Fact Check : पीएम मोदी यांच्या विरोधात नाही केले मनोहर जोशी यांनी व्हायरल विधान
विश्वास न्यूज च्या तपासात मुरली मनोहर जोशी यांच्या नावाने व्हायरल होत असलेले वक्तव्य, खोटे असल्याचे समोर आले. त्यांनी असे कुठलेच वक्तव्य केले नाही. आमच्या तपासात हि पोस्ट खोटी असल्याचे समोर आले.
- By: Ashish Maharishi
- Published: Jun 18, 2021 at 09:46 PM
विश्वास न्यूज (नवी दिल्ली): सोशल मीडिया वर भाजप चे वरिष्ठ नेता मुरली मनोहर जोशी यांचे एक विधान व्हायरल होत आहे. या पोस्ट मध्ये या भाजप नेत्याचे छायाचित्रात देखील वापरण्यात आले आहे. यूजर्स दावा करत आहेत कि पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात मुरली मनोहर जोशी यांनी हे विधान केले आहे. विश्वास न्यूज ने व्हायरल पोस्ट चा तपास केला आणि त्यात हि पोस्ट खोटी असल्याचे समोर आले.
काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर अश्विन जगताप ने 17 जून रोजी एक पोस्ट केली. यात मुरली मनोहर जोशी यांचे एक छायाचित्र वापरण्यात आले होते. यात लिहले होते: अगर मोदी इसी तरह घमंड में रहे तो 2024 में मोदी बुरी तरह हारेंगे और देश की जनता उध्दव साहेब ठाकरे की सादगी को जिताएगी- मुरली मनोहर जोशी, भाजपा नेता’
हि फेसबुक पोस्ट आणि आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा. या पोस्ट ला खरे मानून बाकी यूजर्स देखील याला व्हायरल करत आहेत.
तपास:
विश्वास न्यूज ने तपासाची सुरुवात गूगल ओपन सर्च ने केली. सगळ्यात आधी आम्ही जोशी यांचे वक्तव्य गूगल मध्ये सर्च केले. आम्हाला एक पण अशी बातमी नाही मिळाली, ज्यात या वक्तव्याचा उपयोग केला असेल, किंवा ज्यातून या विधानामागचे सत्य समजेल. याचा अर्थ स्पष्ट होता कि हि पोस्ट खोटी आहे. मुरली मनोहर जोशी यांच्या सारख्या वरिष्ठ नेत्याने जर का असे वक्तव्य केले असते तर याची बातमी नक्की झाली असती.
व्हायरल पोस्ट मागचे सत्य जाणून घेण्यासाठी विश्वास न्यूज ने मुरली मनोहर जोशी चे निजी सचिव राजीव बेरवाल यांना संपर्क केला. त्यांनी आम्हाला सांगितले कि जोशी यांच्या नावाने व्हायरल होत असलेले वक्तव्य पूर्णपणे खोटे आहे.
आतापर्यंतच्या तपासात हे सिद्ध झाले होते कि जोशी यांच्या नावावर व्हायरल होत असलेले वक्तव्य खोटे आहे, आता आम्ही, खोटी पोस्ट शेअर करणाऱ्या यूजर चा तपास केला. त्यात आम्हाला कळले कि फेसबुक यूजर अश्विन जगताप महाराष्ट्र चे रहिवासी आहेत. त्यांचे 4.9 हजार फ्रेंड आहेत.
निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात मुरली मनोहर जोशी यांच्या नावाने व्हायरल होत असलेले वक्तव्य, खोटे असल्याचे समोर आले. त्यांनी असे कुठलेच वक्तव्य केले नाही. आमच्या तपासात हि पोस्ट खोटी असल्याचे समोर आले.
- Claim Review : पीएम नरेंद्र मोदी यांच्या विरोधात वरिष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांनी वक्तव्य केले.
- Claimed By : अश्विन जगताप
- Fact Check : False
Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.