X
X

Fact Check: काश्मीरच्या वरिष्ठ पत्रकाराचे चित्र रवीश कुमारच्या नावाने व्हायरल

विश्वास न्यूज च्या तपासात रवीश कुमारच्या नावावर व्हायरल होत असलेली पोस्ट खोटी सल्याचे समोर आले. चित्रात फयाज बुखारी आहेत.

विश्वास न्यूज (नवी दिल्ली): सोशल मीडिया वर सध्या एनडीटीव्ही चे पत्रकार रवीश कुमार आणि चॅनेल चे पूर्व पत्रकार फयाझ बुखारी यांचे एक छायाचित्र खोट्या दाव्यासह व्हायरल होत आहे. यात व्‍यंगात्मक स्वरूपात लिहले आहे कि दानिश सिद्दीकी सोबत अफगाणिस्तान मध्ये काय झाले हे माहिती करून घेण्यासाठी रवीश कुमार यांना पाठवायला हवे. सोबतच एक पत्रकार जमिनीवर दिसतात. यूजर्स दावा करत आहेत कि चित्रात रवीश कुमार आहेत. आमच्या तपासात व्हायरल पोस्ट खोटी असल्याचे समोर आले. चित्रात दिसत असलेले पत्रकार फयाज बुखारी आहे आणि त्यांचे छायाचित्र २००६ चे आहे.

काय होत आहे व्हायरल?
फेसबुक पेज ‘India272+’ ने 22 जुलै रोजी एक पोस्ट अपलोड केली आणि त्यात लिहले: ‘दानिश सिद्दीकी के साथ क्या हुआ था। ये जानने के लिए रवीश कुमार को अफगानिस्तान भेजना चाहिए। क्‍योंकि खतरों से खेलने वाला अकेला यही पत्रकार है।’

पोस्ट मध्ये डॅनिश सिद्दीकी व्यतिरिक्त अजून एका पत्रकाराचे चित्र दिसत आहे.
फेसबुक पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.
हि पोस्ट आम्हाला सोशल तमाशा नावाच्या फेसबुक पेज वर देखील मिळाली. इथूनच हि सगळीकडे व्हायरल झाली.

तपास:
विश्वास न्यूज ने व्हायरल पोस्ट चा तपास गूगल रिव्हर्स इमेज सर्च पासून काळे. व्हायरल छायाचित्र सर्च करताना आम्हाला एनडीटीव्ही चे युट्युब चॅनेल मिळाले. तिथे आम्हाला 27 अगस्‍त 2013 रोजी अपलोड केलेले ब्लूपर व्हिडिओ मिळाले (Bloopers) मिळाले. ह्याच्या सुरुवातीला आम्हाला एक व्यक्ती दिसतो ज्याला व्हायरल पोस्ट रवीश कुमार असल्याचे सांगितले गेले आहे.

तपासादरम्यान विश्वास न्यूज ने एनडीटीव्ही च्या संपादकीय टीम सोबत संपर्क केला. आम्हाला सांगितले गेले कि, व्हिडिओ मधला व्यक्ती रवीश कुमार नसून, जम्मू काश्मीर चे पूर्व संवाददाता फयाज बुखारी आहे.

तपासाच्या पुढच्या टप्प्यात आम्ही विविध कीवर्डस वापरून गूगल सर्च केले. आम्हाला एनडीटीव्ही च्या साईट वर 21 मे 2006 रोजी अपलोड केलेली एक बातमी मिळाली. यात सांगितले गेले कि काँग्रेस च्या रॅली च्या वेळी एका हमल्यात सात लोकं मारले गेले. हि बातमी श्रीनगर मधून फयाज बुखारी यांनी रिपोर्ट केली होती. व्हिडिओ मध्ये ते जमिनीवर झोपलेले दिसतात.

तपासाच्या पुढच्या टप्प्यात विश्व्स न्यूज ने सरळ फयाज बुखारी यांना संपर्क केला. त्यांच्याससोबत आम्ही व्हायरल पोस्ट व्हाट्सअँप वर शेअर केला. आता रॉयटर्स मध्ये कार्यरत असलेल्या फयाज मी सांगितले, व्हायरल चित्र २००६ चे आहे.

फेसबुक पेज India272+ ला सत्तावीस लाख पेक्षा जास्ती लोकं फॉलो करतात. या पेज ला २ फेब्रुवारी २०१३ साली बनवण्यात आले होते पेज वर आम्हाला एका विशिष्ठ राजनेतिक पक्षाचे कन्टेन्ट दिसले.

निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात रवीश कुमारच्या नावावर व्हायरल होत असलेली पोस्ट खोटी सल्याचे समोर आले. चित्रात फयाज बुखारी आहेत.

  • Claim Review : Ravish Kumar in the viral picture
  • Claimed By : India272+
  • Fact Check : False
False
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later