Fact Check: पत्रकार विनोद दुआ यांचा हा शेवटचा व्हिडिओ नाही, खोटा दावा करून जुना व्हिडिओ व्हायरल
विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल दावा खोटा ठरला. विश्वास न्यूज च्या तपासात विनोद दुआ चा व्हिडिओ खोटा असल्याचे समजले.
- By: Jyoti Kumari
- Published: Dec 10, 2021 at 09:58 PM
नवी दिल्ली (विश्वास न्यूज): पत्रकार विनोद दुआ यांचे 4 डिसेंबर 2021 रोजी दिल्लीत निधन झाले. त्यानंतर त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये ते हॉस्पिटलच्या बेडवर पडलेले दिसत आहे आणि म्हणतायत की मी लवकरच बरा होऊन पुन्हा एकदा माझा शो सुरू करेन. हा व्हिडिओ विनोद दुआचा शेवटचा व्हिडिओ असल्याचा दावा पोस्टसोबत केला जात आहे. विश्वास न्यूजच्या तपासात हा दावा खोटा निघाला. विश्वास न्यूजने व्हिडिओ तपासला असता हा व्हिडिओ जुना असल्याचे आढळून आले. चुकीचा दावा करून जुना व्हिडिओ व्हायरल केला जात आहे.
काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर “The Assembly of Hope” ने 4 डिसेंबर रोजी हा व्हिडिओ शेअर केला आणि लिहिले, “जाने से पहले विनोद दुआ की आखिरी वीडियो #Vinoddua देश के प्रति आपके प्रेम को एवं निष्पक्ष पत्रकारिता को कभी हम भूल नहीं पाएंगे ||इतिहास में आपका नाम सुनहरे अक्षरों में लिखा जाएगा|”
फेसबुक वर बरेच लोकं अश्या दाव्यासह हा व्हिडिओ शेअर करत आहेत.
तपास:
आम्ही या व्हिडिओचे मुख्य फ्रेम्स घेऊन गूगल रिव्हर्स इमेजवर शोधले. आम्हाला हा व्हिडिओ exbulletin.com नावाच्या वेबसाइटवर 17 मे 2021 रोजी प्रकाशित झालेल्या बातमीत आढळला. बातमीसोबत लिहले होते, “When Vinod Dua spat venom at PM Modi even when he was hospitalized”. पूर्ण बातमी इथे बघा.
आम्हाला ह्या संबंधी एक बातमी opindia.com वर देखील सापडली. बातमी सोबत लिहले होते, “When Vinod Dua spewed venom against PM Modi even when he was hospitalised”. हि पूर्ण बातमी इथे वाचा.
आम्हाला हा व्हिडिओ विनोद दुआ ह्यांच्या फेसबुक अकाउंट वर 28 मार्च 2021 रोजी देखील अपलोड केलेला मिळाला. डिस्क्रिप्शन मध्ये लिहले होते कि विनोद दुआ कडून HW News च्या सगळ्या दर्शकांसाठी हा संदेश.
आम्हाला arnab नावाच्या ट्विटर हॅन्डल वर हा व्हिडिओ अपलोड केला. 17 मे 2021 रोजी हा व्हिडिओ अपलोड केला गेला. ह्या सोबत लिहले होते “Vinod Dua’s hatred doesn’t reduce even when on an ICU bed.”
या संदर्भात पुष्टी करण्यासाठी, आम्ही अपोलो रुग्णालयाच्या पीआर सृष्टी शर्मा ह्यांना संपर्क केला, जिथे आम्हाला पीआरओने सांगितले की हा व्हिडिओ आताचा नाही. विनोद दुआ यांच्याबाबतचे निवेदन रुग्णालयाकडून जारी करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. त्याच्या शेवटच्या काळात असा एकही व्हिडिओ शूट झालेला नाही. खोटा दावा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हायरल झालेला व्हिडिओ जुना असल्याचे स्पष्ट झाले आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओची घटना किती जुनी आहे, याची खात्री विश्वास न्यूज स्वतंत्रपणे केली नाही. पण हे निश्चित आहे की व्हायरल व्हिडिओ मार्च 2021 पासून इंटरनेटवर उपलब्ध आहे.
आमच्या तपासाच्या शेवटी, आम्ही व्हिडिओ शेअर करणारे फेसबुक पेज तपासले. या पेजला 627 लोक फॉलो करत असल्याचे आम्हाला समजले. हे पेज 21 जुलै 2020 रोजी तयार केले गेले.
निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल दावा खोटा ठरला. विश्वास न्यूज च्या तपासात विनोद दुआ चा व्हिडिओ खोटा असल्याचे समजले.
- Claim Review : जाने से पहले विनोद दुआ की आखिरी वीडियो
- Claimed By : The Assembly of Hope
- Fact Check : False
Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.