Fact check: चाईल्ड हेल्पलाईन 1098 उरलेले अन्न घेऊन जात नाही, व्हायरल मेसेज खोटा आहे
विश्वास न्यूज च्या तपासात समजले कि चाईल्ड हेल्पलाईन 1098 हि उरलेले अन्न गोळा करायला येते असा दावा करणारी पोस्ट खोटी, तसेच व्हायरल मेसेज खोटे आहे.
- By: Ankita Deshkar
- Published: Jan 4, 2022 at 03:04 PM
नवी दिल्ली (विश्वास न्यूज): विश्वास न्यूज ला एक संदेश मराठी मध्ये सोशल मीडिया वर व्हायरल होताना दिसलं. ह्या पोस्ट मध्ये दावा करण्यात येत होते कि, ‘तुमच्या घरी एखादा कार्यक्रम/पार्टी असेल आणि जेव्हा तुम्हाला दिसले की बरेच अन्न वाया जात आहे, तर कृपया 1098 (केवळ भारतात कुठेही) कॉल करण्यास अजिबात संकोच करू नका – चाइल्ड हेल्प लाइन .ते येऊन अन्न गोळा करतील’. विश्वास न्यूज च्या तपासात हा दावा खोटा असल्याचे समजले. 1098 चाईल्ड हेल्पलाईन आहे, ते उरलेले अन्न गोळा करत नाही.
काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर Nilesh Jain NZ ने एक स्क्रीनशॉट 15 डिसेंबर रोजी शेअर केला आणि मराठीत लिहले: ह्या पोस्ट ला जास्तीत जास्त share करा
व्हायरल स्क्रीनशॉट मध्ये लिहले होते: भारतात आनंदाची बातमी: पंतप्रधान मोदींनी जाहीर केल्याप्रमाणे- तुमच्या घरी एखादा कार्यक्रम/पार्टी असेल आणि जेव्हा तुम्हाला दिसले की बरेच अन्न वाया जात आहे, तर कृपया 1098 (केवळ भारतात कुठेही) कॉल करण्यास अजिबात संकोच करू नका – चाइल्ड हेल्प लाइन .ते येऊन अन्न गोळा करतील…कृपया हा संदेश प्रसारित करा ज्यामुळे अनेक मुलांना खायला मदत होईल. कृपया ही साखळी तोडू नका,
“प्रार्थना करणाऱ्या ओठांपेक्षा मदतीचे हात चांगले आहेत”
कृपया
कॉपी पेस्ट करायला फक्त काही सेकंद लागतात…
हा पोस्ट आणि त्याचा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.
तपास:
विश्वास न्यूज ने आपल्या तपासाची सुरुवात साध्य किवर्ड सर्च पासून केली.
आम्हाला बिसनेस स्टॅंडर्ड च्या वेबसाईट वर एक आर्टिकल 16 जुलै, 2018 रोजी प्रकाशित झाल्याचे सापडले.
आर्टिकल चे टायटल होते, ‘Childline issues clarification after receiving calls for collecting leftover food‘.
त्या आर्टिकल मध्ये लिहलेल्या मजकुरात म्हंटले गेले होते, “आम्हाला समजले आहे की एक साखळी मेल फिरत आहे ज्यामध्ये म्हटले आहे – एखाद्याने पार्टी इत्यादी नंतर उरलेले अन्न उचलण्यासाठी 1098 वर कॉल केला पाहिजे जेणेकरून ते वाया जाऊ नये. हे खरे नाही. काळजी आणि संरक्षणाची गरज असलेल्या मुलांसाठी आम्ही भारतातील एकमेव आणि सर्वात व्यापक चिल्ड्रन फोन इमर्जन्सी आउटरीच सेवा (1098) आहोत.”
ट्विटर ऍडव्हान्स सर्च द्वारे आम्ही शोधायचा प्रयत्न केला कि ‘CHILDLINE’ ने त्यांच्या अकाउंट वर काही पोस्ट केले का. त्यांच्या अकाउंट @CHILDLINE1098 वर आम्हाला 17 मार्च, 2010 रोजी केलेला एक ट्विट सापडला.
तपासाच्या पुढच्या टप्प्यात आम्ही चाइल्डलाइन संस्थेला त्यांच्या वेबसाईट वर दिलेल्या इमेल वर संपर्क केला.
विकास पुथरन, हेड रिसोर्स मोबिलायझेशन अँड कॉम्म्युनिकेशन, चाइल्डलाइन इंडिया फाउंडेशन म्हणाले, “हा फेक मेसेज पसरवला जात आहे. हे खरे नाही. चाइल्डलाइन 1098 ही संकटात सापडलेल्या मुलांसाठी मोफत आपत्कालीन हेल्पलाइन आहे. आम्ही मुलांची सुटका करतो किंवा त्यांना अत्याचारापासून संरक्षण, हरवलेली किंवा पळून गेलेली मुले किंवा इतर कोणत्याही बालसंबंधित समस्यांपासून संरक्षण देतो. आम्ही उरलेले अन्न गोळा करून ते वितरित करत नाही.”
तपासाच्या शेवटच्या टप्प्यात विश्वास न्यूज ने त्या यूजर चा तपास केला ज्यांनी हि पोस्ट शेअर केली होती. Nilesh Jain NZ ह्यांना सत्तर लोकं फॉलो करतात.
निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात समजले कि चाईल्ड हेल्पलाईन 1098 हि उरलेले अन्न गोळा करायला येते असा दावा करणारी पोस्ट खोटी, तसेच व्हायरल मेसेज खोटे आहे.
- Claim Review : चाईल्ड हेल्पलाईन 1098 उरलेले अन्न घेऊन जातात
- Claimed By : Nilesh Jain NZ
- Fact Check : False
Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.