X
X

Fact Check: अखिलेश सिंह यादव यांच्यासोबत अभिषेक बच्चन यांचे चित्र 2017 चे आहे

विश्वास न्यूज च्या तपासात कळले कि अभिषेक बच्चन आणि अखिलेश यादव यांचे व्हायरल छायाचित्र जुने आहे. त्याचा आताच्या उत्तर प्रदेश च्या निवडणुकांसोबत काहीच संबंध नाही.

  • By: Umam Noor
  • Published: Aug 3, 2021 at 04:32 PM
  • Updated: Jul 1, 2022 at 12:00 PM

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): उत्तर प्रदेश मध्ये येत्या काही दिवसातच विधान सभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत, असे असताना बऱ्याच खोट्या बातम्या सोशल मीडिया वेबसाईट वर व्हायरल होत आहेत. अश्याच एका चित्रात समाजवादी पार्टी चे नेते आणि उत्तर प्रदेश चे पूर्व मुख्यमंत्री अखिलेश सिंह यादव यांचे एक चित्र व्हायरल झाले आहेत ज्यात त्यांच्या पत्नी डिम्पी यादव आणि बॉलीवूड अभिनेते अभिषेक बच्चन देखील आहे. विश्वास न्यूज च्या तपासात हे चित्र 2017 मधील असल्याचे समजले.

काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर Devendra Sharma Munna Pandit ने व्हायरल चित्र शेअर केले आणि लिहले: ‘मा. अखिलेश यादव जी से मुलाकात करते बालिबुड अभिनेता अभिषेक बच्चन जी #2022_साईकिल #जयसमाजवाद’.
पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:
आमच्या तपासाची सुरुवात आम्ही गूगल रिव्हर्स इमेज सर्च पासून केली. सर्च मध्ये आम्हाला अखिलेश यादव यांचे अधिकृत ट्विटर अकाउंट सापडले. त्यांनी एक ट्विट 20 ऑगस्ट 2017 रोजी केले होते. त्यात लिहले होते: Wishing Abhishek Bachchan and his team all the best for the Pro Kabaddi League.

या ट्विट वरच आम्ही आमचा पुढचा तपास केला. आम्हाला सर्च मध्ये uttarpradesh.org वर 20 ऑगस्ट 2017 रोजी प्रकाशित झालेले एक आर्टिकल मिळाले. आर्टिकल मध्ये दिलेल्या माहिती प्रमाणे, उत्तर प्रदेश ची राजधानी नवी दिल्ली मध्ये सध्या प्रो कबड्डी चे आयोजन करण्यात आले आहे. युपी ची टीम असल्यामुळे आयोजन लखनऊ मध्ये केले गेले. यात अभिनेता अभिषेक बच्चन हे जयपुर पिंक पैंथर्स च्या मॅच मध्ये सहभागी होण्यासाठी लखनऊ येथे पोहोचले. त्यासोबतच त्यांनी अखिलेश यादव यांची भेट घेतली आणि अखिलेश यांनी टीम ला शुभेच्छा दिल्या.

व्हायरल पोस्ट च्या पुष्टी साठी विश्वास न्यूज ने समाजवादी पार्टी चे प्रवक्ता सुनील सिंह यादव यांना संपर्क केला. त्यांनी आम्हाला सांगितले कि हे चित्र काही दिवसात व्हायरल झाले पण हे जुने आहे.

आम्ही व्हायरल पोस्ट करणाऱ्या फेसबुक यूजर चा सोशल स्कॅन केल्यावर कळले कि यूजर एका विशिष्ट पार्टी बद्दल पोस्ट करतात.

निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात कळले कि अभिषेक बच्चन आणि अखिलेश यादव यांचे व्हायरल छायाचित्र जुने आहे. त्याचा आताच्या उत्तर प्रदेश च्या निवडणुकांसोबत काहीच संबंध नाही.

  • Claim Review : अखिलेश यादव जी से मुलाकात करते बालिबुड अभिनेता अभिषेक बच्चन जी #2022_साईकिल #जयसमाजवाद'.
  • Claimed By : Devendra Sharma Munna Pandit
  • Fact Check : False
False
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later