X
X

Fact Check: टाटा कंपनी नाही देत आहे, ‘अनिव्हर्सरी सेलिब्रेशन’ गिफ्ट

विश्वास न्यूज च्या तपासात टाटा च्या कंपनी ची प्रोमोशनल लिंक खोटी असल्याचे सिद्ध झाले.

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): फेसबुक, ट्विटर आणि व्हाट्सअँप वर एक मेसेज व्हायरल होताना दिसत आहे. मेसेज ला टाटा कंपनी चा अनिव्हर्सरी गिफ्ट म्हणून व्हायरल करण्यात येत आहे. ह्यात दावा करण्यात येत आहे कि 150व्या वाढदिवसानिमित्त लोकांना कार जिंकण्याची एक संधी देत आहेत. ह्या सोबत एक लिंक देखील शेअर करण्यात येत आहे. विश्वास न्यूज ला आपल्या फॅक्ट चेकिंग व्हाट्सअँप चॅट बोट वर देखील हा मेसेज फॅक्ट चेकिंग करतात पाठवण्यात आला. विश्वास न्यूज ला आपल्या तपासात कळले कि हा दावा खोटा आहे. टाटा कंपनी असा कुठलाच प्रोमोशन करत नाही आहे.

काय होत आहे व्हायरल?
सोशल मीडिया च्या वेग-वेगळ्या प्लॅटफॉर्म हा एकाच प्रकारचा मेसेजे व्हायरल होत होता. एका यूजर ने आमच्या फॅक्ट चेकिंग नंबर वर +91 95992 99372 देखील हा पाठवला. ह्या मेसेज मध्ये लिहले होते, ‘🎉🎉Tata Groups. 150th Anniversary Celebration!!🎊🎊Click on the link to participate in the event to win a car! ! ! !

व्हायरल मेसेज चा स्क्रीनशॉट इथे बघा.

आम्हाला असा मेसेज फेसबुक वर देखील मिळाला. Samarendra Nath Chattopadhyay नावाच्या फेसबुक यूजर ने देखील हा मेसेज शेअर केला होता.
आर्काइव्ह लिंक इथे बघा.

तपास:
विश्वास न्यूज ने सगळ्यात आधी ह्या पोस्ट मध्ये शेअर करण्यात येणाऱ्या लिंक वर क्लीक केले. पेज वर टाटा चा लोगो होता, पण लिंक बघितल्याबरोबर आम्हाला कळले कि हि टाटा ची अधिकृत लिंक नाही. आम्ही तपास पुढे सुरु ठेवला.

आम्ही रेलेवंट किवर्डस च्या मदतीने इंटरनेट वर सर्च केले. आम्हाला ह्या स्कीम बद्दल माहिती मिळाली नाही. टाटा कंपनी ने जर का अशी कुठली स्कीम काढली असती तर त्याची बातमी नक्की आली असती. पण आम्हाला अधिकृत मीडिया कव्हरेज मिळाले नाही.

आम्ही ह्या संबंधी सरळ टाटा सोबत संपर्क केला. मेसेज वर टाटा ट्रस्ट च्या पीआरओ ने सांगितले, “हि लिंक टाटा ची नाही. टाटा ने अशी कुठलीच स्कीम काढली नाही.” त्यांनी आमच्या सोबत त्यांच्या अधिकृत ट्विटर हॅन्डल वर ह्या मेसेज चे खंडन करणारे ट्विट चे लिंक देखील शेअर केले.

अधिक माहिती साठी विश्वास न्यूज ने साइबर सुरक्षा तज्ञ आणि राजस्थान सरकार च्या पब्लिक ग्रीवांस कमेटी चे पूर्व आईटी सलाहकार आयुष भारद्वाज ह्यांना संपर्क केला. त्यांनी आम्हाला सांगितले, “हि वेबसाईट अपराध्यांद्वारा तयार केली आहे. अश्या लिंक चा उद्देश्य यूजर्स च्या उपकरणांमध्ये मालवेअर टाकणे असते. त्यानंतर कीलॉगिंग च्या माध्यमाने, यूजर्स च्या गुप्ता सूचना चोरण्यात येतात, जसे कि नेटबँकिंग, सोशल मीडिया अकाउंट इत्यादी.”
भारद्वाज ह्यांनी ह्या लिंक चा उपयोग न करण्याचा सल्ला दिला.

आम्ही फेसबुक वर हा मेसेज शेअर करणारीकरणारे यूजर Samarendra Nath Chattopadhyay ह्यांचा प्रोफाइल तपासला. यूजर नि माहिती हाईड केलेली आहे.

निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात टाटा च्या कंपनी ची प्रोमोशनल लिंक खोटी असल्याचे सिद्ध झाले.

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later