Fact Check: मुंबई चा जुना व्हिडिओ कर्नाटक हिजाब विवादासोबत जोडून होत आहे व्हायरल
विश्वास न्यूज च्या तपासात कर्नाटक रॅली च्या नावावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ दिशाभूल करणारा असल्याचे समजले. व्हायरल व्हिडिओ चा कर्नाटक हिजाब विवादासोबत काही संबंध नाही. व्हिडिओ 2017 च्या मुंबई च्या जे जे फ्लायओव्हर चा मराठा क्रांती मोर्चा चा आहे.
- By: Pragya Shukla
- Published: Feb 21, 2022 at 01:30 PM
नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल मीडिया वर एक मिनिटाचा व्हिडिओ शेअर करून दावा करण्यात येत आहे कि कर्नाटक मध्ये हजारो विद्यार्थ्यांनी रॅली काढली जी भगव्या रंगात दिसते. व्हिडिओ मध्ये एका फ्लायओव्हर वर हि रॅली मोठ्या संख्येत दिसते. ह्या व्हिडिओ कर्नाटक च्या हिजाब वादाबरोबर जोडून व्हायरल करत आहेत. विश्वास न्यूज च्या तपासात हा दावा दिशाभूल करणारा असल्याचे समजले. व्हायरल व्हिडिओ चा हिजाब विवादासोबत काही संबंध नाही. व्हिडिओ 2017 सालचा मुंबईच्या जे.जे. फ्लाईओवर वर मराठा क्रांती मोर्च्याच्या रॅली चा आहे.
काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर Virji Jat ने व्हायरल व्हिडिओ ला शेअर करून लिहले: “कर्नाटक के बच्चों को देखकर लगता है कि नई पौध वैदिक सनातन धर्म की रक्षा के लिए सशक्त हो चुकी है। ये हम लोगों से अधिक सचेत हैं, अब हम लोगों की भूमिका केवल इतनी सी है कि हम धर्म रक्षा के लिए बच्चों को रोंके नहीं बल्कि प्रेरित करें।”
यूजर द्वारा शेअर केलेल्या पोस्ट चा कन्टेन्ट इथे जसाच्या तसा दिला गेला आहे. त्याचा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा. ट्विटर वर देखील बरेच यूजर हा दावा शेअर करत आहे.
तपास:
विश्वास न्यूज ने व्हायरल पोस्ट चे सत्य जाणून घेण्यासाठी आधी InVID टूल चा वापर केला. व्हायरल व्हिडिओ चे बरेच ग्रेब्स घेऊन त्यावर गूगल रिव्हर्स इमेज सर्च चा वापर केला. त्यावेळी आम्हाला व्हायरल व्हिडिओ Vinit Tawde ह्यांच्या ट्विटर प्रोफाइल वर 10 ऑगस्ट 2017 रोजी अपलोड केलेला मिळाला. कॅप्शन मध्ये दिल्याप्रमाणे हा मराठा समुदायाचा असल्याचे समजले. व्हिडिओ च्या कॅप्शन मध्ये लिहले आहे, एक मराठा लाख मराठा!!!#मराठाक्रांतीमोर्चा #मुंबई.
प्राप्त माहिती प्रमाणे आम्ही गूगल वर काही कीवर्डस सर्च केले. आम्हाला व्हायरल व्हिडिओ संबंधी एक रिपोर्ट झी २४ तास नावाच्या चॅनेल वर 9 ऑगस्ट 2017 रोजी अपलोड केलेली सापडली. रिपोर्ट मध्ये दिलेल्या माहिती प्रमाणे व्हिडिओ जे जे फ्लायओव्हर चा आहे. फर्स्ट पोस्ट च्या रिपोर्ट प्रमाणे आरक्षण साठी मराठा समुदायाने हा मार्च काढले होता, ज्यात हजारो लोकं सहभागी झाले होते.
तपासादरम्यान आम्हाला व्हायरल व्हिडिओ टाइम्स ऑफ इंडिया प्लस च्या अधिकृत ट्विटर हॅन्डल वर 9 ऑगस्ट 2017 रोजी अपलोड केलेला मिळाला.
अधिक माहिती साठी विश्वास न्यूज ने मिड-डे चे सीनियर रिपोर्टर समीउल्लाह खान ह्यांना संपर्क केला. त्यांनी आम्हाला सांगितले कि व्हायरल दावा खोटा आहे, ह्या व्हिडिओ चा कर्नाटक हिजाब विवादासोबत काहीच संबंध नाही. हा व्हिडिओ जे जे फ्लायओव्हर चा आहे. जवळपास पाच वर्षाआधी मराठा क्रांती मोर्चा निघाला होता, हा व्हिडिओ तेव्हाचा आहे. ज्याला आता लोकं खोट्या दाव्यासह शेअर करत आहे.
तपासाच्या शेवटी आम्ही हि पोस्ट शेअर करणाऱ्या ट्विटर यूजर Virji Jat (Parasaram bhakar) ह्यांचे सोशल स्कॅनिंग केले. स्कॅनिंग च्या वेळी आम्हाला कळले कि त्यांचे पाच हजार फ्रेंड्स आहे, यूजर राजस्थान च्या मकराना चे रहिवासी आहे. Virji Jat (Parasaram bhakar) फेसबुक वर ऑक्टोबर 2017 पासून सक्रिय आहे.
निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात कर्नाटक रॅली च्या नावावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ दिशाभूल करणारा असल्याचे समजले. व्हायरल व्हिडिओ चा कर्नाटक हिजाब विवादासोबत काही संबंध नाही. व्हिडिओ 2017 च्या मुंबई च्या जे जे फ्लायओव्हर चा मराठा क्रांती मोर्चा चा आहे.
- Claim Review : कर्नाटक के बच्चों को देखकर लगता है कि नई पौध वैदिक सनातन धर्म की रक्षा के लिए सशक्त हो चुकी है। ये हम लोगों से अधिक सचेत हैं, अब हम लोगों की भूमिका केवल इतनी सी है कि हम धर्म रक्षा के लिए बच्चों को रोंके नहीं बल्कि प्रेरित करें
- Claimed By : Virji Jat (Parasaram bhaskar))
- Fact Check : False
Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.