X
X

Fact Check: १२ वर्षापेक्षा जास्ती वयाच्या मुलांना कोवॅक्सीन घेण्याची मंजुरी मिळाली नाही, व्हायरल दावा खोटा आहे

विश्वास न्यूज च्या तपासात १२ वर्षांपेक्षा अधिक आयु च्या मुलांसाठी वॅक्सीन च्या वापरला मंजुरी मिळाली असल्याचा दावा खोटा ठरला. हा फॅक्ट चेक होत पर्यंत ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) ने २-१८ वयोगटातील मुलांसाठी कोवॅक्सीन च्या फेज 2/3 च्या क्लिनिकल ट्रायलचिच परवानगी दिली होती. भारतात सध्या १८ वर्षावरील लोकांनाच लस देण्यात येत आहे.

  • By: ameesh rai
  • Published: May 17, 2021 at 10:51 AM

विश्वास न्यूज (नवी दिल्ली): सोशल मीडिया वर भारत बायोटेक च्या कोवॅक्सीन ला घेऊन एक दावा व्हायरल होत आहे. सोशल मीडिया यूजर्स दावा करत आहेत कि १२ वर्षावरील मुलांना कोवॅक्सीन देण्याची मंजुरी दिली आहे. विश्वास न्यूज च्या तपासात हा दावा खोटा असल्याचे कळले. हा फॅक्ट चेक होत पर्यंत, ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) ने २-१८ वर्षांच्या मुलांसाठी कोवॅक्सीनच्या फेज २/३ च्या क्लिनिकल ट्रायल ची परवानगी दिली होती. भारतात कॉवीड-१९ चे वॅक्सीन अजून १८ वर्षावरील लोकांनाच दिले जात आहे.

काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर Trilok Meena ने ९ मे रोजी केलेल्या एका पोस्ट मध्ये लिहले: ‘शानदार खबर, भारत बायोटेक की (मेड इन इंडिया) कोवैक्सीन को 12 साल से अधिक उम्र के बच्चों के लिए मंजूरी मिल गई है।’
या पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:
विश्वास न्यूज ने सगळ्यात आधी ओपन सर्च द्वारे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला कि भारत बायोटेक च्या कोवॅक्सीन ला घेऊन अशी कुठली बातमी आली आहे का. कोविड-19 आणि त्याच्या वॅक्सीन बद्दलच्या बऱ्याच बातम्या सध्या चर्चेत होत्या, अश्यात जर का वॅक्सीन बाबतीत इतका मोठा उपडेट आला असता तर त्याबद्दलची बातमी मीडिया हाऊसेस ने नक्कीच घेतली असती. पण आम्हाला इंटरनेट वर आहि कुठलीच बातमी मिळाली नाही, जो या दाव्याची पुष्टी करेल.

या उलट आम्हाला स्वास्थ्य एवं परिवार कल्याण मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांच्या अधिकृत ट्विटर हॅन्डल वर १३ मे २०२१ रोजी केलेला एक ट्विट मिळाला. या ट्विट मध्ये दिलेल्या माहिती प्रमाणे, ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) ने 2-18 आयुवर्ग वर कोवॅक्सीन च्या फेज 2/3 च्या क्लिनिकल ट्रायल ला मंजुरी दिली आहे. या ट्विट सोबत त्यांनी प्रेस इन्फॉर्मेशन ब्यूरो (PIB) च्या विज्ञप्ति ची लिंक देखील शेअर केली आहे. त्याप्रमाणे, कोवॅक्सीन निर्माण करणारी कंपनी भारत बायोटेक लिमिटेड ला हि परवानगी १२ मे २०२१ रोजी दिली गेली आहे. कंपनी ५२५ स्वस्थ वॉलन्टियर्स वर हा ट्रायल करेल. हा ट्विट तुम्ही खाली बघू शकता.

म्हणजेच याचा अर्थ हा आहे कि १२ पेक्षा जास्ती वयाच्या मुलांना यांच्या वापराची परवानगी दिलेली नाही, पण २-१८ या वयोगटासाठी ट्रायल ची परवानगी दिलेली आहे, या संबंधित दावा आधी देखील व्हायरल झाला.

विश्वास न्यूज ने हा तपास पुढे नेला आणि स्वास्थ्य एवं परिवार कल्याण मंत्रालय च्या वेबसाईट चा तपास केला. इथे कोविड-19 वॅक्सीन संबंधित सामान्यरित्या विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची लिस्ट आहे. आम्हाला त्यात माहिती मिळाली कि १ मे २०२१ ला दिलेल्या माहिती प्रमाणे, १८ वर्षापेक्षा जास्ती आयुच्या लोकांना वॅक्सीन दिली जात आहे. हि माहिती तुम्ही खाली बघू शकता.

भारत बायोटेक ने कोवॅक्सीन इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) सोबत बनवले आहे. आम्हाला भारत बायोटेकच्या वेबसाईट वर कोवॅक्सीन बद्दलची फॅक्ट-शीट मिळाली. यावर स्पष्ट लिहले गेले होते कि अजून १८ वर्षांवरील लोकांनाच हि लस मंजूर केली गेली आहे. याची माहिती तुम्ही खाली बघू शकता.

विश्वास न्यूज ने व्हायरल दाव्यासंबंधित अधिक माहिती साठी स्वास्थ्य एवं परिवार कल्याण मंत्रालय च्या राष्ट्रीय हेल्पलाइन +91-11-23978046 वर संपर्क केला. आम्हाला तिथे अशी माहिती मिळाली कि अजून कोवॅक्सीन च्या वापराबद्दल असे कुठलेच आदेश मिळाले नाही आहे. हेल्पलाईन वर आम्हाला हे देखील सांगण्यात आले कि वॅक्सीन बद्दल माहिती साठी स्वास्थ्य एवं परिवार कल्याण मंत्रालय च्या अधिकृत वेबसाईट आणि हेल्पलाईन वर मिळालेल्या माहिती वर विश्वास ठेवावा.

विश्वास न्यूज ने व्हायरल दावा फेसबुक वर शेअर करणारे यूजर Trilok Meena चा देखील प्रोफाइल स्कॅन केला. यूजर बरान, राजस्थान च्या रहिवासी आहेत.

Disclaimer: विश्वास न्यूजच्या कोरोनाव्हायरस (COVID-19) संबंधित फॅक्ट-चेक स्टोरी वाचताना किंवा शेअर करताना, आम्ही वापरलेला डेटा किंवा संशोधन डेटा बदलू शकतो हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. कोरोनाव्हायरस संबंधित डेटा (संक्रमित असलेले, बरे झालेले रुग्ण आणि मृत्युमुखी पडलेले रुग्ण यांची संख्या) सतत बदलत राहते. तसेच लस (व्हॅक्सिन) शोधण्याच्या दिशेने संशोधनाचे ठोस परिणाम यायचे आहेत आणि त्यामुळे, उपचार आणि प्रतिबंधासाठी उपलब्ध असलेला डेटा देखील बदलू शकतो. म्हणून जेव्हा तुम्ही फॅक्ट-चेक वाचाल तेव्हा त्याची तारीख पडताळणे आवश्यक आहे.

निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात १२ वर्षांपेक्षा अधिक आयु च्या मुलांसाठी वॅक्सीन च्या वापरला मंजुरी मिळाली असल्याचा दावा खोटा ठरला. हा फॅक्ट चेक होत पर्यंत ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) ने २-१८ वयोगटातील मुलांसाठी कोवॅक्सीन च्या फेज 2/3 च्या क्लिनिकल ट्रायलचिच परवानगी दिली होती. भारतात सध्या १८ वर्षावरील लोकांनाच लस देण्यात येत आहे.

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later