Fact Check: कृषी मंत्र्यांना पदावरून काढल्याचे आणि कृषी कायदा बदलल्याचे खारीज करणारी पोस्ट खोटी आहे
आमच्या तपासात कळले कि कृषि मंत्री नरेंद्र तोमर यांना काढण्यात आले नाही आणि तसेच तीन कृषी कायद्यांना रद्द करण्यात आले नाही. हि पोस्ट पूर्णपणे खोटी आहे.
- By: Gaurav Tiwari
- Published: Jul 19, 2021 at 09:02 PM
नवी दिल्ली (विश्वास न्यूज): केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र तोमर यांचे मंत्रालय काढून घेतल्याचे आणि केंद्र सरकार वर तीन कृषी कायदे रद्द करण्याचे सांगणारी सोशल मीडिया पोस्ट पूर्णपणे खोटी असल्याचे समोर आले. विश्वास न्यूज च्या तपासात हे कळले कि कृषी मंत्री नरेंद्र तोमर आणि त्यांचे मंत्रालय काढून घेण्यात आले नाही. ते अजूनही कृषी मंत्री आहेत. त्यासोबतच केंद्र सरकार ने आणलेले तीन कृषी कायदे रद्द करण्याची गोष्ट देखील अफवा असल्याचे समोर आले.
काय होत आहे व्हायरल?
रेनू शाक्यवर नावाच्या फेसबुक यूजर ने आपल्या पोस्ट मध्ये लिहले: मोदी ने छीना कृषि मंत्री का भी मंत्रालय तीनों कृषि कानून भी गए रद्द।। देखें वीडियो। इसके साथ ही पोस्ट में एक फोटो में जिस पर लिखा है कि मोदी की गेंद से एक और मंत्री बोल्ड। ब्रेकिंग न्यूज- कृषि मंत्री का भी छीना मंत्रालय! तीनों कृषि कानून भी किए गए रद्द!
या पोस्ट सोबत एक युट्युब लिंक देखील देण्यात आली आहे.
हि पोस्ट १५ जुलै, २०२१ रोजी शेअर करण्यात आली होती. या पोस्ट चा आर्काइव्ह लिंक इथे बघा.
तपास:
साग्यात आधी आम्ही पोस्ट सोबत दिल्या गेलेला व्हिडिओ बघायचे ठरवले. आठ मिनिटांच्या या व्हिडिओ मध्ये संभावना दर्शविली जात होती कि कृषी मंत्री नरेंद्र तोमर यांचे पद चालले जाईल. या व्हिडिओ मध्ये असे कुठेच सांगितले गेले नाही कि त्यांच्याकडून त्यांचे मंत्रालय काढून घेण्यात आले आहे. या व्हिडिओ च्या हेडिंग मध्ये हे स्पष्ट लिहले आहे कि त्यांचे मंत्रालय काढून घेतले गेले तसेच कृषी कायदे रद्द करण्यात आले.
हा व्हिडिओ चे हेडिंग आहे: मोदी ने छीना कृषि मंत्री का भी मंत्रालय तीनों कृषि कानून भी गए रद्द।।
हा व्हिडिओ बघून नक्कीच असे वाटते कि मुद्दाम या व्हिडिओ चे हेडिंग खोटी बातमी पसरवण्यास देण्यात आले आहे, जेव्हाकी व्हिडिओ मध्ये कुठेच ठोस पुरावे नाही, तसेच कुठे सांगण्यात आले नाही कि त्यांचे मंत्रालय काढून घेण्यात आले किंवा कायदे रद्द करण्यात आले.
हा व्हिडिओ नेशन टीव्ही नावाच्या युट्युब चॅनेल वर १५ जुलै रोजी अपलोड करण्यात आला आहि. आता पर्यंत या व्हिडिओ ला ५,५६६ पेक्षा जास्ती व्यू आहेत. हा व्हिडिओ तुम्ही इथे बघू शकता.
जर इतकी मोठी घटना घडली असती तर हि नक्कीच कुठल्या मीडिया हाऊस ने कव्हर केली असती. म्हणून आम्ही गूगल सर्च करून शोधण्यास प्रयत्न केला. पण आम्हाला कुठेच हि बातमी सापडली नाही, जी या दाव्याची पुष्टी करेल.
त्यानंतर आम्ही भारत सरकार ची अधिकृत साईट तपासली. तिथे आम्हाला एक लिस्ट मिळाली जी 7 जुलै, 2021 रोजी अपडेट केली होती. ह्या लिस्ट प्रमाणे, नरेंद्र सिंह तोमर कृषि आणि किसान कल्याण च्या कैबिनेट रैंक चे मंत्री आहे. ७ जुलै रोजी मंत्री मंडळाचा विस्तार झाला होता ज्यात बऱ्याच जुन्या मंत्र्यांना काढून काही नवीन मंत्र्यांचे छान करण्यात आले होते. तुम्ही हि लिस्ट इथे बघू शकता.
आम्ही भाजप चे प्रवक्ता नि पार्टी च्या युवा मोर्च्याचे, राष्ट्रीय मंत्री तेजिंदर पाल सिंह बग्गा यांना संपर्क केला. त्यांनी हि पोस्ट खारीज केली आणि खोटी असल्याचे सांगितले. लोकांमध्ये अफवा फैलावण्याच्या दृष्टी ने हि बनवली गेली असावी असे त्यांनी सांगितले.
रेनू शाक्यवर हा फेसबुक प्रोफाइल तपासल्यावर आम्हाला समजले, कि त्या एका राजनेतिक पार्टी च्या मेंबर आहेत.
निष्कर्ष: आमच्या तपासात कळले कि कृषि मंत्री नरेंद्र तोमर यांना काढण्यात आले नाही आणि तसेच तीन कृषी कायद्यांना रद्द करण्यात आले नाही. हि पोस्ट पूर्णपणे खोटी आहे.
- Claim Review : कृषी मंत्र्यांना पदावरून काढल्याचे आणि कृषी कायदा बदलल्याचा दावा करणारी पोस्ट
- Claimed By : रेनू शाक्यवर
- Fact Check : False
Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.