Fact Check: सचिन तेंडुलकर रमाकांत आचरेकर ह्यांच्या अंत्यविधीच्या सामील झाले असतानाचे चित्र खोट्या दाव्यासह व्हायरल
व्हायरल दावा ज्यात सांगितले गेले आहे कि सचिन तेंडुलकर ह्यांनी सिंधुताई सपकाळांना खांदा दिला, ते चुकीचे आहे, तेंडुलकर हे सिंधुताईंच्या अंतिम संस्काराला उपस्थित नव्हते.
- By: Ankita Deshkar
- Published: Jan 6, 2022 at 05:50 PM
- Updated: Jul 10, 2023 at 06:11 PM
नवी दिल्ली (विश्वास न्यूज): नुकतेच ४ जानेवारी रोजी सिंधुताई सपकाळ ह्यांची हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू झाली. त्यानंतर सोशल मीडिया वर एक चित्र आणि त्यासोबत एक दावा व्हायरल होत आहे. दावा कार्नाय्त येत आहे कि तेंडुलकर ह्यांनी सपकाळ ह्यांच्या अंत्यसंस्काराच्या भाग घेऊन त्यांना खांदा दिला. विश्वास न्यूज च्या तपासात हा दावा खोटा असल्याचे सिद्ध झाले. तेंडुलकर हे पुण्याला त्यांच्या अंत्यसंकराला नव्हते.
काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर, Narayan Borude ह्यांनी व्हायरल चित्र शेअर केले आणि लिहले: खरा भारतरत्न !!! अभिमान आहे तुझा सर्व भारतियांना !!! सलाम !!!
त्या चित्र वर लिहले होते: आज एक गोष्ट समजली, पुरस्कार महत्वाचा नसून कर्तृत्व महत्वाचं असतं … कारण आज एका पद्मश्रीला भारतरत्नाने खांदा दिला. भावपूर्ण श्रद्धांजली माई
(सिधुताई सपकाळ ह्यांना सगळे प्रेमाने माई असे म्हणतात)
हि पोस्ट आणि ह्याचा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.
तपास:
विश्वास न्यूज ने तपासाची सुरुवात गूगल रिव्हर्स इमेज पासून केली.
आम्हाला हेच छायाचित्र, इंडियन एक्सप्रेस च्या वेबसाईट वर एका आर्टिकल मध्ये सापडले. आर्टिकल चे हेडलाईन होते, ‘Tearful Sachin Tendulkar attends coach Ramakant Achrekar’s funeral’ हे आर्टिकल ३ जानेवारी, २०१९ रोजी अपलोड केले होते. ह्याचाच अर्थ हे चित्र आताचे नाही.
हे चित्र रमाकांत आचरेकर ह्यांच्या शेवटच्या विधींचे होते.
चित्राचा कॅप्शन होता: सचिन तेंडुलकर कोच रमाकांत आचरेकर ह्यांच्या अंत्यविधीला.
सिंधुताई सपकाळ ह्या ज्येष्ठ समाज कार्यकर्ता होत्या, त्यांना अनाथांची आई म्हणून ओळखल्या जायचे. त्यांचे निधन ४ तारखेला झाले आणि दुसऱ्या दिवशी अंत्यविधी पुणे येथे पार पडले.
आम्ही सपकाळ ह्यांच्या अंतिम यात्रेचे व विधी चे चित्र देखील शोधले. त्यात देखील आम्हाला कुठेच सचिन तेंडुलकर ह्यांचे चित्र सापडले नाही.
तसेच आम्हाला कुठेच तेंडुलकर ह्यांनी सपकाळ ह्यांच्या अंत्यविधी ला उपस्थित असल्याची रिपोर्ट देखील सापडली नाही.
तपासाच्या पुढच्या टप्प्यात विश्वास न्यूज ने पुण्यातील एएनआई कॉररेस्पॉण्डेण्ट आलिम शेख ह्यांना संपर्क केला. त्यांनी सांगितले कि सिंधुताई सपकाळ ह्यांच्या अंत्यविधीला सचिन तेंडुलकर उपस्थित नव्हते, तसेच हे चित्र आताचे नाही.
शेवटच्या टप्प्यात विश्वास न्यूज ने, फेसबुक यूजर Narayan Borude ह्यांचा तपास केला. त्यात कळले कि ते मुंबई चे रहिवासी आहेत आणि त्यांचे ११०० मित्र आहेत.
निष्कर्ष: व्हायरल दावा ज्यात सांगितले गेले आहे कि सचिन तेंडुलकर ह्यांनी सिंधुताई सपकाळांना खांदा दिला, ते चुकीचे आहे, तेंडुलकर हे सिंधुताईंच्या अंतिम संस्काराला उपस्थित नव्हते.
- Claim Review : खरा भारतरत्न !!! अभिमान आहे तुझा सर्व भारतियांना !!! सलाम !!!
- Claimed By : Narayan Borude
- Fact Check : False
Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.