X
X

Fact Check: हि मुंबई मधील नवीन, ‘बेस्ट’ बस नाही, लंडनच्या बस चे एडिटेड चित्र होत आहे खोट्या दाव्यासह व्हायरल

विश्वास न्यूज ने शेवटच्या टप्प्यात फेसबुक यूजर Suresh Yallappa Chalwadi चे बॅकग्राऊंड चेक केले. त्यात कळले कि ते मुंबई चे रहिवासी आहे.

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): विश्वास न्यूज ला एक चित्र सोशल मीडिया वर व्हायरल होताना दिसले. ह्या चित्रात एक लाल रंगाची डबल-डेकर बस दिसत होती, ह्या बस वर मराठी आणि इंग्रजी मध्ये बेस्ट लिहले होते. तसेच ह्या बस वर कोलाबा डेपोट देखील लिहले होते. विश्वास न्यूज च्या तपासात कळले कि हे चित्र भारतातील, मुंबई मधील नसून लंडन चे आहे.

काय होत आहे व्हायरल?
विश्वास न्यूज ला एक बस चे छायाचित्र व्हायरल होताना दिसले. फेसबुक यूजर, Suresh Yallappa Chalwadi ह्यांनी हे चित्र पोस्ट केले आणि मराठीत लिहले, “एक नवा लूक बेस्ट इलेक्ट्रिक डबल डेकर बेस्टच्या कुलाबा आगारांमध्ये दाखल
ह्या पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:
विश्वास न्यूज ने तपासाची सुरुवात, साध्या गूगल रिव्हर्स इमेज सर्च मेथड ने केली.

आम्हाला असेच चित्र (झूम न केलेले), डबल-डेकर बस च्या विकिपीडिया पेज वर मिळाले, ज्यात आम्हाला खऱ्या चित्रात कुठेच बेस्ट असे लिहलेले दिसले नाही.

ह्या चित्राच्या कॅप्शन मध्ये लिहले होते: A New Routemaster bus operating in London
ह्याचाच अर्थ हे स्पष्ट आहे कि, हे चित्र लंडन चे आहे, मुंबई चे नाही.

आम्ही अधिक माहिती साठी ह्या चित्रावर क्लीक केले, विश्वास न्यूज ला कळले कि ह्या बस वर व्हिक्टोरिया असे लिहले होते, आणि तीच नंबर प्लेट होती जी व्हायरल होत असलेल्या चित्रावर होती.

विकिमीडिया प्रमाणे, हे चित्र 25 जून, 2015 मध्ये काढले होते.

flickr.com प्रमाणे, हे चित्र मार्टिन नावाच्या फोटोग्राफर ने काढले आहे.

आता हे कळले होते कि हे चित्र लंडन चे आहे.

तपासाच्या पुढच्या टप्प्यात विश्वास न्यूज ने बेस्ट चे पीआरओ मनोज वरदे ह्यांना संपर्क केला. आम्हाला त्यांनी सांगितले, “बेस्ट चा लोगो असलेले बस चित्र, जे व्हायरल होत आहे, ते खोटे आहे. ह्या बस ची सेवा मुंबई मध्ये सुरु झाली नाही. एका बस च्या चित्रावर बेस्ट चा लोगो लावून शेअर करण्यात येत आहे.”

विश्वास न्यूज ने शेवटच्या टप्प्यात फेसबुक यूजर Suresh Yallappa Chalwadi चे बॅकग्राऊंड चेक केले. त्यात कळले कि ते मुंबई चे रहिवासी आहे.

निष्कर्ष: विश्वास न्यूज ने शेवटच्या टप्प्यात फेसबुक यूजर Suresh Yallappa Chalwadi चे बॅकग्राऊंड चेक केले. त्यात कळले कि ते मुंबई चे रहिवासी आहे.

  • Claim Review : एक नवा लूक बेस्ट इलेक्ट्रिक डबल डेकर बेस्टच्या कुलाबा आगारांमध्ये दाखल
  • Claimed By : Suresh Yallappa Chalwadi
  • Fact Check : False
False
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later