X
X

Fact Check: शाहरुख खान च्या निधनाची अफवा पसरवणारी व्हायरल पोस्ट खोटी आहे

विश्वास न्यूज च्या तपासात शाहरुख खान च्या निधनासोबत संबंधित व्हायरल पोस्ट खोटी असल्याचे सिद्ध झाले. विविध चित्र वापरून हि खोटी बातमी पसरवण्यात येत आहे.

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल मीडिया वर तीन चित्रांचा कॉलेज व्हायरल होत आहे. ह्यात दावा करण्यात येत आहे कि बॉलीवूड चे किंग खान शाहरुख खान ची एका प्लॅन क्रॅश मध्ये मृत्यू झाली. विश्वास न्यूज च्या तपासात हि पोस्ट खोटी असल्याचे समोर आले. व्हायरल चित्र जुने आहे.

काय होत आहे व्हायरल?
बरेच फेसबुक यूजर्स ह्या चित्रासोबत दावा करत आहे कि शाहरुख खान ची प्लॅन क्रॅश मध्ये मृत्यू झाली.

ह्या कॉलेज मध्ये पहिल्या चित्रात, एका शव वाहन सोबत अनिल कपूर दिसतो. दुसऱ्या चित्रात एका विमानसोबत शाहरुख चे चित्र दिसत आहे आणि वर लिहले आहे कि शाहरुख यांची मृत्यू. तसेच तिसऱ्या चित्रात RIP 1965-2021 लिहले होते.

फेसबुक पोस्ट चा कन्टेन्ट इथे जसाच्या तास दिला आहे. आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:
विश्वास न्यूज ने व्हायरल ऑईस्ट चा तपास चित्र शोधून केली. सगळ्यात आधी आम्ही अनिल कपूर चे चित्र शोधले. त्याला रिव्हर्स इमेज टूल मध्ये अपलोड केले आणि सर्च केले. आम्हाला हे चित्र एका न्यूज वेबसाईट वर मिळाले. हिन्दुस्‍तान टाइम्‍स च्या वेबसाइट वर एक मार्च 2018 रोजी प्रकाशित ह्या बातमीत ह्या फोटो बद्दल सांगितले आहे कि श्री देवी ह्यांच्या अंतिम संस्कारांच्या वेळी अनिल कपूर तिथे असल्याचा हा फोटो आहे. हे चित्र पीटीआय नि दिले होते. पूर्ण बातमी इथे वाचा.

आता आम्ही दुसऱ्या, म्हणजेच प्लॅन च्या चित्राचे तपास केले. हे चित्र आम्हाला एविएशन एक्सीडेंट नावाच्या वेबसाईट वर मिळाले. 17 जानेवारी 2008 च्या चित्रात हे सांगितले होते कि हे चित्र ब्रिटिश एयरवेज च्या बोइंग फ्लाइट चे आहे. ह्या बद्दल अधिक माहिती इथे वाचा.

तपासाच्या पुढच्या टप्प्यात विश्वास न्यूज ने मुंबई च्या दैनिक जागरण च्या एंटरटेनमेंट बीट कवर करणाऱ्या स्मिता श्रीवास्‍तव ह्यांना संपर्क केला. त्यांनी सांगितले कि हि बातमी खोटी आहे.

विश्वास न्यूज ने शेवटी खोटी पोस्ट करणाऱ्या यूजर चा तपास केला. त्यात कळले कि यूजर यंगून चा रहिवासी आहे आणि त्यांना 54 लोकं फॉलो करतात.

निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात शाहरुख खान च्या निधनासोबत संबंधित व्हायरल पोस्ट खोटी असल्याचे सिद्ध झाले. विविध चित्र वापरून हि खोटी बातमी पसरवण्यात येत आहे.

  • Claim Review : शाहरुख खान ची मृत्यू
  • Claimed By : फेसबुक यूजर
  • Fact Check : False
False
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later