Fact Check: रावण ची भूमिका करणारे, अरविंद त्रिवेदी सुखरूप आहे, मृत्यू ची बातमी एक अफ़वाह
विश्वास न्यूज च्या तपासात अरविंद त्रिवेदी यांच्या मृत्यूची बातमी खोटी असल्याचे कळले. रामायण मध्ये लक्ष्मणाची भूमिका करणारे अभिनेते सुनील लेहरी आणि त्रिवेदी यांचा भाचा कौस्तुभ यांनी देखील व्हायरल पोस्ट चे खंडन केले आणि अरविंद त्रिवेदी सुखरूप असल्याचे सांगितले.
- By: Pallavi Mishra
- Published: May 7, 2021 at 11:28 AM
नवी दिल्ली (विश्वास न्यूज): ८० च्या दशकातले सुप्रसिद्ध टीव्ही सिरीयल रामायण मध्ये रावण ची भूमिका साकारणारे कलाकार, अरविंद त्रिवेदी यांच्या मृत्यू ची अफ़वाह सोशल मीडिया वर बरीच व्हायरल होत आहे. विश्वास न्यूज च्या तपासात हे कळले कि अरविंद त्रिवेदी जिवंत आहे आणि सुखरूप आहे.
रामायण मध्ये लक्ष्मण ची भूमिका साकारणारे कलाकार सुनील लहरी आणि अरविंद त्रिवेदी यांचे भाचे कौस्तुभ त्रिवेदी, या दोघांनी ते जीवित असल्याची माहिती दिली आणि व्हायरल पोस्ट खोटी असल्याचे सांगितले.
काय होत आहे व्हायरल?
फेसबुक वर बरेच यूजर अरविंद त्रिवेदी यांचे छायाचित्र शेअर करून दावा करत लिहले: ”भावपूर्ण श्रद्धांजली अरविंद त्रिवेदी “लंकेश” रामायण सीरियल में रावण की भूमिका निभाने वाले कलाकार आज हम लोगों के वीच नहीं रहें| ईश्वर उन्हें श्री चरणों में स्थान प्रदान करें।”
पोस्ट चा आर्काइव्ह लिंक इथे बघा.
तपास:
विश्वास न्यूज ने सगळ्यात आधी व्हायरल होत असलेल्या पोस्ट चे सत्य जाणून घेण्यासाठी मुंबई मध्ये बॉलीवूड खूप वेळेपासून कव्हर करणाऱ्या वरिष्ठ पत्रकार स्मिता श्रीवास्तव यांना संपर्क केला. स्मिता ने विश्वास न्यूज ला सांगितले कि अरविंद त्रिवेदी यांच्याबद्दलची व्हायरल पोस्ट खोटी होती.
अशी कुठलीच बातमी त्यांच्याकडे नाही.
या नंतर कीवर्ड सर्च च्या मदतीने इंटरनेट वर शोधले. आम्हाला कोणत्याच ऑथेंटिक मीडिया वेबसाईट वर हि बातमी मिळाली नाही. आम्हाला रामायण मध्ये लक्ष्मण ची भूमिका साकारणारे कलाकार सुनील लेहरी यांच्या वेरिफाइड इंस्टाग्राम अकाउंट वर त्यांची एक पोस्ट मिळाली ज्यात त्यांनी अभिनेते अरविंद त्रिवेदी यांच्या मृत्यू ची बातमी खोटी असल्याचे सांगितले आणि त्याचे खंडन केले. त्यांनी सांगितले कि त्रिवेदी हे जिवंत आहे आणि सुखरूप आहेत. पोस्ट मध्ये त्यांनी लिहले: “Aajkal Koi Na Koi Buri Khabar sunane Ko milati Hai carona ki vajah se, Upar Se Arvind Trivedi ji (Ravan) ki jhuthi khabar, Meri Prathna Hai jhuthi afwah failane Walon se kripya Karke Is Tarah ki khabar na failaye… Bhagwan ki Daya se Arvind ji theek hain aur Prathna Karta Hun Ki Bhagwan unhen sadaiv Swasth rakhen”
अजून शोधल्यावर आम्हाला अरविंद त्रिवेदी यांचा भाचा कौस्तुभ त्रिवेदी यांचे देखील फेसबुक पोस्ट दिसले. ४ मे रोजी केलेल्या या पोस्ट मध्ये लिहले होते.
“It’s fake last year on 3rd may also this news was there he is good and safe. Please don’t spread” जिसका हिंदी अनुवाद होता है “यह खबर फर्जी है। पिछले साल भी यह फर्जी खबर वायरल हुई थी। वे बिलकुल ठीक हैं। कृपया फर्जी खबर न फैलाएं।”
या नंतर आम्ही खोटी बातमी पसरवणारा पेज, we support BJP india चा तपास केला. त्यात आम्हाला कळले कि यूजर चे 265.6K फॉलोवर्स आहेत.
हि अफ़वाह २०२० मध्ये देखील व्हायरल झाली होती. त्यावेळी देखील आम्ही या पोस्ट चा फॅक्ट चेक केला होता. हि पोस्ट तुम्ही इथे वाचू शकता.
निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात अरविंद त्रिवेदी यांच्या मृत्यूची बातमी खोटी असल्याचे कळले. रामायण मध्ये लक्ष्मणाची भूमिका करणारे अभिनेते सुनील लेहरी आणि त्रिवेदी यांचा भाचा कौस्तुभ यांनी देखील व्हायरल पोस्ट चे खंडन केले आणि अरविंद त्रिवेदी सुखरूप असल्याचे सांगितले.
- Claim Review : Actor playing Ravana, Arvind Trivedi died
- Claimed By : we support BJP India
- Fact Check : False
Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.