंदिरात शहीदांच्या स्मरणार्थ आयोजित ‘एक दिया शहीदों के नाम’ या कार्यक्रमात योगी आदित्यनाथ हे भावुक झाले. हि पूर्ण बातमी इथे वाचा.
17 ऑक्टोबर 2017 रोजी प्रकाशित झालेल्या अमर उजालाच्या वृत्तातही या कार्यक्रमाची माहिती देण्यात आली होती. ही बातमी इथे वाचता येईल.
अधिक तपास करत विश्वास न्यूजने एबीपी न्यूजच्या वरिष्ठ संपादकाशी संपर्क साधला. त्यांनी सांगितले की व्हायरल व्हिडिओ खूप जुना आहे. त्यावेळी योगी आदित्यनाथ भावूक झाल्याची बातमीही त्यांच्या वाहिनीवरून प्रसारित झाली होती.
विश्वास न्यूजने अखेर काश्मीर फाइल्स संबंधी व्हायरल दावा शेअर करणाऱ्या यूजरची चौकशी केली. फेसबुक यूजर कुलदीप कुमारच्या सोशल स्कॅनिंगमध्ये 1760 लोक युजरला फॉलो करत असल्याचे आढळून आले. यूजर आग्राचे रहिवासी आहेत.
निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल पोस्ट खोटी असल्याचे सिद्ध झाले. योगी आदित्यनाथ 2017 मध्ये दिवाळीच्या मुहूर्तावर गोरखपूर मंदिरात शहीदांच्या सन्मानार्थ ‘एक दिया शहीदों के नाम’ या कार्यक्रमात सहभागी झाले होते. तिथे ते भावुक झाले होते. आता काही यूजर्स हा व्हिडीओ एडिट करून द काश्मीर फाइल्स ह्या चित्रपटाशी जोडून व्हायरल करत आहेत.
- Claim Review : कश्मीर फाइल्स देखकर रो पड़े योगी आदित्यनाथ
- Claimed By : फेसबुक यूजर कुलदीप कुमार
- Fact Check : False
Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.