X
X

Fact Check: दवाखान्यात भरती असलेल्या लता मंगेशकर ह्यांच्या ताब्यातीत सुधारणा, त्यांच्या निधनाच्या खोट्या बातम्या व्हायरल

विश्वास न्यूज च्या तपासात लता मंगेशकर ह्यांच्या निधन संबंधित पोस्ट खोट्या असल्याचे समजले. त्या मुंबई च्या ब्रीच कैंडी दवाखान्यात दाखल आहेत.

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांच्या निधनाची अफवा अनेक दिवसांपासून सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे. फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअॅप, सर्वत्र यूजर्स त्यांच्या मृत्यूची अफवा खरी मानून शेअर करत आहेत.

विश्वास न्यूजने लता मंगेशकर यांच्या प्रकृतीची माहिती गोळा केली. त्यांच्या प्रकृतीत सातत्याने सुधारणा होत असल्याचे आढळून आले. तरीही काही सोशल मीडियावर त्यांच्या मृत्यूची खोटी बातमी व्हायरल केली जात आहे. वृत्त लिहेपर्यंत लता मंगेशकर यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयातील आयसीयू वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

काय होत आज व्हायरल?
फेसबुक यूजर शैलेश कुमार स‍िंह ने 22 जानेवारी रोजी एक पोस्ट करून दावा केला: ‘लता मंगेश्कर का निधन 92 साल की उम्र मे।’

फेसबुक पोस्ट चा कन्टेन्ट इथे तसाच दिला गेला आहे. ह्याचा अर्काइव्ह व्हर्जन इथे बघा. सोशल मीडिया वर अनेक यूजर्स ह्या व्हिडिओ ला मिळत्या जुळत्या दाव्यासह शेअर करत आहेत.

तपास:
लता मंगेशकर यांच्याशी संबंधित अफवेची सत्यता जाणून घेण्यासाठी विश्वास न्यूजने प्रथम त्यांचे सोशल मीडिया खाते शोधण्यास सुरुवात केली. त्यांच्या ट्विटर हँडलवर आम्हाला 22 जानेवारी 2022 रोजीचे ट्विट आढळले. यामध्ये लोकांना अफवा पस्रवण्यापासून थांबवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ब्रीच कँडी हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये दाखल असलेल्या लता दीदींच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. संपूर्ण ट्विट येथे पहा.

त्याचप्रमाणे, 23 जानेवारी रोजी दैनिक जागरणच्या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या एका बातमीत म्हटले आहे की लता मंगेशकर अजूनही मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमधील आयसीयू वॉर्डमध्ये दाखल आहेत. त्यांच्यावर उपचार करणारे डॉ प्रीतित समदानी यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, कालपासून त्यांची प्रकृती सुधारत आहे. मात्र, त्यांना आयसीयूमध्ये उत्तम आरोग्यासाठी निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. डॉ. प्रीतित समदानी म्हणाले की, आपण सर्वांनी त्यांच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करावी. लता मंगेशकर यांना 11 जानेवारीपासून कोरोनाची लागण झाल्यामुळे मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. येथे पूर्ण बातमी वाचा.

तपास पुढे नेत विश्वास न्यूजने बॉलिवूड कव्हर करणारे ज्येष्ठ पत्रकार पराग चाचेकर ह्यांना संपर्क केला. त्यांनी सांगितले की, लता मंगेशकर यांच्या मृत्यूच्या नावाने व्हायरल झालेल्या सर्व पोस्ट खोट्या आहेत.

तपासाअंती विश्वास न्यूजने बनावट पोस्ट करणाऱ्या युजरची चौकशी केली. फेसबुक पेज शैलेश कुमार सिंगला 2.97 लाख लोकं फॉलो करतात. हा पेज 20 जानेवारी 2015 रोजी तयार करण्यात आले होते.

निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात लता मंगेशकर ह्यांच्या निधन संबंधित पोस्ट खोट्या असल्याचे समजले. त्या मुंबई च्या ब्रीच कैंडी दवाखान्यात दाखल आहेत.

  • Claim Review : लता मंगेशकर का निधन
  • Claimed By : फेसबुक पेज शैलेश कुमार स‍िंह
  • Fact Check : False
False
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later