X
X

Fact Check: मुंबई हल्ल्यात शाहिद झालेल्या तुकाराम ओंबळे ह्यांचे हे व्हायरल चित्र नाही, चित्रपटाचे सीन खोट्या दाव्यासह व्हायरल

दिवंगत तुकाराम ओंबळे यांच्या नावाने सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले चित्र हे एका चित्रपटातील दृश्य आहे. जे आता खोट्या दाव्यासह शेअर केले जात आहेत.

  • By: Pragya Shukla
  • Published: Nov 27, 2021 at 09:03 PM
  • Updated: Dec 6, 2021 at 02:33 PM

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): पोलिसांच्या गणवेशात रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या एका व्यक्तीचे चित्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो मुंबई मधील 26/11 च्या हल्ल्यात शहीद झालेले दिवंगत कॉन्स्टेबल तुकाराम ओंबळे यांचा असल्याचा दावा केला जात आहे. फेसबुक आणि ट्विटरवर यूजर्स हे छायाचित्र शेअर करून स्वर्गीय तुकाराम ओंबळे यांना श्रद्धांजली अर्पण करत आहेत. विश्वास न्यूजच्या तपासात हा दावा दिशाभूल करणारा निघाला. दिवंगत तुकाराम ओंबळे यांच्या नावाने सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला फोटो एका चित्रपटातील निघाला. जो आता खोट्या दाव्यासह शेअर करण्यात येत आहे.

काय होत आहे व्हायरल?

फेसबुक यूजर Girija Shanker Shukla ने व्हायरल चित्र शेअर केले आणि लिहले, “स्वर्गीय तुकाराम ओम्बले जी! कितना बड़ा कलेजा चाहिए AK-47 की नली के सामने अपनी छाती कर के सैकड़ों लोगों को मार चुके राक्षस का गिरेबान पकड़ने के लिए… एक गोली, दो गोली, दस गोली, बीस गोली… चालीस गोली… चालीस गोलियां कलेजे के आरपार हो गईं पर हाथ से उस राक्षस की कॉलर नहीं छूटी। प्राण छूट गया, पर अपराधी नहीं छूटा… कर्तव्य निर्वहन का सर्वश्रेष्ठ उदाहरण है यह। स्वर्गीय ओम्बले सेना में नायक थे। सेना से रिटायर होने के बाद उन्होंने मुंबई पुलिस ज्वाइन की थी। चाहते तो पेंशन ले कर आराम से घर रह सकते थे। पर नहीं, वे जन्मे थे लड़ने के लिए, जीतने के लिए।”

ह्या पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:

व्हायरल दाव्याचा तपास आम्ही हे चित्र गूगल रिव्हर्स इमेज मध्ये सर्च करून केला. आम्हाला Eros Now Movies Preview च्या यूट्यूब चॅनलवर व्हायरल चित्राशी संबंधित 4 मिनिटे 36 सेकंदांचा व्हिडिओ सापडला. व्हिडिओच्या वर्णनात दिलेल्या माहितीनुसार, द अटॅक्स ऑफ 26/11 या चित्रपटातील एक दृश्य ह्यात दाखवण्यात आला आहे, ज्यामध्ये स्कोडा कारमधून पळून जाणाऱ्या दहशतवाद्याला पकडण्यासाठी पोलीस बॅरिकेड्स लावतात. 4 मिनिटे 36 सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये 3 मिनिटे 58 सेकंदावर हे दृश्य दिसते.

तपासाच्या पुढच्या टप्प्यात आम्ही काही कीवर्डद्वारे Google वर हे चित्र शोधले. यादरम्यान, आम्हाला टाइम्स ऑफ इंडियाच्या वेबसाइटवर व्हायरल दाव्याशी संबंधित एक रिपोर्ट सापडला. रिपोर्ट मध्ये तुकाराम तुकाराम ओंबळे यांचा खरा फोटो प्रसिद्ध करताना, तुकाराम गोपाळ ओंबळे हे मुंबई पोलिसात उपनिरीक्षक होते, अशी माहिती देण्यात आली आहे. मुंबई पोलिसात भरती होण्यापूर्वी त्यांनी सैन्यात देखील सेवा केली होती. अजमल कसाबला जिवंत पकडण्यात ओंबळेला आपला जीव गमवावा लागला होता. त्यांना सरकारने अशोक चक्र दिले होते, हे देखील लिहले गेले होते.

व्हायरल फोटोच्या अधिक माहितीसाठी, विश्वास न्यूजने मुंबईतील दैनिक जागरणच्या एंटरटेनमेंट बीट कव्हर करणाऱ्या स्मिता श्रीवास्तव ह्यांना संपर्क केला. व्हायरल झालेला दावा आम्ही त्यांच्यासोबत व्हॉट्सअॅपद्वारे शेअर केला आहे. त्यांनी आम्हाला सांगितले की व्हायरल दावा खोटा आहे. हे 26/11 हल्ल्यावर बनवण्यात आलेल्या एका चित्रपटातील दृश्य आहे, जे लोकं आता खरा समजून शेअर करत आहे. खरं तर या चित्रपटात तुकारामांची भूमिका साकारणारा कलाकार सुनील जाधव आहे.

तपासाअंती, आम्ही त्या फेसबुक यूजरचे सोशल स्कॅनिंग केले ज्याने ही पोस्ट शेअर केली. स्कॅनिंगवरून आम्हाला कळले की फेसबुक युजर गिरिजा शंकर शुक्ला हे उत्तर प्रदेशातील लखनऊ शहरातील रहिवासी आहे. त्याचे फेसबुक अकाउंट 2010 पासून सक्रिय आहे.

निष्कर्ष: दिवंगत तुकाराम ओंबळे यांच्या नावाने सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले चित्र हे एका चित्रपटातील दृश्य आहे. जे आता खोट्या दाव्यासह शेअर केले जात आहेत.

  • Claim Review : स्वर्गीय तुकाराम ओम्बले जी! कितना बड़ा कलेजा चाहिए AK-47 की नली के सामने अपनी छाती कर के सैकड़ों लोगों को मार चुके राक्षस का गिरेबान पकड़ने के लिए... एक गोली, दो गोली, दस गोली, बीस गोली... चालीस गोली... चालीस गोलियां कलेजे के आरपार हो गईं पर हाथ से उस राक्षस की कॉलर नहीं छूटी। प्राण छूट गया, पर अपराधी नहीं छूटा... कर्तव्य निर्वहन का सर्वश्रेष्ठ उदाहरण है यह। स्वर्गीय ओम्बले सेना में नायक थे।
  • Claimed By : Girija Shanker Shukla
  • Fact Check : False
False
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later