Fact Check : मुख्तार अब्बास नकवी ह्यांनी नाही बदलला आपला धर्म, व्हायरल पोस्ट खोटी आहे
विश्वास न्यूज च्या तपासात कळले कि मुख्तार अब्बास नकवी ने धर्म बदलला असा दावा करणारी पोस्ट पूर्णपणे खोटी आहे. 21 सप्टेंबर रोजी श्री श्री श्री स्वात्मानन्देन्द्र सरस्वती महास्वामी ने केंद्रीय मंत्री ह्यांना एक भेट दिली. हा व्हिडिओ तेव्हाचा आहे जो लोकं आता खोट्या दाव्यासह व्हायरल करत आहे.
- By: Ashish Maharishi
- Published: Oct 5, 2021 at 02:32 PM
नवी दिल्ली (विश्वास न्यूज): केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी ह्यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ह्या व्हिडिओ मध्ये काही पंडित केंद्रीय मंत्री ह्यांच्या समोर संस्कृत मध्ये श्लोक वाचताना दिसतात आणि तसेच काही उपहार देताना दिसतात. सोशल मीडिया यूजर्स ह्या व्हिडिओ ला व्हायरल करत दावा करत आहेत कि मुख्तार अब्बास नकवी ह्यांनी आपले धर्म बदलले आहे. विश्वास न्यूज ने व्हायरल पोस्ट चा तपास केला, त्यात आम्हाला कळले कि सप्टेंबर 2021 ला विशाख श्री शारदापीठ, पेंडुर्ति, विशाखापट्टनम चे आदरणीय गुरु श्री श्री श्री स्वात्मानेंद्र सरस्वती महास्वमी ह्यांनी केंद्रीय मंत्री ची भेट घेतली. ह्या भेटीचा व्हिडिओ काही लोकं खोट्या दाव्यासह व्हायरल करत आहे. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे सिद्ध झाले.
काय होत आहे व्हायरल?
फेसबुक पेज बोलता भारत टीवी ने 29 सप्टेंबर रोजी एक व्हिडिओ अपलोड केला आणि दावा केला: “मुख्तार अब्बास नकवी ने अपना धर्म बदल लिया।”
ह्या व्हिडिओ ला खरे समजून लोकं ह्या व्हिडिओ ला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर व्हायरल करत आहेत. ह्या पोस्ट चा कन्टेन्ट जसाच्या तास इथे दिलेला आहे.
फेसबुक पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.
तपास:
विश्वास न्यूज ने व्हायरल पोस्ट चा तपास केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी ह्यांचा मीडिया अकाउंट शोधण्यापासून सुरुवात केली. आम्हाला त्यांच्या अधिकृत ट्विटर हॅन्डल वर एक पोस्ट मिळाली. 21 सप्टेंबर 2021 रोजी केलेल्या ह्या ट्विट मध्ये चार चित्र होते. चित्रात तेच लोकं दिसत होते जे व्हायरल व्हिडिओ मध्ये होते.
तपासादरम्यान आम्हाला संबंधित भेटीचा व्हिडिओ मिळाला, जो आता खोट्या दाव्यासह व्हायरल होत आहे. तो आम्हाला मुख्तार अब्बास नकवी ह्यांच्या फेसबुक पेज वर मिळाला. ह्यात लिहले होते: “विशाख श्री शारदापीठ, पेंडुर्ति, विशाखापट्टनम के आदरणीय गुरु श्री श्री श्री स्वात्मानेंद्र सरस्वती महास्वमी जी से आज नई दिल्ली के अंत्योदय भवन में भेंट के दौरान उनका आशीर्वाद प्राप्त हुआ एवं 7 से 15 अक्टूबर तक आयोजित होने वाले श्री शारदा स्वरुप राजश्यामला सरन्नावरात्रि महोत्सव के लिए मुझे आमंत्रित किया।”
हा व्हिडिओ इथे क्लीक करून बघा.
तपासाच्या पुढच्या टप्प्यात विश्वास न्यूज ने मुख्तार अब्बास नकवी ने सरकारी नंबर वर संपर्क केला. एका अधिकाऱ्याने आम्हाला सांगितले कि व्हायरल पोस्ट खोटी आहे.
आता आम्ही हे जाणून घेतले कि मुख्तार अब्बास नकवी ह्यांच्याबद्दल पोस्ट करणाऱ्या यूजर बद्दल काही माहिती मिळते का. आम्हाला सोशल स्कॅनिंग मध्ये कळले कि फेसबुक पेज भारत टीवी ला 51 हजार पेक्षा जास्ती फॉलोवर्स आहेत.
निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात कळले कि मुख्तार अब्बास नकवी ने धर्म बदलला असा दावा करणारी पोस्ट पूर्णपणे खोटी आहे. 21 सप्टेंबर रोजी श्री श्री श्री स्वात्मानन्देन्द्र सरस्वती महास्वामी ने केंद्रीय मंत्री ह्यांना एक भेट दिली. हा व्हिडिओ तेव्हाचा आहे जो लोकं आता खोट्या दाव्यासह व्हायरल करत आहे.
- Claim Review : मुख्तार अब्बास नकवी ने अपना धर्म बदल लिया।
- Claimed By : भारत टीवी
- Fact Check : False
Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.