X
X

Fact Check: लहान मुलाचे आणि सीएम योगी यांच्या छायाचित्रासोबत व्हायरल होत असलेली गोष्ट खोटी

विश्वास न्यूज च्या तपासात लहान मुलगा आणि योगी आदित्यनाथ यांच्या छायाचित्रासोबत व्हायरल होत असलेली गोष्ट निराधार आहे. हे छायाचित्र २०१९ चे आहे जेव्हा योगी आदित्यनाथ हे वनटांगिया समुदायाच्या लोकांसोबत दिवाळी साजरी करण्यास गेले होते.

  • By: ameesh rai
  • Published: Jul 13, 2021 at 10:53 PM

विश्वास न्यूज (नवी दिल्ली): सोशल मीडिया वर उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे एका लहान मुलासोबतचे छायाचित्र व्हायरल होत आहे. या छायाचित्रासोबत एक गोष्ट देखील व्हायरल होत आहे, ज्यात दावा करण्यात येत आहे कि, योगी यांनी कशी यात्रेत एका लहान मुलाला रडताना बघितले. दाव्या प्रमाणे, मुलाने योगिनां सांगितले कि त्याचे आई बाबा नाही, आणि त्याचे एक मामा देखील होते जे आता हयात नाही. दाव्यामध्ये पुढे सांगण्यात येत आहे कि सीएम योगी यांनी म्हंटले कि आज पासून मी तुझा मामा आणि, प्रशासनाला निर्देश दिले कि या मुलाचे शिक्षण आणि जेवण हे सीएम फंड मधून होईल. विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल दावा खोटा असल्याचे समोर आले. हे छायाचित्र कशी चे नाही, गोरखपूर च्या वनटांगिया समुदाय च्या बस्ती चे आहे. 2019 मध्ये सीएम योगी यांनी वनटांगिया समुदायासोबत दिवाळी साजरा केली तेव्हाचे होते.

काय होत आहे व्हायरल?
फेसबुक वर हिन्दू जागरण मंच नावाच्या एका पेज वर व्हायरल मेसेज चा स्क्रिनशॉट शेअर केला गेला आहे. यावर लिहले आहे, “काशी यात्रा में योगी ने एक बच्चे को रोते हुए देखा। वह बच्चे के पास गए और कारण पूछा। बच्चे ने कहा कि मेरे माता-पिता मर गए। मैं मामा के साथ रह रहा था, कल वह भी मर गए। योगी ने कहा “बेटा आज से मै तुम्हारा मामा” उन्होंने डीएम को आदेश दिया कि जब तक बड़े होकर उसे नौकरी नहीं मिलती, तब तक वे सीएम फंड से उसके भोजन और शिक्षा का ध्यान रखें। [[[#योगी_भक्त]]]।
हि पोस्ट जशी च्या तशी प्रस्तुत केले आहे. या पोस्ट चा स्क्रिनशॉट इथे बघा.

तपास:
विश्वास न्यूज ने व्हायरल पोस्ट च्या दाव्याच्या तपासाची सुरुवात गूगल रिव्हर्स इमेज सर्च टूल नि केले. आम्हाला इंटरनेट वर या छायाचित्राचे मिळते जुळते छायाचित्र मिळाले. आम्हाला 27 अक्टूबर 2019 रोजी लाइव हिन्दुस्तान च्या वेबसाईट वर हे छायाचित्र एका प्रकाशित रिपोर्ट मध्ये सापडले. गोरखपूर डेटलाईन नि लिहलेल्या या बातमीत सांगितले होते कि सीएम योगी आदित्यनाथ ह्यांनी वनटांगिया बस्ती तिनकोनिया बस्ती मध्ये लोकांसोबत दिवाळी साजरा केली. त्यांनी इथे बऱ्याच कार्यक्रमात भाग घेतला. हि बातमी इथे क्लिक करून बघा.

व्हायरल छायाचित्र 28 ऑक्टोबर 2019 रोजी पंजाब केसरी च्या साईट वर असलेल्या एका रिपोर्ट मध्ये देखील आम्हाला मिळाली. या रिपोर्ट मध्ये योगी यांचे वनटांगिया बस्ती मधले छायाचित्र असल्याचे सांगितले गेले आहे. या रिपोर्ट ला इथे क्लिक करून बघा.

या व्हायरल छायाचित्राच्या तपासाच्या पुढच्या टप्प्यात आम्ही लाइव हिन्दुस्तान चे रिपोर्टर राजीव दत्त पांडेय यांना संपर्क केले, ज्यांची बाइलाइन बातमीत व्हायरल छायाचित्राचा उल्लेख आहे. त्यांनी पुष्टी केली कि हे छायाचित्र कशी चे नाही गोरखपूर च्या वनटांगिया बस्ती चे आहे. त्यांनी स्वतः आपल्या मोबाइल वरून हे छायाचित्र घेतले आहे.

आम्हाला तपास करताना कुठलीच अधिकृत मीडिया रिपोर्ट मिळाली नाही, जी व्हायरल होत असलेल्या छायाचित्र आणि दाव्याची पुष्टी करेल. जर सीएम योगी यांनी कशी मध्ये स्वतःच्या यात्रेदरम्यान कुठल्या लहान मुलाला फंड मधून मदत केली असती तर हि नक्कीच एक मोठी बातमी असती आणि विविध मीडिया रिपोर्ट्स या बाबतीत इंटरनेट वर उपलब्ध असत्या.

विश्वास न्यूज ने व्हायरल दावा शेअर करणाऱ्या फेसबुक पेज हिन्दू जागरण मंच ला स्कॅन केले. फॅक्ट चेक होत पर्यंत या पेज चे 73516 फॉलोवर्स होते.

निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात लहान मुलगा आणि योगी आदित्यनाथ यांच्या छायाचित्रासोबत व्हायरल होत असलेली गोष्ट निराधार आहे. हे छायाचित्र २०१९ चे आहे जेव्हा योगी आदित्यनाथ हे वनटांगिया समुदायाच्या लोकांसोबत दिवाळी साजरी करण्यास गेले होते.

  • Claim Review : लहान मुलाचे आणि सीएम योगी यांच्या छायाचित्रासोबत व्हायरल होत असलेली गोष्ट
  • Claimed By : फेसबुक पेज हिन्दू जागरण मंच
  • Fact Check : False
False
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later