X
X

Fact Check: लालबाग च्या राजाच्या मुख दर्शन चे पाच वर्ष जुने व्हिडिओ क्लिप आता होत आहे व्हायरल

विश्वास न्यूज च्या तपासात गणपती च्या मुख दर्शन च्या नावावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ आणि त्यांच्या सोबत चा दावा दिशाभूल करणारा असल्याचे सिद्ध झाले. व्हायरल व्हिडिओ पाच वर्ष जुना सप्टेंबर 2016 चा आहे.

  • By: Jyoti Kumari
  • Published: Sep 14, 2021 at 08:51 PM
  • Updated: Oct 31, 2022 at 05:28 PM

विश्वास न्यूज (नवी दिल्ली): संपूर्ण देशात 10 सप्टेंबर गणेश चतुर्थी पासून दहा दिवस गणेश उत्सव साजरा करण्यात येत आहे. ह्या दरम्यान सोशल मीडिया वर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. लालबाग चा राजा चा 57 सेकेंड चा सांगून हा व्हिडिओ आत्ताचा असल्याचे सांगण्यात येत आहे. व्हिडिओ मध्ये गणपती च्या मूर्ती चे अनावरण करताना बघितल्याजाऊ शकते. विश्वास न्यूज च्या तपासात हा दावा दिशाभूल करणारा ठरला. व्हायरल होत असलेला व्हिडिओ आत्ताचा नसून 2016 चा आहे.

काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर Sanjeev Kaushik ने व्हायरल व्हिडिओ क्लिप शेअर करून लिहले: लाल बाग के राजा का प्रथम दर्शन

ह्या पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.
फेसबुक वर अन्य यूजर्स हा व्हिडिओ ह्याच दाव्यासह व्हायरल करत आहे.

तपास:
विश्वास न्यूज ने व्हायरल व्हिडिओ चा तपास InVID टूल सर्च पासून सुरु केला. आम्ही व्हिडिओ च्या किफ्रेम्स काढून त्यावर गूगल रिव्हर्स इमेज सर्च चा वापर केला. आम्हाला ह्यातले एक चित्र लोकसत्ता च्या वेबसाईट वर 2 सप्टेंबर 2016 रोजी प्रकाशित एका बातमीत मिळाले. बातमीत लिहले होते, Lalbaugcha Raja : ‘लालबागचा राजा’ मुखदर्शन” हि पूर्ण बातमी इथे वाचा.

आम्हाला ह्या संबंधित एक व्हिडिओ Loksatta Live च्या अधिकृत चॅनेल वर देखील 1 सप्टेंबर 2016 रोजी अपलोड केलेला मिळाला व्हिडिओ वर लिहले होते: Lalbaugcha Raja first look 2016 | Mukh Darshan Live अजून सर्च केल्यावर आम्हाला Rajshri Marathi नावाच्या युट्युब चॅनेल वर देखील हा व्हिडिओ 3 सप्टेंबर 2016 रोजी अपलोड केलेला मिळाला.  “Lalbaugcha Raja FIRST Look | Mukh Darshan | Watch Now | Ganesh Chaturthi 2016 ”

IndiaTV च्या अधिकृत चॅनेल वर 2 सप्टेंबर 2016 रोजी हा व्हिडिओ अपलोड केला होता. व्हिडिओ सोबत लिहले होता: यहां देखें लालबागचा राजा 2016 का फर्स्ट लुक. पूर्ण व्हिडिओ इथे क्लिक करून बघा.

आता आम्ही किवर्डस चा वापर करून, गूगल वर लालबागचा राजा 2021 शोधले त्यात आम्हाला टाइम्स नाउ न्यूज आणि द टाइम्स ऑफ इंडिया द्वारे प्रकाशित बातम्या मिळाल्या. ह्या बातम्यांमधल्या गणपती मूर्तींचे चित्र व्हायरल चित्रासारखे नव्हते. ह्या वर्षी मूर्ती फक्त चार फूट उंच आहे आणि म्हणून ती जास्ती लांब नाही.

लालबागचा राजा च्या अधिकृत ट्विटर हॅन्डल वर देखील 10 सप्टेंबर 2021 रोजी बाप्पा चा फर्स्ट लुक व्हिडिओ ट्विट करून शेअर केला गेला. व्हिडिओ ट्विट करून लिहले होते: लालबागचा राजा का प्रथम दर्शन 2021 (Lalbaugcha Raja First Look 2021)

अधिक माहिती साठी आम्ही लालबागचा राजा कमेटी चे  बालासाहेब कांबळे ह्यांना संपर्क केला. त्यांनी आम्हाला सांगितले कि व्हिडिओ 2016 चा आहे आताचा नाही. त्यांनी आमच्या सोबत ह्या वर्षीचे व्हिडिओ आणि फुटेज शेअर केले. आणि व्हायरल दावा खोटा असल्याचे सांगितले.

तपासाच्या शेवटच्या टप्प्यात आम्ही व्हिडिओ शेअर करणाऱ्या यूजर चा तपास केला. त्यात कळले कि यूजर दिल्ली चा रहिवासी आहे. त्यांना फेसबुक वर 789 लोकं फॉलो करतात.

निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात गणपती च्या मुख दर्शन च्या नावावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ आणि त्यांच्या सोबत चा दावा दिशाभूल करणारा असल्याचे सिद्ध झाले. व्हायरल व्हिडिओ पाच वर्ष जुना सप्टेंबर 2016 चा आहे.

  • Claim Review : लाल बाग राजा चे प्रथम दर्शन
  • Claimed By : फेसबुक यूजर Sanjeev Kaushik
  • Fact Check : False
False
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later