Fact Check: बाबरी मस्जिद निर्माण वर अखिलेश यादव ने ट्विट केले नाही, व्हायरल पोस्ट खोटी आहे
सपा चे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी बाबरी मस्जिद च्या निर्माण वर ट्विट केला नाही. आमच्या तपासात व्हायरल ट्विट खोटा असल्याचे समोर आले.
- By: Gaurav Tiwari
- Published: Jul 22, 2021 at 09:38 PM
नवी दिल्ली (विश्वास न्यूज): उत्तर प्रदेश चे पूर्व मुख्यमंत्री आणि समाजवादी पार्टी (सपा) चे अध्यक्ष अखिलेश यादाव बद्दल एक खोटी पोस्ट व्हायरल होत आहे, ज्यात म्हंटले गेले आहे कि जर सपा ची सरकार बनेल तर परत बाबरी मस्जिद चा निर्माण करण्यात येईल. विश्वास न्यूज च्या तपासात हे स्पष्ट झाले कि बाबरी मस्जिद च्या निर्माणावर अखिलेश यादव ने कुठलाच ट्विट केला नाही. या ट्विट ला एडिट करून बनवण्यात आले आहे.
काय होत आहे व्हायरल?
सनातन प्रेमी सोम नाम नावाच्या फेसबुक यूजर ने पोस्ट करून लिहले:
🚩आयोध्या तो बस झांकी है🚩
🙏 मथुरा काशी बाकी है🙏
महादेव का नारा है, पाकिस्तान भी हमारा है।
या सोबत आम्हाला पोस्ट मध्ये एक ट्विट चा स्क्रीनशॉट देखील मिळाला. या ट्विट मध्ये अखिलेश यादव दिसतात. या ट्विट प्रमाणे त्यांनी म्हंटले उत्तर प्रदेश मध्ये जर आमची सरकार आली, तर आम्ही आमच्या मुसलमान बांधवांना हे वाचन देतो कि बाबरी मस्जिद चे निर्माण परत त्याच ठिकाणी करवू, जिथे रॅम मंदिर चा निर्माण होत आहे.
हि पोस्ट 21 जुलै, 2021 रोजी करण्यात आली. या पोस्ट ला इथे बघा.
त्या सोबतच आम्हाला हा मेसेज आमच्या चॅटबॉक्स वर देखील मिळाला, ज्यावर यूजर्स या मागचे तथ्य जाणून घेण्यास उत्सुक आहे.
आम्हाला फेसबुक वर देखील अश्या बऱ्याच पोस्ट मिळाल्या.
तपास:
हि पोस्ट आम्हाला बऱ्याच ठिकाणी व्हायरल होताना दिसली. आम्ही आधी अखिलेश यादव यांचे ट्विटर हॅन्डल चेक केले, आम्हाला त्यात असा कुठलाच ट्विट मिळाला नाही.
त्यानंतर आम्ही गूगल वर त्याचा तपास केला. जर अखिलेश यादव नि असा कुठला ट्विट केला असता, तर हि नक्कीच एक मोठी बातमी बनली असती जी सगळ्याच मीडिया हाउसेस ने कव्हर केली असती. अश्यातच आम्हाला एक एबीपी न्यूज ची 15 डिसेंबर, 2020 ची बातमी मिळाली, ज्याची हेआडींग होती: अखिलेश यादव बोले- सपा के हैं भगवान राम, परिवार के साथ करूंगा मंदिर के दर्शन
या बातमी प्रमाणे, त्यांनी म्हंटले कि मी आणि माझा परिवार मंदिराचे निर्माण झाल्यावर दर्शन करण्यास जाऊ. हि बातमी इथे वाचा.
या नंतर आम्हाला 3 मे 2019 रोजी प्रकाशित झालेली नवभारत टाइम्स ची एक बातमी मिळाली ज्याची हेडींग होती: अयोध्या में बोले अखिलेश,’अजेंडा एक, संविधान के दायरे में शांतिपूर्ण तरीके से हो राम मंदिर का निर्माण’
या बातमी प्रमाणे, त्यांनी मंदिर निर्माण च्या पक्षात वक्तव्य केले. हि बातमी इथे वाचा.
त्यानंतर आम्ही समाजवादी पार्टी चे प्रवक्ता राजीव राय यांच्यासोबत फोन वर बोललो. त्यांनी आम्हाला सांगितले कि हा ट्विट खोटा आहे. अश्या अफवा विरोधी नक्कीच पसरवतात. त्यांनी हे देखील म्हंटले कि अखिलेश यादव यांच्या कुप्रसिद्ध करण्यासाठी या गोष्टी करण्यात येत आहे. आम्ही अश्या अफवांची नंदा करतो.
सनातन प्रेमी सोम नाम हे फेसबुक यूजर कानपुर चे रहिवासी आहेत. यांच्या जास्तीत जास्त पोस्ट राजनेतिक असतात.
निष्कर्ष: सपा चे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी बाबरी मस्जिद च्या निर्माण वर ट्विट केला नाही. आमच्या तपासात व्हायरल ट्विट खोटा असल्याचे समोर आले.
- Claim Review : बाबरी मस्जिद वर अखिलेश यादव चे ट्विट
- Claimed By : सनातन प्रेमी सोम
- Fact Check : False
Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.