Fact Check: राहुल गांधींनी गुरुद्वारा साहिब येथे लंगर मधे भोजन केले, खोट्या दाव्यासह व्हिडिओ होत आहे व्हायरल
विश्वास न्यूज ने व्हायरल दाव्याचा तपास केला आणि त्यात दावा चुकीचा असल्याचे समोर आले. राहुल गांधी ह्यांनी गुरुद्वारा साहिब मध्ये लंगर मध्ये जेवण केले. व्हायरल व्हिडिओ जेवणाच्या आधीच आहे.
- By: Pragya Shukla
- Published: Jan 31, 2022 at 03:57 PM
नवी दिल्ली (विश्वास न्यूज): काँग्रेस नेते राहुल गांधी पंजाबमधील 117 उमेदवारांसह गुरुवारी अमृतसरच्या सुवर्ण मंदिर हरमंदिर साहिबमध्ये प्रार्थना करण्यास पोहोचले. यासंबंधीचा त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये राहुल गांधी मास्क घालून गुरुद्वारामध्ये लंगर खाताना बसले आहेत आणि त्यांच्या आजूबाजूचे लोक जेवताना दिसत आहेत. हा व्हिडिओ शेअर करून असा दावा केला जात आहे की, राहुल गांधी केवळ फोटो काढण्यासाठीच गुरुद्वारामध्ये गेले होते. त्याची प्लेट रिकामी आहे आणि त्याने फेस मास्क घातला आहे. मास्क घालून कोण जेवतं? राहुल गांधींनी लंगर मध्ये जेवण केले नाही. असे करून राहुल गांधी यांनी गुरुद्वारा साहिबचा अपमान केला आहे. विश्वास न्यूजने व्हायरल दाव्याची चौकशी केली असता हा व्हायरल दावा खोटा असल्याचे आढळून आले. राहुल गांधींनी गुरुद्वारा साहिब येथे लंगर घातले.
काय होत आहे व्हायरल?
ट्विटर यूजर @sagrolikarBJP ने व्हायरल व्हिडिओ शेअर करून लिहले: Acting super stars doing lunger with empty plate and mask On. Insulting of gurudwara sheab. Always insulting and making foolsto public , who asked them to fake acting in gurunakaji temple.
मराठी अनुवाद: रिकामी प्लेट आणि मास्क सोबत लंगर मध्ये सहभागी होताना सुपर स्टार, हा गुरुद्वारा साहिब चा अपमान आहे. राहुल गांधी नेहमीच अशी असिटिंग करून लोकांचा अपमान करतात. आणि लोकांना बुद्धू बनवतात. ह्यांना कोणी गुरुनानकजींच्या मंदिरात खोटी असिटिंग करण्यास सांगितले.
पोस्ट चा कन्टेन्ट इथे जसाच्या तास दिला आहे. ह्याचा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.
तपास:
व्हायरल दाव्याचे सत्य जाणून घेण्यासाठी आम्ही काही कीवर्डद्वारे गूगल वर ह्या माहितीचा शोध घेतला. या दरम्यान, आम्हाला 28 जानेवारी 2022 रोजी दैनिक जागरणच्या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या व्हायरल दाव्याशी संबंधित एक रिपोर्ट मिळाला. रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधींनी गुरुद्वारामध्ये लंगर खाल्ले होते. रिपोर्टमधील छायाचित्रात राहुल गांधी लंगर खातानाही दिसत आहेत.
तपासाच्या पुढच्या टप्प्यात आम्ही कांग्रेस चे अधिकृत यूट्यूब चैनल बघितले. ह्या वेळी आम्हाला व्हायरल दाव्याबाबतचा एक व्हिडिओ 27 जानेवारी 2022 रोजी अपलोड केलेला मिळाला. दहा सेकंदावर राहुल गांधी मास्क काढून जेवण करताना दिसत आहेत.
अधिक माहितीसाठी, आम्ही दैनिक जागरणचे अमृतसरचे चीफ रिपोर्टर विपिन राणा ह्यांना संपर्क केला ज्यांनी राहुल गांधींच्या दौऱ्याला कव्हर केले. आम्ही व्हायरल व्हिडिओ त्यांच्यासोबत शेअर केला. हा व्हिडिओ लंगर सुरु करण्या आधीच आहे. राहुल गांधींनी लंगर मध्ये जेवण केले होते. कोरोनाव्हायरस प्रोटोकॉल चे पालन करत त्यांनी पूर्णवेळ मास्क चा वापर केला होता, व्हिडिओ मध्ये गांधी ह्यांचे ताट बाजूला दिसते. आणि लोकं वारंवार त्यांना वाढायला येताना दिसतात. राहुल गांधींनी जेवण केले होते. हि बातमी अमृतसर ला दैनिक जागरण पानावर देखील आली होती. त्यांनी अमृतसरच्या इ-पेपर ची लिंक आमच्यासोबत शेअर केली.
तपासाअंती, आम्ही @sagrolikarBJP या ट्विटर उजरचे सोशल स्कॅनिंग केले ज्याने ही पोस्ट शेअर केली. स्कॅनिंगवरून आम्हाला समजले की वापरकर्ता एखाद्या विचारसरणीने प्रभावित आहे. ट्विटरवर युजरचे 1,300 पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. शिवचरण पाटील जून 2010 पासून ट्विटरवर सक्रिय आहेत.
निष्कर्ष: विश्वास न्यूज ने व्हायरल दाव्याचा तपास केला आणि त्यात दावा चुकीचा असल्याचे समोर आले. राहुल गांधी ह्यांनी गुरुद्वारा साहिब मध्ये लंगर मध्ये जेवण केले. व्हायरल व्हिडिओ जेवणाच्या आधीच आहे.
- Claim Review : Acting super stars doing lunger with empty plate and mask On. Insulting of gurudwara sheab. Always insulting and making foolsto public , who asked them to fake acting in gurunakaji temple.
- Claimed By : @sagrolikarBJP
- Fact Check : Misleading
Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.